८.९.२००४ या दिवशी एका शासकीय रुग्णालयात एका व्यक्तीच्या डोळ्यांची पडताळणी केली. त्या वेळी तेथील कर्मचार्याने बनवलेल्या पडताळणीपत्रावर (‘प्रिस्क्रीब्शन कार्ड’वर) तिचे वय ‘६२ वर्षे’ असे नमूद केले होते. चार वर्षांनी म्हणजे ३०.१.२००८ या दिवशी याच शासकीय रुग्णालयात त्याच व्यक्तीच्या डोळ्यांची पुन्हा पडताळणी केली. या वेळी मागील पडताळणीपत्रावरील नाव, पत्ता, वय आदी माहिती पाहून तीच माहिती कर्मचार्याने नव्या पडताळणीपत्रात नमूद केली.
प्रतिवर्षी नाव आणि पत्ता यांच्यात पालट होत नसला, तरी वयात मात्र पालट होत असतो, हेही या कर्मचार्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे नव्या पडताळणीपत्रातही त्याने त्या व्यक्तीचे वय ‘६२ वर्षे’ असाच उल्लेख केला. भारतात शासकीय क्षेत्र असो कि खाजगी क्षेत्र असो, तेथील कर्मचार्यांमध्ये असा पाट्याटाकूपणा असल्यानेच जगात ‘भारतीय मनुष्यबळ अकुशल आहे’, असे सांगणारे अहवाल नेहमी प्रसिद्ध होतात !