'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

साधकांनो, प्रमुखांनी चुकांची कडक शब्दांत जाणीव करून दिल्यावर विकल्पात न जाता त्याविषयी कृतज्ञता वाटू द्या !

‘सनातन संस्थेच्या अंतर्गत ५ ते १० वर्षांपासून सेवा करणार्‍या साधकांकडून कार्यामध्ये अक्षम्य अशा चुका होत आहेत. त्यामुळे साधकांची साधनेमध्ये अधोगती होत आहे. कार्यात सहभागी असणार्‍या साधकांची, तसेच कार्याचीही हानी होत आहे. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी सध्या संस्था स्तरावर अंतर्गत शुद्धीकरण चळवळ (मोहीम) चालू आहे.
साधनेमध्ये साम, दाम, दंड आणि भेद हे नियम आहेत. त्यानुसार पुनःपुन्हा त्याच त्याच चुका करणार्‍या साधकांना याची कडक शब्दांत जाणीव करून देण्यात येत आहे. खरेतर केवळ कडक शब्दांत जाणीव करून देणे, एवढेच केले जात आहे. चुकांच्या तुलनेत कोणालाही कडक शिक्षा दिली जात नाही. अशा वेळी साधकांना याविषयी कृतज्ञता वाटायला हवी. येथे साधकांच्या भल्यासाठीच कडक शब्दांत जाणीव करून दिली जात आहे. चुका करणार्‍या साधकांनी ‘एवढ्या वर्षांनंतरही आपण चुका का करत आहोत’, याचा स्वतः अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. ईश्वराची तारक आणि मारक अशी दोन रूपे आहेत. सध्याची अंतर्गत शुद्धीकरण चळवळ म्हणजे ईश्वराच्या मारक रूपाशी एकरूप होण्यासारखेच आहे.

कु. स्वातीताईनीही जळगाव, संभाजीनगर येथील साधकांना साधना आणि कार्य यांतील हानी टाळण्यासाठी तळमळीने कडक शब्दांत जाणीव करून दिली. येथे कडक शब्दांकडे पहाण्यापेक्षा ‘त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली; म्हणून आपल्याकडून होणार्‍या चुका टळल्या आणि त्यामुळे मिळणारे पापही थांबले’, याविषयी साधकांनी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. याऐवजी काही साधकांना निराशा आली, तर काहींना विकल्प आले. ज्या साधकांना या प्रक्रियेविषयी कृतज्ञता वाटते, तेच खरे सनातनचे साधक आहेत. इतरांनीही आपण ‘साधक’ होण्यासाठी प्रयत्न करावेत. येथून पुढेही अशीच प्रक्रिया चालू रहाणार आहे, तरी साधकांनी साधनेत नुसते टिकून रहाण्यासाठी नव्हे, तर प्रगती करण्यासाठी सेवेतील चुका टाळण्यासाठी अखंड प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण पुढे येणार्‍या आपत्काळात साधना करणे अशक्य होईल. त्यापूर्वी किमान ५० टक्के पातळी तरी गाठणे आवश्यक आहे.’
साधकांनो, मार्च २०१२ च्या आधी लेखा विभागाशी संबंधित असणार्‍या सेवा पूर्ण करा !
‘गेल्या ३ मासांपासून लेखा विभागाशी संबंधित असणार्‍या सर्व सेवा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये प्रयत्न चालू आहेत; पण अजूनही जिल्ह्यांतील वसुलीच्या सर्व सेवा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साधकांनी येणे बाकी, तसेच संबंधित सर्व हिशेब पूर्ण करणे, यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सेवा मार्च २०१२ च्या आधी पूर्ण होतील, यांकडे लक्ष द्यावे. सेवा वेळेत पूर्ण केल्यानंतरच आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे, हे लक्षात घेऊन साधना म्हणून सर्वांनी या सेवा तातडीने पूर्ण कराव्यात. अध्यात्मातील प्रगती गुरूंच्या कृपेविना होऊ शकत नाही. सध्याची प्रलंबित सेवा पूर्ण करणे, म्हणजे गुरूंची कृपा संपादन करण्याच्या दृष्टीने पुढे जाणे होय.’
- आधुनिक वैद्या (डॉ.) कु. माया पाटील, प्रसारसेविका
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi