'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

सोलापूर महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे रिंगण सोहळ्यास ‘पार्क’ मैदानावर संमती नाही !

माघ वारीच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाचा आज भव्य ‘रिंगण’ सोहळा
हिंदूंच्या कार्यक्रमांना संमती नाकारायची, हा काँग्रेसच्या राजवटीतील प्रशासनांवर झालेला संस्कार होय ! सोलापूर येथील वारकर्‍यांच्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या माघ वारीच्या रिंगण सोहळ्याला महापालिका प्रशासनाने ‘पार्क’ मैदान नाकारले. हिंदूंनो, महापालिकेने  अन्य धर्मियांना मैदान नाकारले असते का ?
    सोलापूर, २८ जानेवारी (वार्ता.) - वारकर्‍यांच्या परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या माघ वारीच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर शहरात भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाने या सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनाकडे ‘पार्क’ मैदानाची मागणी केली होती. विविध खोटी कारणे देत जाणीवपूर्वक अडवणुकीची भूमिका घेत महापालिका प्रशासनाने पार्क मैदानाची अनुमती नाकारली. महापालिकेच्या या भूमिकेमुळे हे रिंगण उद्या, २९ जानेवारी या दिवशी ‘होम’ मैदानावर दुपारी ४.३० वाजता होत आहे. (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असणार्‍या सोलापूर महानगरपालिकेकडून याहून वेगळी अपेक्षा काय ठेवणार ? हिंदूंनो, अशा हिंदुद्रोही पक्षांना निवडणुकीद्वारे हटवा ! - संपादक)
    या विषयी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. इंगळे महाराज म्हणाले, ‘‘आषाढमधील वारी सोडली, तर एवढ्या प्रमाणावर अशा प्रकारचे रिंगण प्रथमच महाराष्ट्रात होत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आम्ही ८ डिसेंबर या दिवशी अनुमती मागितली होती. याची पोचही आमच्याकडे आहे. प्रथम आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने आम्हास अनुमती नाकारली. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली असता त्यांनी महापालिका प्रशासनाकडे याविषयी विचारणा केली. त्या वेळी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येत नसल्याने आपले पितळ उघडे पडत आहे, असे समजल्यावर महापालिकेने हे क्रीडा मैदान असल्याने देता येत नाही, असे कारण पुढे केले. वास्तविक या मैदानावर यापूर्वी अनेक करमणुकीचे कार्यक्रम झाले आहेत. त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. या मैदानावर अनेक विवाह सोहळेही झाले आहेत. या मैदानावर सोलापूर महोत्सव, तसेच अन्य कार्यक्रम झालेले असतांनाही केवळ आकसापोटी आम्हाला अनुमती नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र हे रिंगण प्रथमच होत असल्याने आम्ही आंदोलन स्थगित करून उद्याचे रिंगण ‘सिद्धरामेश्वर देवस्थान पंच समितीकडील’ ‘होम’ मैदानावर घेत आहोत. मैदान नाकारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासन ‘वारकर्‍यांनी विनामूल्य मैदान मागितले’, असे खोटे सांगत आहे. वास्तविक आमची मागणी ‘विनामूल्य’ची नव्हती, तसेच आम्ही मैदानाची कोणत्याही प्रकारची हानीही करणार नव्हतो.’’
रिंगण आणि वारी यांचे स्वरूप !
    उद्या शहरातील ४३ दिंड्या आणि ग्रामीण भागातील ५० दिंड्या श्री मार्वंâडेय मंदिर येथून निघतील. संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संभाजी महाराज मोरे-देहूकर यांच्या पालखीचे पूजन होईल. पंढरपूर येथील ह.भ.प. बाबा महाराज राशीनकर आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज हंडे यांच्या हस्ते दोन वेगवेगळ्या अश्वांचे पूजन होईल. सोहळ्यातील सर्व दिंडीकर्‍यांचा सत्कार श्री. रामकृष्ण कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात येईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi