एरंडोल, जिल्हा जळगाव, २८ जानेवारी (वार्ता.) - वन्दे मातरम् प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारतमातापूजन करून अखंड वन्दे मातरम् म्हणण्यात आले. येथील पू. हेडगेवार चौकात झालेल्या या कार्यक्रमाला वन्दे मातरम् प्रतिष्ठानचे श्री. जगदीश ठाकूर, शिव प्रतिष्ठानचे श्री. योगेश भोई, शिवसैनिक श्री. सुरेश खुरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. शेखर येवलेकर, सर्वश्री प्रदीप फराटे, गणेश सोनार, योगेश वाघ आणि अन्य धर्माभिमानी असे २०० जण उपस्थित होते.