‘सध्या साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास, तसेच स्वभावदोष आणि अहं यांमुळे होणारा संघर्ष पाहून एकदा मी सौ. अंजली गाडगीळ यांना विचारले, ‘‘पूर्वी साधक घरी अडचणी असूनही रात्री उशिरापर्यंत प्रसाराच्या सेवेसाठी थांबत असत. आता प्रत्येक जण काही तरी अडचण सांगत असतो. असे का ?’’ तेव्हा अंजलीताई म्हणाल्या, ‘‘मीही अशाच स्वरूपाचा प्रश्न प.पू. डॉक्टरांना विचारला होता.
तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘ज्यांना साधना समजली, ते खिस्ताब्द २०१२ पर्यंत टिकून रहातील आणि जे टिकून रहातील, ते माझे !’’ हे सूत्र आठवून ‘जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, मानसिक त्रास झाला, तरी देवाने ते सहन करण्याचे बळ देऊन आपल्या चरणांशी ठेवावे’, अशी प्रार्थना झाली.’
- सौ. आरती प्रसाद म्हैसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.