काही महानगरपालिका, जिल्हा परिषदा, तसेच अन्य काही राज्यांत विधानसभांच्या निवडणुका घोषित झाल्या असून त्यामुळे लुटालुटीसाठी हातघाईवर येण्याचे प्रकार वाढत आहेत. या पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसर्या पक्षाच्या दारात जाऊन हात पसरले जातात, घासाघीस केली जाते. कालपर्यंत मी तुम्हाला नावे ठेवीत होतो; पण आता जेथे मी पहिल्यांदा घरठाव केला तेथे माझे बिनसले असून तुम्ही मला आपला म्हणा म्हणून गळ घातली जाते.
गडी दणकट असेल तर दुसरे पक्षही त्याला आपला म्हणायला पटकन सिद्ध होतात. निवडणूक जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट असते. त्याकरिता जो पक्ष तिकीट देईल तो सगळ्यात चांगला पक्ष आणि जो जिंकणारा असेल, तो सगळ्यात चांगला इच्छुक अशी सोपी समीकरणे बनविली जातात. तत्त्व तकलादू होते आणि सोय सरस ठरते. निवडून का यायचे तर अल्पावधीत कोट्याधीश होण्याचा तो राजमार्ग असतो. राजकारणी नावाची एक नवी जात स्वतंत्र भारतात काँग्रेस संस्कृतीने जन्माला घातली आहे. या जातीला चिरतारुण्याचे वरदान असते. या जातीला कसलेही पाप लागत नाही. ही जात सदैव पुण्याच्या राशीत लोळत असते. म्हणून या जातीत आपला समावेश करून घेण्यासाठी प्रत्येक महत्वाकांक्षी आणि तामस प्रकृतीचा माणूस जीव पाखडत असतो. म्हणजे काँग्रेस संस्कृतीची भारतीय राजानीतीला देणगी काय तर तिने राजकारण्यांची एक स्वतंत्र जात निर्माण केली आणि मग त्या जातीने सगळा हिंदु समाज जातीजातीच्या छोट्याछोट्या तुकड्यात विखरून टाकला. आता प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान बाळगीत स्वच्छंदी व्यक्तीगत जीवन जगायचे आहे. सामाजिक बांधिलकी आणि देशाभिमान हे विषय अडचणीचे आणि कालबाह्य झाले आहेत. या नव्या राजकीय जीवन शैलीचे राष्ट्रवादी पक्षाचे दुर्योधन अजितदादा पवार यांनी उघडेनागडे समर्थन केले आहे. ‘फोडाफोडीत पाप नाही’, असे त्यांना वाटते. कसे वाटणार ? कारण विश्वासघात करून फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात त्यांचे काका शरद पवार यांनी सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर यशवंतराव चव्हाणांनी अन्य पक्षांतील अनेक धेंडे काँग्रेस संस्कृतीत आणली. तळागाळातील जनतेचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष काँग्रेसकडून होणार नाही, असे वाटून बंडखोरीने ज्यांनी नव्या राहुट्या उभारल्या होत्या, त्यांना परिवर्तनाचा विश्वास देऊन चव्हाणांनी घरी परत बोलावून घेतले होते. नवा धर्म स्थापन करून त्यांच्या झेंड्याखाली गोळा होण्याचे प्रेषिताकडून आवाहन केले जाते तसा तो यशवंतरावांचा आविर्भाव होता. त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. पवार वसंतदादांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. विधानसभा चालू होती. पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली होती. त्यांनी जनता पक्षाशी संगनमत केले आणि दादांची साथ सोडली. पवारांचा स्वार्थ पक्षहितापेक्षा मोठा ठरला. आज पवार महाराष्ट्रातले सगळ्यात श्रीमंत राजकारणी आहेत. कष्ट करून आणि प्रामाणिकपणे एखादा उद्योग चालवून श्रीमंत होता येणार नाही इतके श्रीमंत ते आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील आमदारांचा निवडणुकीच्या प्रचारातील वाहन इंधनाचा सगळा खर्च आपल्या खिशातून करण्याइतके ते धनवान आहेत. या राजकीय शैलीने ते श्रीमंत झाले पण ते मोठे झाले नाहीत. त्यांनी त्यांचा पक्ष मोठा केला नाही. त्यांनी महाराष्ट्र मोठा केला नाही. त्यांनी महाराष्ट्रात अनेक दलाल निर्माण केले. दलाल देवळे निर्माण करीत नाहीत आणि केलीच तरी त्यातून संस्कृती निर्माण होत नाही. संस्कृती म्हटल्यावर सावरकरांचे स्मरण होते. दोन जन्मठेपीचा एक भाग म्हणून ब्रिटिशांनी त्यांचेवर लादलेली १३ वर्षांची रत्नागिरीची स्थानबद्धता मागे घेतली आणि त्यांचेवरील राजकारण बंदीही उठवली तेव्हा पुण्यात केसरीवाड्यात त्यावेळच्या जवळजवळ सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश करून, पहिल्या प्रतीचे देशव्यापी नेतृत्व करून मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. सावरकरांनी त्यांच्या शुभकामनांचा आदर करून त्यांचेशी राजकारणावर सविस्तर चर्चा केली. भ्रांत राष्ट्रवादामुळे स्वातंत्र्यलढ्याचा प्रवास पाकिस्तानच्या दिशेने कसा चालू झाला आहे ते सांगितले. तशा परिस्थितीत हिंदु समाजाला वार्यावर सोडणे म्हणजे राष्ट्राचा अवसानघात करणे होईल हे सूचीत केले. मी कोणत्याही पक्षात गेलो किंवा स्वतंत्र पक्ष काढला तरी मी केव्हाही हिंदूंचा पक्ष क्षणभरही सोडणार नाही, अशी घोषणा सावरकरांनी केली. ते हिंदूमहासभेत गेले आणि संपूर्ण भारताचा झंजावाती दौरा करून अल्पावकाशात त्यांनी हिंदूमहासभेला काँग्रेसच्या तोडीस तोड करून दाखविले. आज किती पक्ष आणि किती नेते ‘हिंदूंचा पक्ष आम्ही कदापि सोडणार नाही’, असे म्हणायला पुढे येतील ? जे लाचार नसतील त्यांनाच हे शिवधनुष्य पेलू शकेल. - सुघोष