हिंदूंनो, बांगलादेश युद्धाचा विजय लक्षावधी हिंदूंच्या प्राणत्यागाने अन् लक्षावधी हिंदु महिलांचे शील गमावून मिळालेला आहे, हे भीषण सत्य लक्षात घ्या !
हिटलरने ६० लक्ष ज्यूंची हत्या केली, हा इतिहास ज्यू आणि त्यांना पाठिंबा देणार्या खिस्ती राष्ट्रांनी सार्या जगाला सांगितला आहे. ज्यूंच्या या सामूहिक हत्याकांडाला साहाय्य करणार्या जर्मन सैन्यातील अधिकार्यांना आणि त्या काळातील नेत्यांना शोधून काढून शिक्षा देण्यात आल्या आहेत. अजूनही त्या वेळच्या ज्यूंच्या हत्याकांडाला कारणीभूत असलेला नेता अथवा अधिकारी मिळाला, तर त्याला न्यायालयात खेचले जाते.
या उलट खिस्ताब्द १९४७ या वर्षी आणि १९७१ या वर्षी लक्षावधी हिंदूंचा सामूहिक नरसंहार मुसलमानांनी केला. या विरोधात आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने कधीही आवाज उठवलेला नाही, अथवा या जिहाद्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. ‘जगाचे पोलीस’ अशी भूमिका वठवण्यात आघाडीवर असलेल्या अमेरिकेने ज्यूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले; मात्र हिंदूंच्या या हत्याकांडाविषयी ती मूग गिळून गप्पच आहे. पुन्हा एकदा भारतातील निधर्मी राज्यकर्त्यांनी आणि जगातील महासत्तांनी हिंदूंना जगण्याचा अधिकार नाही, हेच यातून दाखवून दिले आहे. ही स्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !हिटलरने ६० लक्ष ज्यूंची हत्या केली, हा इतिहास ज्यू आणि त्यांना पाठिंबा देणार्या खिस्ती राष्ट्रांनी सार्या जगाला सांगितला आहे. ज्यूंच्या या सामूहिक हत्याकांडाला साहाय्य करणार्या जर्मन सैन्यातील अधिकार्यांना आणि त्या काळातील नेत्यांना शोधून काढून शिक्षा देण्यात आल्या आहेत. अजूनही त्या वेळच्या ज्यूंच्या हत्याकांडाला कारणीभूत असलेला नेता अथवा अधिकारी मिळाला, तर त्याला न्यायालयात खेचले जाते.
ढाका - पाक सैन्याने १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये केलेली लष्करी कारवाई फक्त पूर्व पाकिस्तानमधील बंडखोरांनी बळकावलेला प्रदेश मुक्त करणे एवढ्या पुरतीच सीमित नव्हती, तर येथील हिंदूंचा वंशविच्छेद घडवून आणणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. पाक सैन्याने या कारवाईच्या वेळी ३० लक्ष हिंदूंची कत्तल केली. हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार केले आणि बालकांचीही अमानुष हत्या केली. बांगलादेशच्या उत्तरेकडे असलेला ठाकूरगाव जिल्हा या घटनेचा पुरावा आहे. (प्रसंग कोणताही असो पाक शासन आणि जिहादी मुसलमान त्याचा वापर हिंदूंचा वंशविच्छेद करण्यसाठीच करतात, हेच या घटनाक्रमातून दिसून येते ! - संपादक) याविषयी कोणाला अधिक माहिती हवी असेल, तर ते अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी पाक सैन्याने केलेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदावर लिहिलेला अहवाल पाहू शकतात. केनेडी यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील सर्व राज्यांत स्वतः प्रवास करून युद्धाच्या वेळी बांगलादेशमधून भारतात आलेल्या शरणार्थींच्या यातना समजून घेतल्या आहेत. त्यांनी या युद्धात अमेरिकेच्या पाकला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी हा अहवाल शरणार्थींसाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीकडेही सोपवला आहे. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबीर रहमान यांनीही खिस्ताब्द १९७१ च्या युद्धात ३० लाख लोकांना ठार मारण्यात आले आहे, असे अनेकदा म्हटले आहे. या ३० लाख नागरिकांमध्ये बहुतांश हिंदु होते, हे वेगळे सांगायला नको !
२३ एप्रिल १९७१ या दिवशी बांगलादेशच्या ठाकूरगाव जिल्ह्यातील जथिभंगा गावामध्ये पाक लष्कराने जमात-ई-इस्लामी यासारख्या मुसलमान संघटनेच्या साहाय्याने ३ सहस्र हिदूंची कत्तल केली होती. या गावातील सर्व हिंदु पुरुषांना एका रांगेत उभे करून पाक लष्कराने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर त्यांची हत्या केली. तसेच लहान मुलांनाही ठार मारले. या विषयीचे पुरावे आता उघड झाले आहेत. बांगलादेशच्या अवामी लीग शासनाने त्या गावात त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले आहे. (बांगलादेश, पाक या देशांत हिंदूंवर होणारा अत्याचार त्या वेळी भारतीय राज्यकर्त्यांना दिसला नाही आणि आजही दिसत नाही ! आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्यांने पाकच्या शासनाचा हा गुन्हा युद्धगुन्हा असून त्यांना शासन व्हायला हवे, असे म्हटलेले नाही. पॅलेस्टाईन आणि कोसोव्हा येथील मुसलमानांसाठी गळे काढणार्या भारतातील निधर्मीवाद्यंना आणि मानवाधिकारवाल्यांना हा हिंदूंचा वंशविच्छेद दिसला नाही का ? - संपादक) पाक लष्कराच्या या अमानुष अत्याचाराचा धसका घेऊन शेजारच्या जगन्नाथपूर, चौखलडी, चंदीपूर, आलनपूर, बसुदेवपूर, गौरीपूर, मिलनपूर, सुखनपुकुरी इत्यादी गावांतील हिंदूंनी भारताकडे धाव घेतली.
२० मे १९७१ या दिवशी पाकला पाठिंबा देणार्या रझाकारांनी आणि पाक सैन्याने बांगलादेशमधील चूकनगर येथे १० सहस्र हिंदूंना ठार केले आहे. ही माहिती muktadhara.net/page35 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अमेरिकेचे सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी पाक लष्कराचे हिंदूंवरील हे अत्याचार जगभरात सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. बांगलादेशी निर्वासितांची व्यथा त्यांनी जगासमोर मांडली. पाकला मदत करण्याच्या अमेरिकेच्या धोरणावरही त्यांनी टीका केली होती. ‘क्राईसीस इन साऊथ एशिया’ या त्यांच्या अहवालात त्यांनी ही माहिती उघड केली आहे.