'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘टाइम्स ऑफ इंडिया’चे अन्वेषण त्वरित पूर्ण करा ! - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

देवतांची चित्रे छापलेली अंतर्वस्त्रे घालणार्‍या ‘मॉडेल’चे छायाचित्र छापल्याचे प्रकरण
    मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) - ऑस्ट्रेलिया येथील एका ‘मॉडेल’ने श्री लक्ष्मी आणि श्री गणेश या देवतांची चित्रे छापलेली अंतर्वस्त्रे ‘फॅशन शो’मध्ये परिधान केली होती. ते छायाचित्र अन् त्या संबंधीचा सविस्तर वृत्तांत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या ‘बाँबे टाइम्स’च्या पुरवणीत छापल्या प्रकरणी या वृत्तपत्राचे अन्वेषण त्वरित करण्यात यावे, असा आदेश आज  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कानडे यांनी दिला. (अन्वेषण किती दिवसांत पूर्ण करावे, हेही न्यायालयाला सांगवे लागत असेल, तर जनतेने कर भरून पोलिसांना पोसायचे तरी कशाला ? - संपादक)
१.     ८ मे २०११ या दिवशी उपरोक्त ‘मॉडेल’चे छायाचित्र छापण्यात आले होते.
२. तसेच बाजूलाच खिस्ताब्द २००५ मध्ये लंडनमध्ये चपलांवर ‘ॐ’, ‘शिव’, ‘श्रीराम’ या देवतांची चित्रे छापलेल्या चपलांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती.
३. ती आक्षेपार्ह छायाचित्रे जाणीवपूर्वक या वृत्तासमवेत पुन्हा छापली होती.
४. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत श्री. एस्. बालकृष्णन हे या वृत्तपत्राच्या विरोधात त्याच दिवशी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भां.द.वि. २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम चेंबूर अन् त्यानंतर समता नगर पोलीस ठाण्यात गेले; परंतु दोन्ही ठिकाणी पोलिसांनी नकार दिल्यामुळे अखेरीस
श्री. बालकृष्णन मुंबई उच्च न्यायालयात आले. (अशी तक्रार मुसलमानांनी पोलीस ठाण्यात येऊन केली असती, तर पोलिसांनी ती नाकारली असती का ? आणि मुळात मुसलमान कधीही अशा प्रकारची कृती करत नाही, तर थेट रस्त्यावर उतरून हिंसा करतात आणि त्यांच्यासमोर पोलीस शेपूट घालतात ! हिंदु सहिष्णु असल्याने सनदशीर मार्गाचा अवलंब करतात ! हिंदूंनीही मुसलमानांच्या वाटेने जायचे, अशी पोलिसांची इच्छा आहे का ? - संपादक)
५. तेव्हा न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या आदेशामुळे सप्टेंबर २०११ मध्ये गुन्हा दाखल झाला; परंतु तेव्हापासून आज चार महिने झाले, तरी अद्याप अन्वेषण चालूच आहे.
६. हे अन्वेषण पूर्ण का होत नाही, असा प्रश्न याचिकाकर्ताचे अधिवक्ता विजय पाटील यांनी आज न्यायालयात उपस्थित केला.
७. तेव्हा शासनाच्या अधिवक्त्याने सांगितले, ‘‘या प्रकरणी तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून अन्वेषण चालू आहे. त्याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल.’’
८. त्यावर न्यायमूर्ती कानडे यांनी सांगितले, ‘‘या प्रकरणाचा अहवाल त्वरित सादर करा, जर दिरंगाई झाली, तर याचिकाकर्ता पुन्हा न्यायालयात येऊ शकतो.’’अशा प्रकारांना न्यायालयाची कदापी संमती नाही ! - न्यायमूर्ती कानडे
    युक्तीवाद करतांना अधिवक्ता पाटील म्हणाले, ‘‘काल खासदार अडसूळ यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर छापल्याप्रकरणी शिवसैनिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्राच्या इमारतीची तोडफोड केली. त्याचे पोलिसांनी दुसर्‍याच दिवशी अन्वेषण पूर्ण केले. मग पोलीस या प्रकरणाचेही अन्वेषण तत्परतेने का पूर्ण करत नाहीत ? हे देखील हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर एक प्रकारचे आक्रमणच आहे. जर न्यायालयाला याविषयी काही भाष्य करायचे नसेल, तर न्यायालयाची या प्रकराला संमती आहे, असे समजावे का ?’’ त्यावर न्यायमूर्ती कानडे म्हणाले, ‘‘या अशा प्रकारांना न्यायालयाची कधीच समंती नाही. याही प्रकरणाकडे तितक्याच गंभीरतेने पहाणे आवश्यक आहे.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi