'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

म्हणे, भाग्यनगरमध्ये रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर बंदी घाला !

भारताचे वेगाने इस्लामीस्तान करण्याची इच्छा बाळगणार्‍या 
‘एम्आयएम्’चे अकबरुद्दीन ओवैसी या आमदाराची गरळओक !
     भाग्यनगर (आंध्रप्रदेश), २३ जानेवारी - ‘एम्आयएम्’ (मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन) या मुसलमान संघटनेचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी हिंदूंच्या श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती या दिवशी मिरवणुका काढण्याची अनुमती न देण्याची मागणी केली आहे. ओवैसी यांच्या मागणीमुळे हिंदु संघटना संतप्त झाल्या आहेत.
(हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या उत्सवांमधील मिरवणुकांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी एक मुसलमान आमदार करत आहे, ही गोष्ट हिंदू भारतात नव्हे, तर पाकमध्येच रहात आहेत, याचा अनुभव देणारी आहे. आज हिंदूंच्या उत्सवावर बंदी घाला, अशी मागणी करणारे मुसलमान उद्या हिंदूंची मंदिरे पाडून टाका आणि त्यानंतर ‘मुसलमान व्हा अन्यथा तुमच्या महिला अन् मुली यांना सोडून निघून जा’, असे सांगायलाही कमी करणार नाहीत. हिंदु संघटित नसल्यानेच ही स्थिती ओढवली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)
१. ओवैसी यांच्या या हिंदुद्वेष्ट्या विधानाला मंगलहाट विभागातील नगरसेवक राजा सिंग, शिवसेना, अखिल भारतीय हिंदु महासभा, जनसंघ पक्ष, रामराज्य परिषद, षट्दर्शन संत-महंत आदींनी वेगवेगळ्या प्रसिद्धीपत्रकांद्वारे तीव्र निषेध केला आहे. (हिंदु संघटनांनो, केवळ निषेध नोंदवून थांबू नका, तर भविष्यात कोणी हिंदुद्वेष्टा अशी मागणी करू धजावणार नाही, यासाठी व्यापक संघटन उभारून तुमचा वचक निर्माण करा ! - संपादक)
२. एका बाजूला या हिंदुद्वेष्ट्या मुसलमान आमदाराने हिंदूंच्या उत्सवावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर दुसर्‍या बाजूला शासनाकडे ‘मिलाद-उन-नबी’ हा मुसलमानांचा उत्सव भव्यरित्या साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेशातील काँग्रेस शासनाकडे साहाय्य मागितले आहे. ओवैसी यांचा ‘एम्आयएम्’ हा पक्ष काँग्रेस शासनाचा सत्तेतील भागीदार आहे. या दोन पक्षांची मिळून भाग्यनगर महापालिकेवर सत्ता आहे. (आंध्रप्रदेशमधील काँग्रेस शासन आपण कितीही हिंदुद्वेष केला, तरी आपल्याला काहीच करणार नाही, याची ओवैसी यांना खात्री आहे; म्हणूनच ते असे बोलू धजावत आहेत. थोडक्यात हिंदूंनो, काँग्रेसच्या राज्यात ज्या पद्धतीने काश्मीर खोर्‍यातून हिंदूंचा वंशविच्छेद झाला, तीच वेळ दक्षिण भारतात यायला वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक)
३. जुन्या भाग्यनगर शहरात ‘एम्आयएम्’चे गुंडाराज चालू आहे. या गुंडाराजमध्ये राज्यातील काँग्रेस शासनाचाही बरोबरीचा सहभाग आहे. दोन वर्षांपूर्वी ‘एम्आयएम्’च्या कार्यकर्त्यांच्या कारवायांमुळेच जुन्या शहरात दंगल भडकली होती. शासनाने श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती यांच्या शोभायात्रांमध्ये विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला हिंदूंच्या क्रोधाचा सामना करावा लागेल, असे भाग्यनगर महापालिकेचे नगरसेवक राजा सिंग यांनी म्हटले आहे.
४. अकबरुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्याचा शिवसेना, अखिल भारतीय हिंदु महासभा, जनसंघ पक्ष आणि राम राज्य परिषद यांनी एकत्रित बैठक घेऊन तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जर काँग्रेस शासन आणि ‘एम्आयएम्’ यांनी कार्यक्रमांत विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सर्व संघटना रस्त्यावर उतरू. कोणत्याही परिस्थितीत आम्ही शोधायात्रा काढणारच ! यासाठी आम्हाला कोणाच्याही अनुमतीची आवश्यकता नाही, असे या संघटनांनी त्यांच्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे प्रदेश अध्यक्ष बी. महेशचंदर, हे होते. या बैठकीला बी. विशाल तोष्णीवाल, भगतराम अग्रवाल, डी. देवेंद्र, हिंदु महासभेचे प्रदेश संघटनमंत्री दिव्यांगसिंग लोध, दामोदर रेड्डी, राजभूषण राव, ए.एस्. प्रकाश राव, प्रवीण सोनी आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.
५. ‘षट्दर्शन संत-महंत संघ’ य आध्यात्मिक संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनी निर्वाण आखाड्यात संघाच्या बैठकीत सांगितले, ‘‘अकरुद्दीन ओवैसी यांची मागणी समाजात विष कालवणारी आहे. ओवैसी यांना रासुकाखाली अटक करायला हवी. अशा प्रकारे जनतेच्या भावना भडवणार्‍यांना खुले सोडले, तर समाजात अशांतता माजेल. ‘मिलाद-उन-नबी’च्या कार्यक्रमातही ओवैसी यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवे.’’
६. भाजपनेही ओवैसी यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. भाजपने म्हटले आहे, ‘‘ओवैसी यांच्या वक्तव्याने अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्यात संघर्ष निर्माण होईल. ओवैसी यांच्यावर राज्यशासनाने कठोर कारवाई करायला हवी.’’ (हिंदूंनो, भाजप आणि शिवसेना सोडले, तर एकाही राजकीय पक्षाने ओवैसी यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही. काँग्रेसचे राज्यकर्ते आणि विरोधी तेलगु देसम पक्ष हे दोघेही ओवैसी यांच्या वक्तव्यावर मूग गिळून गप्पच आहेत. तसेच विहिंप आणि संघ यांसारख्या बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनाही गप्पच आहेत. हिंदूंनो, हे सर्वजण काहीतरी करतील, अशी अपेक्षा न बाळगता आता तुम्हीच तुमच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने तीव्र संघर्ष उभारा, अन्यथा तुमचे अस्तित्वच धोक्यात येईल ! - संपादक )
चारमिनार परिसरातील श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात घंटा वाजवण्यास बंदी
भाग्यनगरमध्ये काँग्रेस शासनाचा औरंगजेबी फतवा !
भक्तांनी घंटा वाजवू नये म्हणून श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात
घंटा धरून उभे असलेले आंध्रप्रदेश शासनाचे पोलीस शिपाई !
    भाग्यनगर, २३ जानेवारी - भाग्यनगर शहरातील चारमिनार परिसरात असलेल्या श्री भाग्यलक्ष्मी मंदिरातील घंटा वाजवण्यावर आंध्रप्रदेशातील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस शासनाने बंदी घातली आहे. या ठिकाणी महाआरती करण्यासही शासनाने बंदी घातली आहे. बंदीची कार्यवाही करण्यासाठी शासनाने या ठिकाणी पोलीसही नियुक्त केले आहेत. (हिंदूंनो, मुसलमानांना खूश करण्यासाठी काँग्रेस शासन तुमच्या भावना कशा पायदळी तुडवत आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे. हिंदूंनो, आज मंदिरात आरती करू नका, घंटा वाजवू नका, असे सांगणारे काँगे्रसचे हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते उद्या मंदिरेच नकोत असे सांगून परवा सर्व हिंदूंनी मुसलमान व्हावे, असा फतवा काढायलाही कमी करणार नाही. हिंदूंनो, तुम्हाला पाकमध्ये रहात असल्याची अनुभुती देणार्‍या या काँग्रेसी राज्यकर्त्यांना तुम्ही अजून किती काळ सहन करणार ? हिंदूंनो, संघटित व्हा आणि तुमच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणार्‍यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन उभारून तुमचे अस्तित्व वाचवा ! - संपादक)




धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi