'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

राष्ट्राची ही दुःस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकराज्य नको, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !

सौ. लीना जैन यांनी देशातील विदारक स्थितीविषयी मांडलेली सूत्रे आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रच कसे अकार्यक्षम, भ्रष्ट आणि जनताद्रोही आहे, हेच त्यांच्या या सूत्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
अर्थव्यवस्थेचे खच्चीकरण होण्यास विद्यमान लोकशाही उत्तरदायी !
देशाला स्वतःची अर्थव्यवस्था देऊन त्याचा विकास करण्याचे दायित्व शासनाचे आहे; परंतु भारतात घटनेची पायमल्ली करून सार्वजनिक क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न भांडवलशाही लोकांना अत्यल्प किमतीत दिले जाते. यामुळे भांडवलशाही लोक अर्थव्यवस्थेला दरिद्री करून राजकीय नेत्यांशी युती करून जनतेला मनस्ताप देत आहेत. न्यायव्यवस्था नागरिक या नात्याने या युतीला आक्षेप न घेता त्यांच्या अनियमित अनुचित व्यवहाराला प्रोत्साहन देत आहेत. प्रसारमाध्यमे भांडवलशहा अन् राजकीय नेते यांची काळीकुट्ट पार्श्वभूमी जनतेसमोर प्रकाशात आणत नाहीत. आज ते सर्व सार्वजनिक निधीच्या लूटमारीचे साक्षीदार बनले आहेत आणि याला भारतातील विद्यमान लोकशाही उत्तरदायी आहे. - सौ. लीना जैन
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi