'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘लाईव्ह स्ट्रीम’च्या कार्यक्रमाविषयी धारवाड येथील हौशागौशांची असलेली उदासीनता !

१. मार्गदर्शनाला न येण्याची हौशागौशांनी दिलेली हास्यास्पद कारणे
    ‘मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (११.१२.२०११) या दिवशी पू. राजेंद्रदादा आणि पू. अनुताई यांचे ‘लाईव्ह स्ट्रीम’ या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून साधकांसाठी मार्गदर्शन होते. हे पहाण्याची सुविधा धारवाडच्या साधकांनाही देण्यात आली होती; पण केवळ तीन साधकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाला अनुपस्थित असलेल्यांना याविषयी विचारले असता त्यांनी मार्गदर्शनाला न येण्याची पुढील कारणे सांगितली.
अ. एकजण विवाहसमारंभाला गेला होता.
आ. एकीचे यजमान घरी असल्याने ते काहीतरी बोलतील; म्हणून ती आली नाही.
इ. दुकानातून सामान येणार असल्याने एकाला घरी थांबावे लागले.
ई. एकीने केसांना मेंदी लावली होती.
(यातूनच त्या सर्वांमध्ये साधनेचे गांभीर्य किती अल्प असेल, हे लक्षात येते. - संकलक)
२. ‘लाईव्ह स्ट्रीम’च्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याच्या चुकीची जाणीव करून दिल्यावर हास्यास्पद प्रायश्चित्त घेणार्‍या सौ. रोहिणी देशपांडे !
    ‘लाईव्ह स्ट्रीम’चे महत्त्व सांगितल्यावरही सौ. रोहिणी देशपांडे म्हणाल्या, ‘‘या कार्यक्रमात दैनिक, साप्ताहिक, मासिक ‘सनातन प्रभात’, तसेच विज्ञापने यांच्या येणे बाकीची भारतभरातील संख्या दाखवली जाते. त्याचा आम्हाला काही लाभ होत नाही. यातून आम्हाला सत्संगही मिळत नाही.’’ त्या वेळी त्यांना चुकीची जाणीव करून दिली आणि प्रायश्चित्त घ्यायला सांगितले. त्यावर त्यांनी एक आठवडा कशाय न पिण्याचे प्रायश्चित्त घेणार असल्याचे सांगितले. (पू. राजेंद्रदादा आणि पू. अनुताई ‘लाईव्ह स्ट्रीम’चा कार्यक्रम घेतात. प्रत्यक्ष संत घेत असलेल्या कार्यक्रमातूनही सत्संग मिळत नसल्याचे सांगणार्‍यांना ‘सत्संगाचा अर्थच अजून समजला नाही’, असे म्हणावे लागेल. - संकलक)
३. साधकांनो, अयोग्य दृष्टीकोन बाळगून साधनेची होणारी अपरिमित हानी टाळा !
    प.पू. डॉक्टरांची प्रकृती ठीक नसतांनाही ते आपत्काळात ‘साधकांना लाभ व्हावा’, यासाठी ‘लाईव्ह स्ट्रीम’ या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत; पण काही साधकांमध्ये याविषयीचे गांभीर्य न्यून आहे. आपल्या केंद्रातील प्रत्येक क्रियाशील साधक व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने या कार्यक्रमाचा लाभ घेत आहे ना, याकडे आपण लक्ष देऊया अन् अशा प्रकारचे अयोग्य दृष्टीकोन बाळगल्यास साधनेची होणारी अपरिमित हानी टाळूया.’
    - सौ. संगीता चौधरी, हुबळी, कर्नाटक.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi