शिवसेनेचे खासदार अडसूळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या बातमीचे प्रकरण !
मुंबई, २८ जानेवारी - शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेची बातमी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आज प्रसिद्ध झाली. या बातमीवरून आज दुपारी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर असलेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर ५० ते ६० जणांनी आक्रमण करून तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. या तोडफोडीत कार्यालयाच्या स्वागतकक्षाची हानी झाली.
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी एक खासदार पक्षात प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते. त्या खासदाराचे नाव त्यांनी उघड केले नव्हते. यावरून सर्वत्र चर्चा चालू झाली होती. त्यामध्ये अनेकांची नावे होती. त्यात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांचेही नाव होते. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात बातमी देतांना आनंद अडसूळ यांच्या नावासमोर प्रश्नचिन्ह घालून तशा शिर्षकाखाली एक चौकट त्या बातमीत छापली होती. त्यावरून संतप्त झालेल्या आनंद अडसूळ हे अध्यक्ष असलेल्या ‘को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन’च्या कार्यकर्त्यांनी दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर निषेध मोर्चा नेला. हे कार्यकर्ते दैनिकाच्या संपादकांना या वृत्ताविषयी निवेदन देण्यास गेले होते. त्या वेळी तेथील सुरक्षारक्षकांशी झालेल्या वादावादीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील स्वागतकक्षाची तोडफोड केली. याविषयी आनंद अडसूळ यांचे पुत्र आमदार अभिजित म्हणाले की, ही तोडफोड करणारे शिवसैनिक नसून ते तर सर्वसामान्य नागरिक आहेत. मुंबई, २८ जानेवारी - शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेची बातमी दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आज प्रसिद्ध झाली. या बातमीवरून आज दुपारी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर असलेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयावर ५० ते ६० जणांनी आक्रमण करून तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. या तोडफोडीत कार्यालयाच्या स्वागतकक्षाची हानी झाली.
बातमीची खातरजमा का केली नाही ? - आनंद अडसूळ
खासदार आनंद अडसूळ म्हणाले, ‘‘मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. राज्य आणि केंद्र स्तरावर कामगार संघटनेचे कार्य करत आहे. अशा वेळी माझ्या संदर्भातील वृत्त देतांना माझ्याकडे खातरजमा न करता ते प्रसिद्ध केले जाते, याचाच अर्थ ते वृत्त माझी अपकीर्ती करण्यासाठीच होते, असे स्पष्ट होते.’’
आनंद अडसूळ यांच्या पक्षांतराच्या संदर्भातील वृत्त देतांना त्यांच्याकडे खातरजमा केली नाही, ही आमची चूक झाली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.