मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या पोलीस अधिकार्यांचा न्यायालयात बसल्यावरही सतत भ्रमणध्वनी वाजत असतो, ही गोष्ट आता नेहमीची झाली आहे. त्यांना जर त्यांची महत्त्वाची कामे करायची असतील, तर त्यांनी न्यायालयाच्या बाहेर जाऊन करावीत, इथे भ्रमणध्वनीवर बोलू नये. न्यायालयात वर्तन कसे करावे, याविषयी पोलिसांमध्ये घोर अज्ञान आहे, अशा कडक शब्दांत न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी भिवंडी येथील साहाय्यक पोलीस आयुक्त ए.व्ही. पाटील यांना आज खडसावले.
(पोलिसी मनोवृत्तीची चुणूक ! सर्वसामान्य जनतेचा काडीचा आदर न करणारे पोलीस आता मुंबई उच्च न्यायालयाचाही अनादर करू लागले आहेत. असे पोलीस आदर्श वर्तन काय करणार ? - संपादक) १९ जानेवारी या दिवशी एका प्रकरणानिमित्ताने साहाय्यक पोलीस आयुक्त न्यायालयात हजर झाले होते. त्या वेळी अचानकपणे त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर न्यायमूर्ती खानविलकर यांनी संताप व्यक्त करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आज या प्रकरणी पाटील यांनी सत्यप्रतिज्ञापत्रावर क्षमायाचना मागितली. ही क्षमायाचना न्यायालयाने स्वीकारली.