'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

संगमनेर येथे शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’ ग्रंथांच्या ५ सहस्र छायांकीत प्रतींचे वितरण

    संगमनेर (जि. नगर) - येथील शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांनी हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या संगमनेर येथील अनेक महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथांच्या ५ सहस्र छायांकीत प्रती काढून विनामूल्य वितरित केल्या.
(‘लव्ह जिहाद’विषयी हिंदूंमध्ये जागृती करणारे शिवसेना युवा संघटक श्री. अनिल कवडे यांचे अभिनंदन ! - संपादक)
    हिंदूंचे आशास्थान समजल्या जाणार्‍या श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या वाढदिनी आपण काहीतरी वेगळे करूया, असा ध्यास घेऊन आणि माता-भगिनींचे रक्षण झाले पाहिजे, हा बाळासाहेबांचा ध्यास उराशी बाळगून त्यांनी या छायांकीत प्रती काढल्या आणि त्यांचे वितरण केले. ‘लव्ह जिहाद’ ही आता राष्ट्रीय समस्या बनली असून हिंदु माता-भगिनी असुरक्षित झाल्या आहेत. त्यामुळेच आता जागृतीशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन श्री. अनिल कवडे आणि शिवसेना युवा संघटना यांच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ ग्रंथांच्या छायांकीत प्रती वाटून तरूणींची युवा संघटनेत सदस्य नोंदणी करण्यात आली. त्या वेळी २५० विद्यार्थिनींनी सदस्य नोंदणी करून या भीषण समस्येची जागृती समाजात करण्याचा संकल्प केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi