'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

मुंबईतील १३/७ च्या बाँबस्फोटांप्रकरणी तीन जिहादी आतंकवाद्यांना अटक

मुंबईत बाँबस्फोट करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना अटक झाली, हे योग्य झाले. अन्यथा या स्फोटांमागे जिहादी नव्हे, तर हिंदुत्ववादी संघटना आहेत, अशी कोल्हेकुई (मौलाना) दिग्विजय सिंग (खान) यांच्या सारख्या जिहादीप्रेमींनी केली असती !
    मुंबई, २३ जानेवारी - गेल्या वर्षी १३ जुलै या दिवशी मुंबईत ऑपेरा हाऊस, दादर आणि झवेरी बाजार या ठिकाणी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने फरारी जिहादी आतंकवादी यासीन भटकळ याचे सहकारी असल्याच्या संशयावरून मोहंमद नकी, महंमद नदीम आणि अन्य एक, अशा तीन आतंकवाद्यांना अटक केली आहे.
यांपैकी महंमद नकी हा मुंबईत भायखळा येथे रहातो, अशी माहिती पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. महंमद नकीने बाँबस्फोटांचा कट अमलात आणण्यासाठी तांत्रिक सहकार्य केले होते. आतंकवाद्यांच्या मुंबईतील वास्तव्याची व्यवस्था नकीनेच केली होती. ( हिंदुत्ववादी संघटनांच्या नावाने थयथयाट करणारे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अबु आझमी यांना आता काय म्हणायचे आहे ? - संपादक)
    राकेश मारिया यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, नकी याने भ्रमणध्वनीचे सिम कार्ड पुरवले होते. नकीनेच नदीम याला दीड लाख रुपये पुरवले होते. नदीमला यासिन भटकळने दिल्लीला बोलावून नकीला देण्यासाठी एक पाकीट नदीमला दिले होते. त्यात स्फोटके आणि डिटोनेटर्स होती. दिल्ली आणि बिहार येथे कारवाई केल्यानंतर बिहारमध्ये या प्रकरणातील गूढ उकलले.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi