'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

श्री वाग्देवीची मूर्ती ग्वाल्हेर येथे भाजप शासनाच्या कैदेत !

दुसरी मोगलाई
भाजपशासित मध्यप्रदेशात हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात !
हिंदूंनो, राज्यकर्त्यांना या हिंदुद्रोहाविषयी सनदशीर मार्गाने खडसावून विचारा !
  • श्री वाग्देवीच्या पालखी यात्रेवर भाजप शासनाची बंदी !
  • वसंत पंचमीच्या दिवशी श्री वाग्देवीच्या पालखी यात्रेसाठी धर्माभिमान्यांचे आमरण उपोषण !
  • पालखी यात्रेचे समर्थन करणार्‍या ५० उपोषणकर्त्या भाविकांना भाजप शासनाकडून अटक !
    भोपाळ, २७ जानेवारी - भोपाळमध्ये महाराजा भोज यांच्या प्रतिमेची स्थापना करणार्‍या शिवराजसिंग चौहान यांच्या भाजपच्या शासनाने महाराजा भोज यांचे आराध्य दैवत श्री वाग्देवी सरस्वतीची मूर्ती झाशी मार्ग पोलीस ठाणे, ग्वाल्हेर येथे कैद करून ठेवली आहे. श्री वाग्देवी सरस्वतीची मूळ मूर्ती इंग्लडमध्ये आहे. त्या मूर्तीची प्रतिकृती प्रतिवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी पालखीतून संपूर्ण शहरात फिरवली जाते. (हिंदूंना श्रद्धास्थानी असलेल्या देवतांच्या मूर्ती कारागृहात डांबून ठेवून भाजपच्या शासनाने गझनीचा महंमद आणि अत्याचारी औरंगजेब यांनाही लाजेने मान खाली घालायला लावली आहे ! हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! - संपादक)
उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न न करता त्यांना रुग्णालयात दाखल करणारे भाजपचे शासन !
    या मूर्तीची कैदेतून मुक्तता करण्यात यावी आणि पालखी यात्रेला अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नवलकिशोर शर्मा हे २१ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचे वजन ७१ वरून ६० किलोपर्यंत घटले आहे. त्यांच्या मूत्रपिंडास संसर्ग होऊन ते निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचे हिमोग्लोबिनही न्यून झाले आहे. त्यांचा आमरण उपोषणाचा निर्धार पाहून शासनाने त्यांना बलपूर्वक २५ जानेवारी या दिवशी इंदूरच्या एम्.वाय. रुग्णालयात दाखल केले आहे. श्री. शर्मा यांचे रुग्णालयातही अविरत उपोषण चालू आहे. (धर्मासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावणारे असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची शक्ती होय ! मात्र या धर्माभिमान्यांना एक नम्र विनंती आहे. आजच्या राज्यकर्त्यांना धर्माभिमान्यांच्या या त्यागाचे अजिबात मूल्य नाही. हे गंगा नदीच्या संरक्षणार्थ आमरण उपोषण करणार्‍या स्वामी निगमानंद यांच्या मृत्यूने स्पष्ट झाले आहे. थोडक्यात धर्मद्रोही राज्यकर्ते धर्मासाठी लढणार्‍यांंची हत्याच करत आहेत. त्यामुळे आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबून प्राण पणाला लावण्यापेक्षा या आंदोलनकर्त्यांनी काही दिवसांचे सांकेतिक अथवा साखळी उपोषण करून अथवा इतर प्रभावी मार्गांनी हे आंदोलन चालू ठेवावे. आज हिंदु धर्माला तुमच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या धर्माभिमान्यांची नितांत आवश्यकता आहे ! - संपादक )
पहिल्या छायाचित्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक 
आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नवलकिशोर शर्मा आमरण उपोषणाला 
बसलेले दिसत आहेत, तर दुसर्‍या छायाचित्रात उपस्थित धर्माभिमानी दिसत आहेत.
धारमध्ये चालू आहे, भाजपचे ढोंगी हिंदुत्व आणि सामान्य हिंदु धर्माभिमान्यांचे खरे हिंदुत्व यांच्यात लढाई !
    देशात एका बाजूला प्रजासत्ताकदिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, तर दुसर्‍या बाजूला श्री वाग्देवी सरस्वतीच्या पालखी यात्रेचे समर्थन करणे आणि सत्याग्रह करणे या आरोपाखाली धारमधील ५० धर्माभिमानी हिंदूंना भाजपचे शासन कारागृहात डांबते. (जे काम अत्याचारी मोगलांना आणि इंग्रजांना जमले नाही, ते भाजपचे शासन करत आहे. देशातील यच्चयावत हिंदुद्वेष्ट्यांना भाजपच्या या भूमिकेने अत्यानंदच झाला असेल ! भाजपच्या या अशा भूमिकेमुळेच त्याच्यापासून हिंदु दुरावले जात आहेत ! - संपादक)
देवतांना कैदेत ठेवणार्‍या शासनावर आणि शासनाच्या या निर्णयाचा विरोध न करणार्‍यांवर कधीच देवतांची कृपा होणार नाही, हे लक्षात घ्या !
    शासनाचे कार्य केवळ शांतीव्यवस्था प्रस्थापित करणे नसून जनतेच्या भावना आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा आदर करणे, हे सुद्धा आहे. आमरण उपोषणाला एक आठवडा होऊनही शासनाकडून कोणीही या उपोषणकर्त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य हिंदु जनतेच्या भावना दुखावल्या आहेत आणि तो एक संवेदनशील विषय बनला आहे. श्री वाग्देवी सरस्वतीची मूर्ती कैदेतून मुक्त करून तिची वसंत पंचमीच्या दिवशी धार शहरात पालखी काढण्यासाठी अनुमती द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे. (हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या देवतांची मिरवणूक काढण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंना आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतो, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती असेल ? हिंदूंनो, पक्ष कोणताही असो, तुमच्या स्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या आणि संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! - संपादक)

   
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi