'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

नीता अंबानी यांच्या वाहनचालकाला अटक

    पनवेल, २३ जानेवारी - माथेरानसारख्या ‘इको सेंसेटीव्ह झोन'मध्ये वाहनांना बंदी असतांना तेथे गाडी नेल्याच्या प्रकरणी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी सौ. नीता अंबानी यांच्या वाहनचालकास पोलिसांनी अटक केली.
    अंबानी यांनी माथेरानमध्ये ‘रग्बी’ हॉटेल विकत घेतले आहे. या हॉटेलमधील कार्यक्रमासाठी सौ. नीता अंबानी आणि मुकेश अंबानींच्या आई कोकिलाबेन या काल दुपारी ‘हेलिकॉप्टर’ने नेरळला आल्या. तेथील दस्तुरी येथून ‘होंडासिटी’ गाडीने त्या माथेरानला गेल्या. त्यामुळे पोलिसांनी गाडीचा चालक सुधीर शिंदे याला अटक केली, तसेच गाडी कह्यात घेतली.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi