'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

डोंबिवली येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या !

 डोंबिवली, २४ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाची होणारी विटंबन रोखण्यासाठी येथील पश्चिम भागात रेल्वेस्थानकाच्या बाहेर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका जनप्रबोधन चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. याला डोंबिवलीमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, हिंदु महासभा, श्री संप्रदाय, राजाजी शिवबा विचार प्रचारक मंडळ, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते, तसेच ह.भ.प. चंद्रशेखर शुक्ल, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर, श्री संप्रदायाचे दक्षिण जिल्हाप्रमुख श्री. दिलीप घाग आदी मान्यवर उपस्थित होते.
विषय मांडतांना प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर
    ‘२६ जानेवारी’ला म्हणजेच प्रजासत्ताकदिनी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज अगदी त्या दिवशी दुपारपासूनच रस्त्यावर, गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. शिवाय ‘प्लास्टिक’च्या वापरामुळे ते लगेच नष्टही होत नाहीत आणि अनेक दिवस राष्ट्रध्वजाची ही विटंबना असहाय्यपणे पहावी लागते. ही विटंबन रोखण्यासाठी समितीच्या वतीने या जनप्रबोधन चळवळीचे आयोजन करण्यात आले होते.
    विषय मांडतांना श्री. दुर्गेश परुळकर म्हणाले की राष्ट्रध्वजाचा अपमान हा साधुसंतांचा, देशातील सर्व क्रांतिकारकांचा अपमान आहे. हा होऊ नये यासाठी कायदा केला आहे; पण आता तो आपला स्वभाव बनायला हवा. आज आपण संघटित झालो, तरच देशातील ध्वजाचा अपमान करणार्‍या मंडळींवर वचक बसेल. या वेळी श्री संप्रदायाचे श्री. दिलीप घाग, समितीचे श्री. अजय संभूस आणि सनातन संस्थेच्या सौ. अल्पना जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
क्षणचित्रे
 * अनेक नागरिक गाडी थांबवून स्वाक्षरी करत होते.
 * शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सौ. अस्मिता खानविलकर यांनी आंदोलनाने प्रभावित होऊन त्यांच्या कार्यक्रमात समितीला प्रदर्शन लावण्याची विनती केली.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi