![]() |
| कु. आहान आशिष वैद्य |
तसेच त्याला धर्म आणि राष्ट्र यांविषयी उपजतच अभिमान आहे. उद्या, म्हणजेच माघ शुद्ध षष्ठी, कलियुग वर्ष ५११३ (२९.१.२०१२) या दिवशी त्याची मुंज आहे. त्या निमित्ताने आम्हाला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. आहान वैद्य याला मौंजीबंधनानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. राष्ट्र आणि धर्म यांप्रती असलेले प्रेम
१ अ. शिक्षिकेने ‘न्यू इयर पार्टी’चे चित्र रेखाटण्यास सांगितल्यावर कु. आहानने गुढीपाडव्याच्या संदर्भातील चित्र काढणे आणि ‘मी आमच्या नवीन वर्षाचेच चित्र काढणार’, असे शिक्षिकेला बाणेदारपणे सांगणे : कु. आहान इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. डिसेंबर २०११ मध्ये त्याच्या शाळेतील शिक्षिकेने मुलांना ‘न्यू इयर पार्टी’चे चित्र रेखाटण्यास सांगितले होते. तेव्हा कु. आहानने ‘एक मुलगा गुढी उभारत असून दुसरा मुलगा त्याला साहाय्य करत आहे’, अशा प्रकारचे चित्र काढले. त्या वेळी शिक्षिका त्याला म्हणाल्या, ‘‘मी ‘न्यू इयर पार्टी’चे चित्र काढण्यास सांगितले होते. मग हे कसले चित्र काढलेस ?’’ त्यावर कु. आहानने त्यांना सांगितले, ‘‘आमचे (हिंदूंचे) नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरे होते. १ जानेवारी हे आमचे नवीन वर्ष नाही. त्यामुळे मी तसे चित्र काढणार नाही. मी आमच्या नववर्षाचेच चित्र काढणार.’’ त्या वेळी ‘शिक्षिका आपल्याला गुण देणार नाहीत किंवा रागावतील’, याची त्याला जराही भीती वाटली नाही.
१ आ. कु. आहानला छत्रपती शिवाजी महाराजांचे विशेष आकर्षण असून त्यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यातील बारकावे तोंडपाठ असणे : लहानपणापासून कु. आहानला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विशेष आकर्षण आहे. खेळता खेळता मध्येच तो स्वतः शिवाजी महाराज होतो, तर मध्येच त्यांचा मावळा बनतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग त्याला ठाऊक आहेत. त्या प्रसंगांच्या दिनांकासह तो ते तत्परतेने सांगतो. त्याच्या खोलीतही शिवाजी महाराजांची पुष्कळ चित्रे, तसेच पुतळे आणि खेळण्यातील तलवारी आहेत. सर्वच राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी त्याला प्रेम अन् आदर आहे. त्यांच्या संदर्भातील पुस्तकेही तो वाचत असतो. अनेक क्रांतीकारकांच्या जन्मतिथीही त्याला तोंडपाठ आहेत.
१ इ. कु. आहानने त्याच्या खोलीत ‘क्षात्रधर्म’ हा शब्द भिंतीवर चार ठिकाणी लिहिला आहे. प्रत्यक्षात हा शब्द त्याला घरी किंवा शाळेत कोणीही सांगितलेला नाही.
२. मराठीविषयी अभिमान असल्याने मराठी माध्यमातून शिकण्यासाठी आग्रह धरणे, तसेच स्वतःहून मराठी वाचण्यास शिकणे
कु. आहानला मराठी भाषेविषयी पुष्कळ अभिमान आहे. त्याने त्याच्या आई-वडिलांना ‘‘मला इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घाला’’, असे अनेकदा सांगितले आहे. तो स्वतःहूनच मराठी अक्षरे वाचायला शिकला. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची मराठी भाषेतील अनेक पुस्तके वाचली आहेत.
३. कु. आहानला टिळा लावून भारतीय वेशभूषा परिधान करण्यास आवडणे
कु. आहानला टिळा लावणे, भारतीय वेशभूषा परिधान करणे या गोष्टी आवडतात. ‘सर्वांनीच तसे आचरण करावे’, असेही त्याला नेहमी वाटते. त्यामुळे तो तसे वारंवार बोलून दाखवतो.
४. सनातन संस्थेप्रती आदर असणे
४. सनातन संस्थेप्रती आदर असणे
४ अ. कु. आहानला जेव्हा ‘सनातन’ असे काहीतरी आहे’, हे समजले, तेव्हा त्याला त्याविषयी पुष्कळ आकर्षण आणि आदर वाटू लागला.
४ आ. सनातनच्या साधकांविषयी आदर असणे : मध्यंतरी कु. आहानला त्याच्या घरच्यांनी विचारले, ‘‘तुझ्या मुंजीला कोणाकोणाला बोलावूया ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘शहाणेआजींना (ठाणे येथील सनातनच्या साधिका सौ. जया शहाणे) बोलावूया.’’ त्यावर त्याच्या आजीने त्याला विचारले, ‘‘त्यांनाच का बोलवायचे ?’’ मग तो म्हणाला, ‘‘त्या ‘सनातन’च्या आहेत ना म्हणून !’’ सौ. शहाणे अर्पण घेण्याच्या निमित्ताने कधीतरी त्यांच्याकडे जातात. एखादी व्यक्ती ‘सनातन’ची आहे, हे कळल्यावर त्याला त्या व्यक्तीविषयी पुष्कळ आदर वाटतो.
४ इ. ‘सनातन पंचांग’ आवडीने वाचणे आणि बालसंस्कारवर्गाच्या संकेतस्थळाचा पत्ता बघून स्वतःहून संकेतस्थळ उघडणे : आम्ही कु. आहानच्या घरी ‘सनातन पंचांग’ दिल्यावर त्याला ते पुष्कळ आवडले. तो त्यामध्ये प्रत्येक दिवशीची तिथी आणि दिनविशेष बघतो. त्याने अनेकदा पंचांगाचे वाचन केले आहे. ‘सनातन पंचांगा’मध्ये वाचकांना सूचना देण्याविषयी चौकट प्रसिद्ध झाली आहे. ती वाचून त्याने आम्हाला ४ सूचनाही सुचवल्या. ‘सनातनची वही’ दिल्यावर त्याने त्यावरील लिखाण अत्यंत बारकाईने वाचले. वहीवरील बालसंस्कारवर्गाच्या संकेतस्थळाचा पत्ता बघून त्याने आपणहून ते संकेतस्थळ उघडले आणि वाचण्यास आरंभ केला.
४ ई. सनातनच्या आश्रमात रहायला जाण्याची इच्छा असणे : कु. आहान याने स्वतःहून सांगितले, ‘‘मला सनातनच्या आश्रमात रहायला यायचे आहे.’’ दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ११ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आश्रमात जाण्यासाठी त्याने पालकांकडेही हट्ट केला होता.
४ उ. ‘सनातन’विषयी विशेष काही माहीत नसतांना मोठेपणी सनातनचे कार्य करण्याची इच्छा असल्याचे कु. आहानने सांगणे : चि. आहानला सनातनच्या कार्याविषयी विलक्षण आकर्षण आहे. कुणी त्याला ‘‘तू मोठेपणी काय करणार ?’’, असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘‘मी अर्ध वेळ चित्र काढीन आणि अर्ध वेळ सनातनमध्ये जाईन.’’ प्रत्यक्षात त्याला सनातन संस्था आणि तिचे कार्य यांविषयी काहीच माहिती नाही.’ - श्री. अभय वर्तक आणि सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (कु. आहानचे काका-काकू)

