| श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी |
पुढील महिन्यात उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुसलमानांना ते मागतील ते द्यायचे आणि त्यांची मते मिळवून सत्तेवर यायचे असे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने ठरवले आहे. तेथे एकूण ४०३ जागा आहेत. त्यातील १३० जागांवर मुसलमान म्हणतील तो इच्छुक निवडून येणार आहे. आता लोकशाही मार्गाने आपण भारतात छोटीछोटी पाकिस्ताने निर्माण करीत आहोत.
भारतांतर्गत पाकिस्ताने निर्माण करणे, हा पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा मार्ग आहे का ? हे काम धीम्या गतीने चालले आहे म्हणून पाकिस्तान रागावले आहे काय ?

लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, समादेशक (सल्लागार) संपादक, सनातन प्रभात, मुंबई.
अब्राहम लिंकन आणि मोहनदास गांधी
गेली ६० वर्षे आम्ही पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत; परंतु त्यांचेकडून कसलाही आश्वासक प्रतिसाद मिळालेला नाही, अण्वस्रधारी आणि आतंकवादी पाकिस्तान नावाचा शेजारी ही भारतासमोरची आजची सगळ्यात मोठी समस्या आहे, असे उद्गार अमेरिकेतील भारताच्या राजदूत श्रीमती निरुपमा राव यांनी अलीकडे वाशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलतांना काढले. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला अमेरिकेशी ज्याचे शत्रुत्व असते त्या देशाविषयी, असे निराशेचे उद्गार कधी काढावे लागत नाहीत; कारण अमेरिकेत अब्राहम लिंकन जन्माला आले आणि भारतात मोहनदास गांधी जन्माला आले हा भेद आहे, याकडे दुर्लक्ष होत आले आहे. ज्यांना अमेरिका तोडायची होती आणि अमेरिकेच्या भूमीवर आपले स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र स्थापन करायचे होते त्यांच्याशी अब्राहम लिंकनने युद्ध केले आणि अमेरिका कोणत्याही परिस्थितीत एकसंध नि अभंग राहील, असा विश्वास त्याने शत्रूच्याही मनात उत्पन्न केला. अशाप्रकारे युद्ध करून त्याने राष्ट्रीय एकजूट साधली. यादवी युद्ध करून मुसलमानांना पाकिस्तान निर्माण करायचे असेल, तर त्यांना जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, असे जे उद्गार मोहनदास गांधींच्या तोंडून बाहेर पडले ते लिंकनच्या तोंडून कधी बाहेर पडले नाहीत. मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार आहे, असे समर्थन गांधींनी केले तसे लिंकन कधी करील, असा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. त्यामुळे लिंकनना कोणी कदाचित महात्मा म्हणत नसेल; पण त्याने आपले असे एकापेक्षा एक कर्तृत्ववान वारसदार निर्माण केले की ज्यांनी अमेरिकेच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी जंग जंग पछाडण्याचे सोडले नाही. निरुपमा राव परराष्ट्र खात्यातील कर्तृत्ववान, भीडभाड न ठेवता राष्ट्रहिताचा विधायक विचार करणार्या उद्यमशील अधिकारी आहेत. पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासमवेत अध्यक्ष क्लिंटन यांची भेट घेण्यासाठी १९९२ मध्ये मी अमेरिकेच्या दौर्यावर गेलो होतो तेव्हा निरुपमाबाई आम्हाला सोबत करीत होत्या. पाकिस्तानने निर्माण केलेला प्रश्न सुटावा, अशी त्यांना कळकळ आहे; पण हे काम म्हणजे इकडचा पर्वत उचलून तिकडे ठेवण्याचे आहे आणि ते एकट्याला झेपण्यासारखे नाही, असे त्या तेव्हा अनौपचारिक गप्पात म्हणाल्या होत्या. आज त्या अमेरिकेतील भारताच्या राजदूत म्हणून पाकिस्तान ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे, असे सांगत आहेत, तर ज्यांना ज्यांना म्हणून भारत नजीकच्या भविष्यात महासत्ता व्हावा, असे वाटते त्या सर्वांनी एकंदर परिस्थितीचा नव्याने विचार करायला पाहिजे.
गांधींची पराभूत मानसिकता
भारताचे भावविश्व गांधी विचाराने भारलेले आहे आणि त्या विचाराचा आदर्श प्रतिनिधी म्हणून नेहरूंनी स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान या नात्याने सगळी सूत्रे खेचून घेतली आहेत. तेव्हा या दोघांचे तेव्हाचे विचार आठवून पाहू या. गांधी जे म्हणाले ते सूत्ररूपाने पुढीलप्रमाणे आहे. मुसलमानांना फुटून निघण्याचा अधिकार आहे. जर ते यादवी युद्ध खेळतील तर त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. सावरकर आणि मुंजे हाती शस्त्र घेऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील, तर मी त्यांना साथ देणार नाही. हिंदूंमध्ये यादवी युद्ध करण्याची क्षमता नाही म्हणून भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तान निर्मितीला मान्यता देण्यावाचून काँग्रेसला गत्यंतर नाही. चांगल्या गांधी चरित्रात ही वाक्ये वाचावयास मिळतात. गांधी असे म्हणालेले नाहीत, असे गांधीवादी विचारवंत म्हणत नाहीत; पण गांधींचे मूल्यमापन करतांना या वाक्यांचा विचार होत नाही. जागतिक विचारविश्वातील हे सगळ्यात मोठे आणि चक्रावून सोडणारे आश्चर्य आहे.
मुसलमानांशी लढण्यास घाबरणारे; मात्र हिंदूंच्या विरोधात बाह्या सरसावणारे गांधी
गांधींच्या या तत्त्वज्ञानाचा अर्थ किती भयंकर होतो ते पाहिले पाहिजे. समूहश: मुसलमानांवर जिहादी प्रवृत्तीचा दाट पगडा असतो. ही प्रवृत्ती अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करू इच्छिते. इ.स. ७११ मध्ये इस्लामने भारतावर पहिले राजकीय आक्रमण सिंधमध्ये केले. हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती नष्ट करणे हा या स्वारीचा उद्देश होता. आजपर्यंत इस्लामने हे उद्दिष्ट मागे घेतलेले नाही. इस्लाममध्ये सातत्य आहे. दुर्दैवाने तसे सातत्य हिंदूंमध्ये दिसत नाही. भारतावर राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्व स्थापन करण्याच्या इस्लामच्या प्रयत्नांपुढे हिंदूंनी एकदाही हार मानलेली नाही. प्राण पणाला लावून, वनवास पत्करून, घरादाराची होळी करून न थकता बाराशे वर्षे हिंदू लढत राहिले; पण स्वत:कडे दुय्यम भूमिका येईल, असा एकही मुसलमानांचा अधिकार त्यांनी मान्य केला नाही. इस्लामचे जडमूळ भारतातून उपटून फेकून देण्याचा हिंदूंचा राष्ट्रीय सामूहिक निर्धार १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला आणि आपणास हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित केले तेव्हा समूर्त साकार झाला. पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्य केले आणि अटकेपार भगवा झेंडा फडकाविला. नंतर राजा राममोहन रॉय यांचेपासून ते विनायक दामोदर सावरकरांपर्यंत सर्व हिंदु नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध लढत असतांना मुसलमानांना या देशात हिंदूंपेक्षा वेगळ्या राजकीय आकांक्षा बाळगता येतील हे तत्त्व मान्य केलेले नाही. गांधी हे भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील पहिले नेते असे आहेत की, ज्यांनी मुसलमानांना या देशावर राजकीय वर्चस्व स्थापन करता येईल, हे तत्त्व मान्य केले आहे. विशिष्ट उद्दिष्टासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करणार्याला तेवढ्या एका कारणासाठीसुद्धा ती वस्तू प्राप्त होण्याचा अधिकार मिळतो आणि त्या वेळी न्यायान्याय्यतेचा निकष अप्रस्तुत ठरतो हा गांधीविचार आहे; परंतु या देशावर राजकीय वर्चस्व स्थापन करण्याच्या मुसलमानांच्या मोहिमेला तेवढ्याच सातत्याने बाराशे वर्षे हिंदूंनीही कृतीने आणि सशस्र सामूहिक विरोध केल्यामुळे हिंदूंनाही आपले वर्चस्व राखण्याचा अधिकार प्राप्त होतो, हे मात्र गांधी मान्य करीत नाहीत. जसे बाराशे वर्षे युद्ध जाहले तसेच ते पुढे चालू राहून निर्णय लागायला हवा होता; पण तसे झाले असते तर त्यात मुसलमानांचे उद्दिष्ट साध्य झाले नसते, हे गांधींना माहीत होते. म्हणून त्यांनी अहिंसेचे तत्त्व एकतर्फी हिंदूंना लागू केले. म्हणजे मुसलमानांना लढण्याचा अधिकार आहे; परंतु तो अधिकार हिंदूंना नाही. हिंदूंनी नि:शस्त्र व्हायचेच; पण तोंडी विरोधही करायचा नाही. याचा अर्थ थोडक्यात असा आहे की, मीर कासीमपासून औरंगजेब आणि महमद अली जीनांपर्यंत हिंदू भूमीवर इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांच्याबरोबर गांधी मांडीला मांडी लावून बसायला कासावीस झाले आहेत. मात्र पृथ्वीराज चौहानापासून शिवाजी महाराज आणि सावरकरांपर्यंत ज्यांचा हिंदु भूमीवर इस्लामी राष्ट्र स्थापायला विरोध आहे, त्यांच्याशी दोन हात करायला बाह्या सरसावून गांधी सज्ज आहेत.
मूळ समस्या पाक नसून गांधी विचार असणे
तेव्हा मूळ समस्या पाकिस्तान नसून गांधी विचार आहे, हे निरुपमा राव यांनी आणि सगळ्या भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे; कारण गांधी विचार पक्षपाती आहे. तो हिंदूंचे अधिकार अमान्य करतो. मुसलमानांचे अधिकार मान्य करतो. अधिकारासाठी जेव्हा लढाई होणार असते, तेव्हा हिंदूंना तो लढायला संमती देत नाही. गांधी पारतंत्र्यात देशाचे नेतृत्व करीत होते. नेहरू स्वतंत्र भारताचे नेतृत्व करीत होते. म्हणून गांधी विचाराशी प्रामाणिक राहून त्यांनी भारताच्या सैन्याला पाकिस्तानी सैन्याशी लढायला प्रतिबंध केला आणि काश्मीरचा मोठा अंश पाकिस्तानला भेट देऊन टाकला.
लोकशाही मार्गाने भारतात छोटीछोटी पाकिस्ताने निर्माण करणे
जमात-उद-दवा नावाची लष्कर-ए-तायबा या आतंकवादी संघटनेला लढाऊ युवक पुरवणारी पाकिस्तानांतील संघटना आहे. मुंबईवर नोव्हेंबर २००८ मध्ये जे सशस्त्र आक्रमण पाकिस्तानकडून झाले ते संघटित करण्याचे काम जमात-उद-दवाकडे होते. या संघटनेचे प्रमुख हाफिज मोहम्मद सईद याने काही दिवसांपूर्वी ‘पाकिस्तानचा सगळ्यात मोठा शत्रू भारत हाच आहे’, असे उद्गार काढले आहेत. अमेरिकेविषयी आमच्या मनात जेवढे शत्रुत्व नाही तेवढे भारताविषयी आहे, असे तो म्हणाला आहे. अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सय्यद अहमद खान यांनी इंग्रज आपले मित्र असून काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊ नका, असे मुसलमानांना सांगितले होते त्याची आठवण होते. आपले आजचे राज्यकर्ते तेच धोरण पुढे चालवत आहेत. त्यांना पाकिस्तान शत्रू वाटत नाही. भारतातील मुसलमानांवर अन्याय होत असल्याची सतत टोचणी त्यांना लागलेली असते आणि हे अन्याय हिंदु समाजाकडून होत असतात, हा त्यांचा निष्कर्ष असतो. तसलीमा नसरीन ही लेखिका बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांना वाचा फोडते म्हणून तिला भारत शासन आश्रय देत नाही. सलमान रश्दी या लेखकाने भारतात एखाद्या समारंभाला यायचे कि नाही, हे भारतातील मुसलमान ठरवतात आणि त्यांचा निर्णय सरकार मान्य करते. पुढील महिन्यात उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुसलमानांना ते मागतील ते द्यायचे आणि त्यांची मते मिळवून सत्तेवर यायचे असे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने ठरवले आहे. तेथे एकूण ४०३ जागा आहेत. त्यातील १३० जागांवर मुसलमान म्हणतील तो इच्छुक निवडून येणार आहे. आता लोकशाही मार्गाने आपण भारतात छोटीछोटी पाकिस्ताने निर्माण करीत आहोत. भारतांतर्गत पाकिस्ताने निर्माण करणे हा पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा मार्ग आहे का ? हे काम धीम्या गतीने चालले आहे म्हणून पाकिस्तान रागावले आहे काय ?
ब्रिटीश शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे कारण ‘भारतीय पोटभरू सैन्य आता आमच्या नियंत्रणात नाही’, असे अॅटली यांनी सांगणे
‘भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक ब्रिटीश संसदेत मांडल्यावर दुःखी मनाने माजी पंतप्रधान चर्चिल यांनी ब्रिटिशांना विचारले, ‘तुम्ही हिंदुस्थानला स्वातंत्र्य का देत आहात ?’ यावर अॅटली यांनी उत्तर दिले, ‘आम्ही हे स्वातंत्र्य देत आहोत; कारण भारतीय पोटभरू सैन्य आता आमच्या नियंत्रणात नाही आणि दुसरे कारण म्हणजे ब्रिटनजवळ स्वतःची जातिवंत अशी सेना (महायुद्धामुळे) इतकी नाही जी हिंदुस्थानवर नियंत्रण ठेवू शकेल.’ हे दुसरे कारण तर महायुद्धाचा परिणाम होता; मात्र जे पहिले कारण आहे त्याचा प्रणेता कोण होता ?’ - स्वातंत्र्यवीर सावरकर गांधींचे नाव त्यांनी कोठेही घेतले नाही, हे लक्षात घ्या !
- सीमा भावे, महू, मध्यप्रदेश (मासिक ‘हालात-ए-इन्दौर’, जून २०१०)