![]() |
| प.पू. भक्तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान |
त्या वेळी सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी मला पुढील वाक्य सांगितले. ‘तुझ्यासारख्या ‘वेड्याला’ (पागल माणसाला) ‘वेडेच’ (पागलच) समजू शकतील. हे ‘वेडे’ (पागल) काय समजू शकणार ?’
१ अ. ‘तुझ्यासारख्या वेड्याला (पागल माणसाला) वेडेच (पागलच) समजू शकतील !’ : येथे ‘वेडा’ म्हणजे ‘ईश्वरभक्ती करतांना स्वतःला ईश्वरचरणी समर्पित करणारा जीव.’ अशा जिवाला केवळ ईश्वरभक्ती करणारा दुसरा जीवच समजू शकतो; म्हणून त्यालाही ‘वेडा (पागल)’, असेच संबोधले आहे.
१ आ. ‘हे ‘वेडे’ काय समजू शकणार ?’ : येथे ‘वेडा (पागल)’ म्हणजे ‘मायेत अडकलेला जीव.’ असा जीव ईश्वरभक्ती करणार्या जिवाला समजू शकणार नाही; कारण तो तर विभक्त (भक्त नाही) आहे.
२. ‘ईश्वराच्या भक्तीत वेडा झालेला जीव’ हे वाक्य ऐकून सात्त्विक वाटणे, तर ‘मायेत अडकल्यामुळे वेडा झालेला जीव’ हे ऐकून तामसिक वाटणे : येथे दोघेही ‘वेडे (पागल)’ आहेत. पहिला ईश्वराच्या भक्तीमध्ये वेडा झाला आहे आणि दुसरा मायेत अडकल्यामुळे वेडा आहे; परंतु यांपैकी ‘ईश्वराच्या भक्तीत वेडा (पागल) झालेला जीव’ हे वाक्य ऐकल्यावर सात्त्विक वाटते आणि ‘मायेत अडकल्यामुळे वेडा (पागल) झालेला जीव’ हे वाक्य तामसिक वाटते.
- प.पू. भक्तराज महाराज (सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांच्या माध्यमातून, आश्विन कृ. १०, कलियुग वर्ष ५११३ (२२.१०.२०११))
