अजित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना निवडणूक आयोगाकडे खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
(प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणारे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव कोणते आहे ? - संपादक)मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना निवडणूक आयोगाकडे खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
बारामतीचे श्री. अनिल काळे यांनी ही याचिका दाखल केली असून ती ३ फेब्रुवारीला न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती (श्रीमती) साधना जाधव यांच्या खंडपिठासमोर सुनावणीसाठी येणार आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील चारचाकी गाडीचा चुकीचा उल्लेख केला, तसेच गाडीची किंमतही खोटी लिहिली होती. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघडकीस झाली. या प्रकरणी अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रतिज्ञापत्रात ‘दहावी पास’ अशी शैक्षणिक पात्रता नमुद करणार्या अजित पवार यांची शासनाच्या संकेतस्थळावर मात्र वाणिज्य शाखेतील पदवीधर (बी.कॉम.) अशी शैक्षणिक पात्रता कशी दाखवण्यात आली ?, हे सूत्रदेखील याचिकाकर्त्याने या याचिकेत मांडले आहे.