'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

ब्रिटीश खासदाराची भारतातील काँग्रेस शासनावर टीका

इंग्लंडमधील लोकप्रतिनिधी भारतातील काँग्रेस शासनावर वास्तववादी टीका करतात; कारण ते परिस्थितीचा अभ्यास करतात. भारतात असा एकतरी लोकप्रतिनिधी आहे का ?
    लंडन, ३० जानेवारी (वृत्तसंस्था) - ब्रिटनमधील एका खासदाराने भारताच्या अंतर्गत प्रकरणांत नाक खुपसतांना सत्तारूढ काँग्रेसवर टीका केली आहे. हे वृत्त ‘दिव्य मराठी भास्कर डॉट कॉम’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तानुसार येथील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये दिलेल्या भाषणात लेबर पक्षाचे खासदार बॅरी गार्डनर यांनी केवळ भारताच्या अंतर्गत प्रकरणांचा उल्लेख केला नाही, तर त्यांनी भारतीय दूतावासावर देखील टीप्पणी केली. भारतीय दूतावासाचे कामकाज हे ‘दिशाहीन' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(भारतातील राजकीय परिस्थितीविषयी जे एका ब्रिटीश खासदाराला समजते ते भारतातील सत्तारूढ काँग्रेस शासनाला का समजत नाही ? - संपादक)
    भारतातील भ्रष्टाचाराविषयी ते म्हणाले, ‘भ्रष्टाचारविरोधी अभियान चालवणारे श्री. अण्णा हजारे आणि त्यांच्या समर्थकांवर आक्रमण करण्यात आले. त्यांना सर्व पक्षाच्या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला. काँग्रेस पक्षाने तर भ्रष्टाचार संपवण्यासाठी पाऊल उचलण्यासही नकार दिला आहे. गार्डनर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतःची बाजू मांडताना भारत स्वतःच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यास असमर्थ ठरल्याचे सांगितले. गार्डनर यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील राजनैतिक संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi