'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दरोडेखोरांकडून १ वर्षांत ५१ कोटी रुपयांची लूट !

६० टक्क्यांहून अधिक दरोड्याची रक्कम मिळवण्यात पोलीस अपयशी !
असुरक्षित ठाणे जिल्हा !
    ठाणे, २६ जानेवारी - मागील वर्षभरात दरोडेखोर आणि चोरटे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५१ कोटी रुपयांची लूट केली आहे. त्या अंतर्गत ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आदी ठिकाणी १८ सहस्र २४२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. २०११ मध्ये ५ सहस्र ७०५ गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
(इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेच्या पैशांची लूट होत असतांना गृहमंत्री विधानसभेत चोरीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे सांगतात, ही जनतेची शुद्ध फसवणूकच नव्हे का ? अशी फसवणूक करणारे आणि जनतेच्या मुद्देमालाचे रक्षण करू न शकणारे निरर्थक लोकराज्य आणखी किती दिवस सहन करायचे ? - संपादक)
    आयुक्तालयाच्या परिसरात दरोडे, घरफोड्या, चोर्‍या आदी ४ सहस्र ३०७ गुन्ह्यांत वर्षभरात ५१ कोटी २९ लक्ष १६ सहस्र ५७ रुपयांचा माल चोरट्यांनी चोरला. त्यांपैकी केवळ १७ कोटी २७ लक्ष ४२ सहस्र ६७४ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. म्हणजे एकूण ३४ कोटी १ लक्ष ७३ सहस्र ३८३ रुपयांचा माल मिळण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.



धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi