२४ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २७ ते २९ या कालावधीत लातूर येथे पार पडले. त्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य संमेलनाची आवश्यकता काय आहे, हे या लेखात विशद केले आहे.
सावरकर साहित्य अभ्यास मंडळाची मुहूर्तमेढ
२८ मे १८८३ ते फेब्रुवारी १९६६ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ऐहिक जीवनकाळ ! धन्योऽहं धन्योऽहं ! ‘अनादी मी अनंत मी !’ असा घोष करीत २६ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रयोपवेषनाने आत्मार्पण केल्यानंतर पुढील वर्षीच १० एप्रिल १९६७ च्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी ‘सावरकर सदन’मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई’ या संस्थेची स्थापना झाली. सावरकरांचे स्वीय साहाय्यक कै. शांताराम शिवराम तथा बाळराव सावरकर यांनी पुढाकार घेऊन स्वा. सावरकरांच्या तेजस्वी आणि राष्ट्रोधारक साहित्याच्या माध्यमातून अभिजात निरपेक्ष देशभक्तीचा वारसा भावी पिढ्यांना मिळत रहावा, त्याचा प्रसार आणि प्रचार सातत्याने अखंड होत रहावा, या मुख्य उद्देशाने प्रेरित असलेल्या संस्थेची स्थापना व्हावी, अशा विचारांची संकल्पना बैठकीत सादर केली.
या बैठकीस श्री. अंनत काणेकर, प्रा. व.दि. कुलकर्णी. के.वि. घारपुरे, सुधीर फडके, दत्तप्रसन्न काटदारे, ज.द. जोगळेकर, प्रा. सं.ग. मालशे, दि.वि. गोखले, रा.म. आठवले, अप्पा कासार, विद्याधर गोखले, पुण्याचे शंकरराव तथा मामा दाते आदी विचारवंत आणि सावरकरप्रेमी मंडळी उपस्थित होती. मी या बैठकीचा एक साक्षीदार होतो. बैठकीत श्री. रा.म. आठवले यांनी वरील संस्था स्थापन व्हावी, असा ठराव मांडला आणि संस्थेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्वा. सावरकरांच्या अभिजात, प्रतिभाशाली, राष्ट्र अभ्युदायी, साहित्याचा, वाङ्मयाचा आणि त्यांच्या राष्ट्रहितैषी तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा की, ज्यामुळे देशाची भावी पिढी राष्ट्रप्रेमाने प्रेरित आणि समृद्ध व्हावी, असे व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून गेली ४४ वर्षे अभ्यास मंडळ विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे.
स्वा. सावरकर जन्मशताब्दीच्या वर्षापासून सावरकर साहित्य संमेलन हा उपक्रम मंडळाने हाती घेतला आहे. आतापर्यंत अशी २३ साहित्य संमेलने विविध ठिकाणी पार पडली असून भविष्यात होत रहातील, असा मंडळास विश्वास वाटतो. साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यासंगी, विचारवंत आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळात सहभागी झाले आहेत. सावरकर साहित्य प्रेरणादायी आहेच; पण त्याशिवाय राष्ट्राच्या भविष्याचा मार्गदीप म्हणून त्याची महती आहे. विविध स्थळी संपन्न झालेल्या सावरकर साहित्य संमेलनातून त्यामुळे विज्ञानवादी राष्ट्रभक्तीच्या विचारांना उजाळा आणि उत्तेजन मिळाल्याचे अनुभवास आले आहे.
राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणार्या साहित्यासाठी सावरकरांच्या साहित्य संमेलनाची आवश्यकता
सध्या मराठी साहित्य संमेलनाला उत्सवाचे आणि राजकारणाचे स्वरूप आले आहे. त्यात देशभक्तीचे साहित्य नसते. ललीत साहित्याचेच ते संमेलन असते. अन्य साहित्य संमेलने प्रतिक्रिया म्हणून जातीय दृष्टीकोनातून भरविली जातात. मराठी साहित्याचा प्रवाह शृंगार आणि अश्लीलतेच्या दिशेने वाहतो आहे. देशभक्ती किंवा राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणारे साहित्य सध्या अभावाने निर्माण होते. म्हणूनच सावरकर साहित्य संमेलन भरविणे अत्यावश्यक आहे, असे वाटते. हे संमेलन देशभक्तीने भारलेल्या सर्व साहित्याचे आहे. आज स्वातंत्र्य आहे; पण सुराज्य कुठे आहे ? एक राजकीय स्वातंत्र्य आहे; पण बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक पारतंत्र्य आहे. जे साहित्य भारतीय संस्कृतीची निंदानालस्ती करते, त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
देशाच्या अधःपतनाकडे चाललेल्या प्रवाहाला थोपवण्यासाठी सावरकरांसारख्या साहित्याची आवश्यकता
मराठीला दैन्यवस्था प्राप्ती झाली आहे. इंग्रजांच्या काळात जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या, तेवढ्या आज आहेत. इंग्रजी माध्यमामुळे मराठी साहित्य वाचणारी पिढी कमी होत आहे. हिंदुत्वाची गर्जना करणारेसुद्धा आपल्या मुलांना आणि नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करीत आहेत. मराठी, स्वदेशी यांची सर्वत्र टिंगलटवाळी होत आहे. बहुराष्ट्रीय आस्थापनांनी सारे जीवन व्यापले आहे. दूरदर्शन, प्रसारमाध्यमे विकृत आणि असंस्कृत प्रचार करीत आहेत. भ्रष्टाचाराने थैमान मांडले आहे. परकीय शत्रूंनी आणि अंतर्गत शत्रूंनी देश पोखरला आहे. अशा स्थितीत देशाचा प्रवाह अधःपतनाकडे चालला आहे. तो पुन्हा देशभक्तीकडे न्यायचा असेल, तर सावरकर साहित्याशिवाय पर्याय नाही.
करमणूक हे काही साहित्याचे कर्तव्य नाही - सावरकर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना सावरकरांनी त्यांचे साहित्यविषयक विचार स्पष्टपणे मांडले आहेत. ‘‘मनुष्याचे अधिकाधिक हित ज्यामुळे साधले जाते, ते साहित्य’’ ही सावरकरांची व्याख्या आनंद नि करणमणूक मानवास हितकारक आहे म्हणून त्याचा अंतर्भाव साहित्यात योग्य प्रमाणात झाला पाहिजे; पण केवळ करमणूक हे काही साहित्याचे कर्तव्य नाही.
नवसाहित्य केवळ पुरोगामी आहे, म्हणून ग्राह्य नव्हे !
सावरकर अत्यंत पुरोगामी होते. पण पुरोगामी साहित्याविषयी मत मांडतांना म्हणतात, ‘वाङ्मय केवळ पुरोगामी आहे, नवीन आहे म्हणून ते ग्राह्य किंवा अग्राह्य ठरत नाही. नवीन साहित्य सत्य आणि तथ्य या निकषावर टिकले पाहिजे, तरच ते ग्राह्य धरावे.’ सावरकरांच्या हा साहित्य विचार त्यांच्या तीव्र बुद्धीवादाचा द्योतक आहे. सावरकरांनी साम्यवादी आणि काम्यवादी साहित्यावर कडाडून हल्ला केला. काम्यवादी साहित्य प्रâॉईडच्या विकृत कामाविचारावर आधारलेले आहे. तर साम्यवादी साहित्य द्वेषाने, रागाने पछाडले आहे. नवसाहित्य बीभत्स आणि ओंगळवाण्या भाषेत आहे. केवळ राष्ट्राचा, समाजाच्या हिताचा विचार करून लिहिलेले सावरकर साहित्य आहे.
राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सावरकरांचे साहित्य
स्वदेश आणि स्वधर्म हे राष्ट्राचे श्वास आणि उच्छ्वास आहेत. ते जर पुनरुज्जीवित करायचे असतील, तर सावरकर साहित्य हेच रामबाण औषध आहे. राष्ट्रभावना जागृत करणे, हाच सर्व समस्येवरचा उपाय आहे. देशभक्ती जर निर्माण झाली, तर भ्रष्टाचार संपेल. परदेशी जाणारे आणि गेलेले बुद्धीवान तरुण परत देशात येऊन देशाची सेवा करतील. सावरकर साहित्यामुळे देशभक्ती तरुणांच्या रक्तात निर्माण होईल. युवा पिढी शूर आणि पराक्रमी होईल. सर्वसाधारण त्याग करण्याची भावना समाजात निर्माण करण्यासाठी सावरकर साहित्य आदर्श ठरेल.
सावरकरांचे क्रांतीकारी जीवनच साहित्यात उतरलेले !
तर सावरकर साहित्य आणि सावरकर जीवनही अभिन्नच आहेत. सावरकरांचे जीवन म्हणजे एक साहित्याची अखंड स्वरधारा होती. त्यांचे जीवन म्हणजे महाकाव्य. त्यांचे जीवन म्हणजे एक महानाट्य. त्यांचे जीवन अलौकिक आणि त्यांचे साहित्यही अलौकिक साहित्य. सावरकरांचे साहित्य त्यांच्या जीवनापासून वेगळे काढताच येत नाही. कारण सावरकरांच्या जीवनाची जी प्रेरणा, तीच त्यांच्या साहित्याची प्रेरणा. सावरकरांच्या जीवनाचा जो ध्येयवाद तोच त्यांच्या साहित्याचा ध्येयवाद. सावरकर जसे जीवन जगत होते, तसे त्यांच्या जीवनाला अनुरूप असे साहित्य प्रसवत होते. सावरकरांच्या साहित्यातून सावरकर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकट होतात. साहित्यात आशयाला महत्त्व की, व्यक्तीला हा प्रश्न उपस्थितीत केला जातो. सावरकर अभिव्यक्तीपेक्षा आशयाला महत्त्व देतात, असे दिसते. कलावंताने सामाजिक बांधिलकी स्वीकारावी, असा त्यांचा आग्रह असे. सावरकरांचे जीवन कि साहित्य मोठे असा संभ्रम निर्माण होतो, याचे कारण त्यांच्या जीवनाइतकेच त्यांचे साहित्य भव्य आणि उदात्त आहे. कारण त्यांचे जीवन जेवढे प्रेरणादायी तेवढेच त्यांचे साहित्यही प्रेरणादायी. महाकाव्याचा विषय व्हावा, असे जीवन जगलेले हा महाकवि आहे. महाकाव्याचा विषय व्हावा, असे संघर्षमय जीवन जगलेला हा नाटककार आहे़ महान साहित्यिक आपल्या साहित्यातून स्वतःचे असे नवीन संकेत निर्माण करीत असतो. सावरकर अशा साहित्यिकांमध्ये अग्रणी होते.
सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील स्वातंत्र्य सुक्ते !
सावरकरांचे साहित्य हे साहित्य शास्त्रांच्या सर्व निकषावर उतरणारे साहित्य आहे. साहित्य म्हणजे ‘हितेन सहितं’ ज्यामध्ये सार्या विश्वाचे हित सामावलेले आहे, त्याला साहित्य म्हणतात. सावरकर साहित्य देशाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी विश्वकल्याणाची इच्छा केली, तशी सावरकरांनी केली. त्यांची स्वतंत्रता देवी ही केवळ भारताची नाही, तर विश्वाची आहे. सावरकरांचे साहित्य देशासाठी आहे. सावरकरांनी आपले साहित्यच काय, सर्व शक्ती मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील स्वातंत्र्य सुक्ते आहेत.
सावरकर म्हणतात, ‘साहित्य हे राष्ट्राच्या बुद्धीचे, शौर्याचे प्रतिक आहे. जे राष्ट्र दुबळे, खुरटे असते, त्यांचे साहित्य खुरटे असते. त्यांचे साहित्यिकसुद्धा खुरटे आणि दुबळे असतात.’ ‘राष्ट्रासाठी साहित्य’ हा विचारच सावरकरी आहे. राष्ट्र हा त्यांचा देव होता म्हणून त्यांचे साहित्य राष्ट्राला समर्पित आहे. सावरकरांचा साहित्य विचार स्वतंत्र आहे. त्यांना राष्ट्र स्वतंत्रता जशी हवी होती, तशी साहित्य स्वतंत्रताही हवी होती.
देशभक्तीपर साहित्य लिहिणारे अनेक साहित्यिक होऊन गेले; पण त्यांच्यात आणि सावरकरांत एक फरक आहे. ते लेखक प्रथम साहित्यिक आहेत आणि नंतर देशभक्त आहे; पण सावरकर प्रथम देशभक्त आणि नंतर साहित्यिक होते. त्यांचे साहित्य विचार, भारतीय साहित्य शास्त्राच्या विचारांशी सुसंगत आहे. नंतर देशभक्तीने तो फुलला आहे. त्यांचे साहित्य इहवादी आहे; पण पारलौकिक दुर्लक्षणारे नाही. बुद्धीवादी आहे; पण नास्तिक नाही. सुधारणावादी आहे; पण दिव्य परंपरेची आणि उज्वल इतिहासाची निंदा करणारे नाही. त्यामुळे तत्त्वज्ञान, अध्यात्म, व्यवहार आणि कर्मयोग यांचे अपूर्व मिश्रण त्यांच्या साहित्यात आहे.
आजच्या प्रत्येक राष्ट्रीय समस्येला सावरकर साहित्यात उत्तर !
सावरकरांना महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात अग्रगण्य स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या साहित्यात हिमालयाची भव्यता, सागराची सखोलता, गरुडाची झेप आणि विजेची चमक हे गुण आहेत. ‘लेखणी आणि वाणी या शक्ती ज्यांनी देशाला वाहिल्या’ असा साहित्यिक संपूर्ण देशात नाही. त्यांचे साहित्य देशभक्ताला स्फूर्ती देणारे तत्त्वचिंतकाला विचार करायला लावणारे, स्वातंत्र्य आणि समाजहित यासाठी शुरा धर्मयुद्धाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या लेखणीच्या धारदार टोकावर हुतात्म्यांची मालिका पोसली. त्यांचे साहित्य वाचून चैनी आणि चंगळवादी तरुण क्रांतीकारक झाले आणि आनंदाने हसत फासावर गेले. भारतीय साहित्याच्या इतिहासातील ही अभूतपूर्वक आणि अजोड घटना आहे. भारत बलशाली, वैभवशाली आणि सुजलाम, सुफलाम करायचा असेल, तर सावरकर साहित्याची संमेलने विविध ठिकाणी संपन्न व्हायला हवीत. एक ना एक दिवस सावरकरांचे साहित्य हा देशभक्तीचा वेद सार्या राष्ट्राचे संविधान बनेल यांत शंका नाही. आजच्या प्रत्येक राष्ट्रीय समस्येला सावरकर साहित्यात उत्तर आहे.
जोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, तोपर्यंत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी राहील, असे म्हटले जाते. हे तर खरेच आहे; पण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, रामदासांचा दासबोध, लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य आणि सावरकरांचे साहित्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, संपूर्ण सत्य आहे. शेवटी सावरकर असे एकच साहित्यिक या विश्वात आहेत की, त्यांनी प्रसविलेल्या सुमारे ११ सहस्र पृष्ठांच्या साहित्यावर स्वतंत्र साहित्य संमेलने संपन्न झाली आणि भविष्यात होत रहातील.