'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

अत्याचारी मोगली राजवटीचा उदोउदो करणारे ‘सन्स ऑफ बाबर’ नाटक !

    वर्ष १५२६ मध्ये बाबराने दिल्लीतील सत्ता कह्यात घेतली आणि त्यानंतर सार्‍या हिंदुस्थानभर मोगलांची सत्ता पसरली. स्वतःच्या वडिलांना किंवा भावांना ठार मारूनच सत्ता हस्तगत करणारे मोगल बादशहा क्रूर असतांना त्यांचे उदात्तीकरण करणारे ‘सन्स ऑफ बाबर’ (बाबराचे पुत्रपौत्र किंवा वंशज) हे नाटक रंगभूमीवर आले आहे.

काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या या नाटकात बाबर ते औरंगजेब आदींचे हिंदुस्थानवरील शासन कसे चांगले होते आणि त्यांच्या शासनपद्धतीतील काही भाग सध्याच्या काळातही कार्यान्वित केल्यास कसे चांगले होईल, ते सुचवण्यात आले आहे.
     मोगलांचा सत्य इतिहास सांगायचा झाला, तर कित्येक ग्रंथ प्रकाशित करावे लागतील. औरंगजेबाच्या जुलमी सत्तेविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्याशा मावळ्यांसह रणशिंग फुंकले. त्यांचा एकेक किल्लेदार औरंगजेबाविरुद्ध कशी कडवी झुंज देत असे याचे उदाहरण आजच्या लेखात पाहूया.

    आज हिंदु धर्माची स्थितीही अशीच आहे. आपणही शिवाजीचे मावळे बनून बाबराची पिलावळ असलेले हिंदुधर्मद्वेष्टे आणि धर्मद्रोही यांच्याविरोधात संघटित होऊन हिंदु धर्मरक्षण करूया. ‘सन्स ऑफ बाबर’ नाटक कायमचे बंद होईपर्यंत लढा देऊया !
संकलक - श्री. संजय मुळये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
औरंगजेबाला साडेपाच वर्षे झुंजवणारा ‘रामसेज’ किल्ला !

अ. किल्ला लढवणार्‍या किल्लेदाराचे नाव अज्ञात असणे; पण कर्तृत्व मात्र सर्वदूर पसरणे : ‘औरंगजेबाने आपल्या दख्खनच्या विजयाचा प्रारंभ एक छोटेखानी किल्ला घेऊन करायचे ठरवले. या दुर्गाचे नाव होते ‘रामसेज.’ नाशिकपासून पेठच्या रस्त्यावर १४ कि.मी. अंतरावर हा लहानसा (छोटेखानी) दुर्ग आहे. औरंगजेबाची एक लहान म्हणजे १५ सहस्र लोकांची सेना हा रामसेज दुर्ग घेण्यास धावून आली. या सेनेत हत्ती, घोडे, तोफा आणि दारूगोळा होता. भरपूर (मुबलक) खजिना होता. सर्वकाही होते. या सेनेचा अधिपतीही एक बलाढ्य मुघल होता. त्याचे नाव ‘शहाबुद्धीनखान गाझीउद्दीन फिरोजजंग.’
    किल्ल्यावर काय होते ? या किल्ल्यावर तोफा, दारूगोळा, बंदुका आणि खजिना काही नव्हते. एक विषम युद्ध होते हे ! आणि किल्ल्यावर लोक तरी किती होते ? तेही धड माहीत नाही; पण त्या किल्ल्याचा आकार आणि पसारा पाहिल्यावर साधारण ६००-७०० लोक त्या किल्ल्यावर असावेत. किल्लेदाराचे नावही आपल्याला माहीत नाही; पण त्याचे कर्तृत्व मात्र सांगता येईल.
आ. मुघल सैन्याला किल्ला सहज मिळेल असे वाटणे; मात्र अर्धाअधिक किल्ला चढून गेल्यावर त्यांच्यावर मोठे धोंडे धडाधडा येणे : शहाबुद्दीनखान फिरोजजंगाने आक्रमण केले. तेव्हा मुघल सैन्याला वाटत होते, ‘आरडाओरडा करत आपण दुर्ग घ्यावयास जाऊ, तेव्हा या आरडाओरड्याचा आणि घोड्यांच्या टापांचा आवाज अन् सैन्याच्या हालचालीने उडालेले धुळीचे लोट पाहून किल्लेदार किल्ला सोडून निघून जाईल, मराठे पळून जातील.’ असा विचार करत मुघल चालून आले. किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकार झाला नाही. अर्धाअधिक किल्ला चढून गेल्यावर मुघलांना वाटले, ‘किल्ला आता हातात आला’; पण नाही ! किल्ल्यावरून हे असले मोठे धोंडे आले, धडाधडा आले.
इ. हा लहान दुर्ग औरंगजेबाच्या त्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध साडेपाच वर्षे झुंजत ठेवणारे ‘धन्य ते कि¼ेदार अन् धन्य ते मावळे !’ : दगड अंगावर आल्यावर मुघलांना माघार घ्यायला लागली. थोड्या वेळानंतर त्यांनी परत हल्ला चढवला; पण मग वरून गोफणीतून धोंडे यावयास लागले. मुघलांना पुढे जाता येईना. एक लक्ष्मणरेषा बनवली गेली. या अदृश्य लक्ष्मणरेषेच्या पुढे मुघल आले की, वरून गोफणगुंडा चालू  होई. मुघलांना ही रेषा ओलांडणे फार कठीण झाले. रामसेज हा एक साधा, लहान दुर्ग आहे. रायगड, राजगड तर दूरच राहिले. रामसेजचा हा लहानसा दुर्ग औरंगजेबाच्या त्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध साडेपाच वर्षे झुंजत होता. त्या अनामिक किल्लेदाराच्या मनात शिवाजीराजांनी घालून दिलेला स्वातंत्र्याचा मंत्र घुमत होता. त्याला एकच गोष्ट माहीत होती, ‘आपल्याला हा दुर्र्ग न्यूनतम एक वर्ष तरी झुंजवायचा आहे.’
 (संदर्भ : इतिहासतज्ञ श्री. निनाद बेडेकर यांनी २७.३.१९९७ या दिवशी श्रीक्षेत्र डेरवण येथे शिवजयंती उत्सवात केलेले अध्यक्षीय भाषण)
    (छ. शिवाजी महाराजांनी एकदा म्हटले होते, ‘आज मजकडे ३६० दुर्ग आहेत. एक ना एक दिवस आलमगीर दक्षिणेत उतरेल. माझा एक एक दुर्ग मी त्या आलमगीराविरुद्ध एक एक वर्ष लढवीन. त्या आलमगीरास दक्षिण काबीज करावयास ३६० वर्षे लागतील.’ रामसेजचा किल्लेदार आणि त्याच्या शूर मावळ्यांनी महाराजांचे शब्द खाली पडू दिले नाहीत. त्या अनामिक मावळ्यांची खरोखरच धन्य आहे ! - संकलक)  (समाप्त)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi