'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

वांद्रे येथे मुलांनी पळवलेल्या मोटारीने बालकाला उडवले

    मुंबई - वांद्रे परिसरात १८ वर्षांखालील चार मुलांनी एक चारचाकी गाडी पळवली आणि शर्ली राजन रस्त्यावरून भरधाव वेगाने चालवत तीन वर्षांच्या नील महाडिक याला उडवले. या अपघातात नील याच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. (आई-वडिलांचे योग्य संस्कार नसल्याने चंगळवादाला बळी पडून मुले अशा प्रकारे कृत्य करतात ! देशाचे भविष्य असलेल्या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी धर्मशिक्षणाशिवाय पर्याय नाही ! - संपादक) पळवलेली ही गाडी या चौघांपैकीच सेल्विन जॉर्ज याच्या आईची होती. घरातल्यांना कल्पनाही न देता ही गाडी घेऊन ते चौघेजण शर्ली राजन रस्त्यावर आले. तिथेच त्यांच्या हातून अपघात झाला. अपघात झाल्यावर नील याला साहाय्य करण्याऐवजी सेल्विन पळून गेला. अन्य तिघांना लोकांनी चांगलेच फटकवून पोलिसांच्या कह्यात दिले. नंतर सेल्विनही खार पोलीस ठाण्यात पोहोचला. नील याला केइएम् रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेल्विन  याला निष्काळजीपणाने वाहन चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले. सेल्विनच्या आईविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi