हिंदूंना मंदिरात घंटा वाजवण्यास बंदी आणणारे राज्यकर्ते मशिदीवरील भोंगे बंद करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?
नवी दिल्ली, २६ जानेवारी - मशिदींवर भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करणे ही शांततापूर्ण जगण्यात ढवळाढवळ आहे. अशा प्रकारे भोंगे लावून लोकांना त्रास देण्याचा आणि त्यांच्यावर एखाद्या धर्माची प्रार्थना लादण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने काल खडसावल्याचे वृत्त ‘दैनिक सामना’ने प्रसिद्ध केले आहे. कोणत्याही धार्मिक स्थळाने आठ फूट उंचीपेक्षा अधिक उंच भोंगे लावू नयेत, त्याचे तोंड बाहेरच्या दिशेने ठेवू नये.

तसेच भोंगा अशा पद्धतीने लावावा की, त्याचा लाभ तेथे असलेल्या भक्तांनाच होईल, असेही न्यायालयाने बजावले आहे.
या वृत्तात पुढे म्हटले आहे की,
१. दिल्लीतील एकता विहार परिसरात रहाणारे श्री. माधव रॉय यांनी तेथील मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. (जनतेला त्रास होणार्या गोष्टीविषयी सनदशीर मार्गाने कृती करणार्या श्री. माधव रॉय यांचे अभिनंदन ! श्री. रॉय यांच्याकडून प्रत्येक नागरिकाने बोध घ्यावा ! - संपादक)
२. या भोंग्यांमुळे परिसराची शांतता भंग पावत असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.
३. त्यावर सुनावणी करतांना न्या. बिपीन सिंह यांनी, कोणत्याही धार्मिक स्थळांना भोंगे लावून शांतता भंग करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
४. मशिदीचे इमाम महंमद रागीबूल इस्लाम आणि जवळच्या मंदिराचे पुजारी कामदेव तिवारी अन् दामोदर प्रसाद यांना न्यायालयात बोलावून न्या. सिंह यांनी कडक शब्दांत समज दिली. (न्यायालयाचा सर्वधर्मसमभाव ! - संपादक)
५. कोणालाही उपद्रव करून धर्माचरण किंवा धर्मप्रसार करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (धर्मांध मुसलमानांना हे कळेल का ? - संपादक)
मुसलमानप्रेमी काँग्रेसी राज्यकर्त्यांचे बटिक असणारे आणि केवळ हिंदूंवर कारवाई करणारे पोलीस न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार का ?रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या आदेशाचा मान राखून रात्री १० वाजताच गणेशोत्सवातील ढोलताशे थांबतात. ‘डीजे’चा आवाज बंद होतो, परंतु मशिदीवरून दिली जाणारी पहाटेची अजान मात्र चालू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी हे थांबणार का ?