'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

राज ठाकरे यांनी न्यायालयात जावे - नीला सत्यनारायण

    मुंबई, २६ जानेवारी (वार्ता.) - राज्य निवडणूक आयुक्त हे संवैधानिक पद आहे. निष्पक्षपाती असणार्‍या या पदाचे पावित्र्य आपणास राखावेच लागेल. आजवर आपण शासकीय कार्यालयातही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे सत्ताधार्‍यांना झुकते माप देण्याचा प्रश्नच येत नाही.
त्यामुळे आयोगाला प्रत्येक निर्णयामागे योग्य विचारधारा असते. कोणी आक्षेपार्ह विधाने केल्यास त्याला समज देणे हे आपले कर्तव्यच ठरते. त्यांना जर यात पक्षपात दिसत असेल, तर त्यांनी न्यायालयात जावे, असे वक्तव्य राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज पुन्हा एकदा करत हे ‘राज प्रकरण’ आतातरी संपुष्टात यावे, अशी उद्विग्नता व्यक्त केली.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi