ओडिशा, झारखंड - सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने ओडिशाच्या भुवनेश्वर शहरातील `एक्झीबिशन मैदान' आणि पुरीच्या ‘गुंडेचा मंदिर’ परिसरातील पुस्तक मेळाव्यात तसेच झारखंड येथील ‘बोकारो स्वदेशी मेळाव्या’त भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी उडिया बांधवांनी सनातन-निर्मित उडिया ग्रंथ आणि लघुग्रंथ तसेच वर्ष २०१२ चे सनातन पंचांग यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे कार्य आवडल्याने जिज्ञासूंनी सत्संग तसेच मासिक ‘सनातन प्रभात’ उडिया भाषेत प्रकाशित करण्याची मागणी केली. क्षणचित्रे
१. प्रदर्शनस्थळी आलेले २ जिज्ञासू तरुण संस्थेचे कार्य समजून घेऊन सेवेसाठी प्रतिदिन १-२ घंटे देत आहेत.
२. भुवनेश्वरचे श्री. दास आणि श्री. वीरेंद्र पाल तसेच पुरीचे श्री. तुषार पाणिग्रही यांनी दहा दिवस साधकांच्या निवासाची व्यवस्था केली.
३. श्री. दास हे पत्रकार असून त्यांनी हिंदी मासिक पाहून लवकरात-लवकर उडिया भाषेत मासिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित करण्याची सेवा करण्याची इच्छा दर्शवली.