नीतीमत्ताहीन राजकीय पक्षांच्या हातात असलेले भारतीय लोकराज्य !
सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराने वेग धरला असून त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांत उत्साह टिकून रहावा म्हणून ओल्या पार्ट्यांचे पेव फुटले आहेत. कार्यकर्त्यांना मटण आणि दारू मोठ्या प्रमाणात पुरवली जात आहे. उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकांत सुमारे ५५० लाख लिटरहून अधिक देशी-विदेशी मद्य राज्यातील विविध पक्षांतील कार्यकर्ते रिचवतील.
प्रत्येक पंचायत समिती गणात प्रतिदिन ४० बोकड नेले जात असल्याचे मराठावाड्यातील काही मटण विक्रेत्यांनी सांगितले. यावरून ३०९ पंचायत समित्यांसाठी प्रतिदिन किमान १३ सहस्र बोकड बळी पडतील. प्रचार १५ दिवस चालणार म्हटल्यावर जेमतेम २ लाख बोकड केवळ ग्रामीण भागातच फस्त होतील असे दिसते. (निवडणुकांसारख्या राष्ट्रीय कार्यात अशा प्रकारे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मद्य आणि मटण देऊन त्यांच्याकडून प्रचार करून घेणारे नेते असलेले राजकीय पक्ष कधीतरी निस्वार्थपणे देशसेवा करतील का ? तसेच हिंदूंच्या यात्रांत परंपरेनुसार बोकडाचा बळी दिल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडणारे अंनिसवाले राज्यात २ लाख बोकडांचा बळी जात असतांना मूग गिळून गप्प का ? - संपादक)सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराने वेग धरला असून त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांत उत्साह टिकून रहावा म्हणून ओल्या पार्ट्यांचे पेव फुटले आहेत. कार्यकर्त्यांना मटण आणि दारू मोठ्या प्रमाणात पुरवली जात आहे. उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकांत सुमारे ५५० लाख लिटरहून अधिक देशी-विदेशी मद्य राज्यातील विविध पक्षांतील कार्यकर्ते रिचवतील.