राजकीय नेत्यांनो, या जनमत चाचणीवरून तरी तुम्ही अंतर्मुख व्हाल का ?
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनी गेट वे ऑफ इंडियाजवळ ‘मुंबई का हिरो कौन ?’ या विषयावर जनतेची मते जाणून घेण्यासाठी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘इंडिया अगेंन्स्ट करप्शन’ या संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आलेल्या नागरिकांना त्यांना आदर्श नेता कोण, यासाठी ६ पर्याय दिले होते. यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनाच जनतेकडून सर्वाधिक पसंती देण्यात आली.
या प्रसंगी एकूण ५ सहस्रांहून अधिक नागरिकांची मते नोंदवून घेण्यात आली. ज्यात श्री. हजारे यांना सर्वाधिक म्हणजे ४ सहस्र २४१, त्या खालोखाल राहूल गांधी यांना ३७८, राज ठाकरे यांना ३१९, तर सर्वांत अल्प शरद पवार यांना ३३ मते मिळाली.मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - प्रजासत्ताक दिनी गेट वे ऑफ इंडियाजवळ ‘मुंबई का हिरो कौन ?’ या विषयावर जनतेची मते जाणून घेण्यासाठी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘इंडिया अगेंन्स्ट करप्शन’ या संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आलेल्या नागरिकांना त्यांना आदर्श नेता कोण, यासाठी ६ पर्याय दिले होते. यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनाच जनतेकडून सर्वाधिक पसंती देण्यात आली.
यावरून जनतेने राजकीय नेत्यांपेक्षा भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रखर लढा देणार्या श्री. हजारे यांना आदर्श म्हणून स्वीकारले आहे. यापुढे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी केलेल्या कामावरही जनता नेहमी लक्ष ठेवून राहील, असा आमचा विश्वास आहे, असा निष्कर्षही या स्वयंसेवी संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढला आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने मतदान करण्यासाठी पत्रिका सिद्ध करण्यात आली होती. या कालावधीत परिसरात राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.