गोमाता, श्रीराम आणि हिंदुत्व यांची आठवण केवळ निवडणूक काळातच ठेवणारा भाजप !
ही केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती करून त्यांची कार्यवाही व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
भाजपची आतापर्यंतची श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या संदर्भातील धरसोड वृत्ती, कर्नाटकात शेकडोंनी मंदिरे पाडण्याचा गझनीच्या महंमदालाही लाजवणारा धर्मद्रोह आणि धारमध्ये श्री वाग्देवीची मूर्ती कह्यात ठेवण्याचा अश्लाघ्य प्रकार यांमुळे या जाहीरनाम्यावर हिंदूंनी विश्वास कसा ठेवायचा हे भाजप सांगेल का ? - संपादक
डेहराडून - उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपकडून गोमाता आणि गोमूत्र ही दोन मुख्य सूत्रे ठरवण्यात आली आहेत. भाजप सत्तास्थानी आल्यास गोमूत्राचा प्रचार करणार आहे. ही केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती करून त्यांची कार्यवाही व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
भाजपची आतापर्यंतची श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या संदर्भातील धरसोड वृत्ती, कर्नाटकात शेकडोंनी मंदिरे पाडण्याचा गझनीच्या महंमदालाही लाजवणारा धर्मद्रोह आणि धारमध्ये श्री वाग्देवीची मूर्ती कह्यात ठेवण्याचा अश्लाघ्य प्रकार यांमुळे या जाहीरनाम्यावर हिंदूंनी विश्वास कसा ठेवायचा हे भाजप सांगेल का ? - संपादक
अस्तित्व संकटात असलेल्या लाल सिंधी गायीला संरक्षण देण्यात येईल. तिचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी खास प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन भाजपने दिले आहे. लाल सिंधी गाय ही देशी दुभती गाय आहे. याविषयी योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली योग विद्यापिठासह राज्यातील अनेक आश्रम आणि आखाडा यांच्याशी भाजपने संपर्क साधला आहे. गायीवर संशोधन करण्यासाठी भाजप शासनाने ऋषिकेश येथे एक संशोधन केंद्रही उभारले आहे.
भाजपने मागील आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात प्राथमिक शिक्षण, आरोग्य, औद्योगिकीकरण इत्यादी मागील निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. गोहत्या बंदीचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.