माघ शु. पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (२८.१.२०१२) या दिवशी प.पू. भक्तराज महाराजांचा प्रगटदिन आहे. त्यानिमित्त मला पुढील काव्य सुचले.
तेजोमय सोनकिरणांपरी । अमर प्रकाशित साज ।।
भक्तउद्धारार्थ अवतरले । प.पू. भक्तराज महाराज ।। १ ।।
सत्संगातूनी प्रगटली । सात्त्विकतेची शक्ती ।।तेजोमय सोनकिरणांपरी । अमर प्रकाशित साज ।।
भक्तउद्धारार्थ अवतरले । प.पू. भक्तराज महाराज ।। १ ।।
बाबांच्या हृदयी अनंत । माणुसकीची भक्ती ।। २ ।।
अंतरंगात देव दाविला । गुरु जीवनरथाचे सारथी ।।
अनाहूत या आत्मदीपाने । ओवाळली बाबांची आरती ।। ३ ।।
सदैव भजनांतूनी फुलविला । भक्तीचा महामार्ग ।।
शब्द-अमृतसरींमध्ये गवसतो । अध्यात्माचा स्वर्ग ।। ४ ।।
स्वानंद नामजप जाहता । तुटती सारे मोहपाश ।।
सद्गुरुकृपेने होतो । वाईट प्रवृत्तींचा नाश ।। ५ ।।
बाबा कार्यरत सूक्ष्म रूपाने ।
उद्या असो वा आज ।।
अखंड मुखी राहो नाम ।
सद्गुरु भक्तराज महाराज ।। ६ ।।
सद्गुरु प.पू. भक्तराज महाराजांच्या चरणी अर्पण !
- सौ. सुनयना पाटील, पाचपाखाडी, ठाणे.
