'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

माजी खासदार शिवाजीराव माने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये !

    मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - हिंगोली जिल्हा काँग्रेसपक्षाचे विद्यमान अध्यक्ष आणि दोन वेळा शिवसेनेकडून खासदारकी भूषवलेले माजी खासदार शिवाजीराव माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातील समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार अन् प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अखिल भारतीय युवक काँग्रसचे अध्यक्ष आणि कळमजुरी मतदारसंघाचे आमदार राजीव सातव अन् हिंगोलीचे आमदार गोरठेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात माझी गळचेपी होत होती, असे स्पष्टीकरण माने यांनी दिले.


धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi