जिल्ह्यातील सेवा संबंधित साधकांकडून वेळेत पूर्ण करून घेतांना पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !
‘सध्या भारतभरातील सर्वच जिल्ह्यांमधील अनेक सेवा अपूर्ण आणि प्रलंबित आहेत. जिल्हासेवक आणि प्रसारसेवक यांनी तशा प्रकारच्या सेवांची यादी सिद्ध करून त्या सेवा प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने साधकांचे नियोजन करावे अन् त्यांचा पाठपुरावाही घ्यावा. यामध्ये पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावेत.
१. कार्य पूर्ण करण्याच्या संदर्भातील दृष्टीकोन‘सध्या भारतभरातील सर्वच जिल्ह्यांमधील अनेक सेवा अपूर्ण आणि प्रलंबित आहेत. जिल्हासेवक आणि प्रसारसेवक यांनी तशा प्रकारच्या सेवांची यादी सिद्ध करून त्या सेवा प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने साधकांचे नियोजन करावे अन् त्यांचा पाठपुरावाही घ्यावा. यामध्ये पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावेत.
अ. जिल्ह्यातील सध्याचे प्राधान्य म्हणजे लेखा विभागाच्या दृष्टीने असणार्या सर्व सेवा प्रथम पूर्ण कराव्यात, उदा. नियतकालिके आणि विज्ञापने यांच्या येणेबाकीची वसुली
आ. जिल्हा किंवा केंद्र स्तरावरील बैठकांमध्येही कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा घ्यावा.
इ. जे साधक कार्य नीट करतात किंवा कार्य नीट करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनाच सेवा सांगाव्यात आणि त्यांच्याकडूनच त्या करवून घ्याव्यात.
२. स्वभावदोष आणि अहं अधिक असलेल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात
२ अ. सेवा देण्याच्या संदर्भातील दृष्टीकोन
१. ज्या साधकांमध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहे अन् ते ऐकण्याच्या किंवा स्वतःमध्ये पालट करण्याच्या स्थितीत नसतील, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. तसेच त्यांना कोणत्याही सेवा देऊ नयेत.
२. जे साधक चुका पुष्कळ करतात किंवा त्यांच्या स्वभावदोषांमुळे इतरांना त्रास होतो, अशा साधकांना सेवा देऊ नयेत.
३. ज्या साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहंभाव यांचे प्रमाण पुष्कळ असूनही स्वतःमध्ये पालट करण्याची सिद्धता आहे, त्यांच्याच सेवेचे नियोजन करावे, उदा. दैनिक वितरण, ग्रंथप्रदर्शन लावणे, वर्गणीदार बनवणे इत्यादी. अशामुळे त्यांची दिवसभरामध्ये काही घंटे सेवा होईल आणि ती परिपूर्ण झाल्यामुळे त्यांना साधनेच्या दृष्टीनेही लाभ होईल.
४. सध्या कार्यपूर्तीकडे अधिक लक्ष द्यावे. साधकांचे आपापसातील तंटे सोडवण्याकडे नंतर लक्ष द्यावे.
२ आ. आढावा घेण्याच्या संदर्भातील सूत्रे
१. सध्या ज्या साधकांचे प्रयत्न साधनेच्या दृष्टीने चांगले होत आहेत, अशांच्याच व्यष्टी साधनेचा आढावा घ्यावा. अन्यथा केवळ सेवा पूर्ण होण्याच्या दृष्टीनेच आढावा घ्यावा. सेवा परिपूर्ण होऊ लागल्यावर नंतर सर्व साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू करावा.
२. ज्यांना कार्य करण्याची आवड आहे, त्यांच्याकडून कार्य परिपूर्ण करून घ्यावे. त्यांच्याकडे ‘अध्यात्मामध्ये प्रगती करून घेणारे साधक’ या अपेक्षेने न पहाता ‘कार्यकर्ते’ या दृष्टीने पहावे. तसेच त्या दृष्टीने त्यांचा आढावाही घेऊ नये.
२ इ. असे साधक सनातनमध्ये नकोत ! : अनेक वर्षांपासून साधनेत असलेले जे साधक अजूनही नीट सेवा करत नाहीत किंवा आपापसात भांडणे करतात, कुणाचे ऐकत नाहीत, अशा साधकांना सनातन संस्थेमध्ये ठेवू नये. अयोग्य कृती करणारे आणि अनेक वर्षांपासून स्वतःमध्ये पालट न करणारे आता सनातनमध्ये नकोत.

सर्व साधकांनी वरील सूत्रांचा अभ्यास करावा. आपणच आपली साधना आणि कार्य यांची स्थिती किती बिकट केली आहे, याचे चिंतन करावे. सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण झाल्याविना आपली प्रगती होणार नाही. त्यामुळे आता प्रसंग किंवा चुका यांवर चर्चा करण्यापेक्षा चुकीचे प्रसंग टाळलेच पाहिजेत आणि योग्य कृतीच केल्या पाहिजेत. सर्वांनीच यांकडे लक्ष द्यावे.’
- आधुनिक वैद्या (डॉ.) कु. माया पाटील, प्रसारसेविका