'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

चिदंबरम यांची जागा कारागृहात - भाजप

देशद्रोह्यांना शिक्षा होण्यासाठी भाजपने कृतीशील प्रयत्न करणे, हिंदूंना अपेक्षित आहे !

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - ‘२-जी स्पेक्ट्रम’ प्रकरणात ज्या प्रकारचे पुरावे माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या विरोधात आहेत, तसेच पुरावे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या संदर्भातही आहेत. असे असतांना ए. राजा यांना एक न्याय आणि चिदंबरम यांना दुसरा न्याय, असे का ?

नवरात्र (पाचवा दिवस)


सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढविण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ती’)

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस नरेंद्र मोदी अनुपस्थित

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या जनचेतना यात्रेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीत आजपासून चालू झाली. या बैठकीस भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अनुपस्थितीत राहिले.

संभाजीनगर जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

हिंदूंनो, तुम्ही हिंदुस्थानात रहाता कि पाकमध्ये !

संभाजीनगर, ३० सप्टेंबर - जिल्ह्यातील पिंपळगाव आणि बिडकीन या गावांमध्ये क्षुल्लक कारणांवरून मुसलमानांनी हिंदूंना मारहाण करण्याच्या घटना नुकत्याच घडल्या. (काँग्रेसी राज्यकर्ते करत असलेल्या अतीलांगूलचालनामुळे उद्दाम झालेले मुसलमान हिंदूंना अशा प्रकारे मारहाण करतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदुराष्ट्राला पर्याय नाही ! - संपादक)

धर्मप्रसाराच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्त्याला हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले !

 बेळगाव (कर्नाटक), ३० सप्टेंबर (वार्ता.) - अनगोळ, बेळगाव येथे एक धर्मांतरीत ख्रिस्ती काही हिंदूंना हेरून, त्यांना येशूच्या चमत्काराची पुस्तके दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी काही हिंदुत्ववाद्यांच्या साहाय्याने त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीतील ‘पेड न्यूज’ प्रकरण

मुंबई, ३० सप्टेंबर - ‘पेड न्यूज’प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सुनावणी ही निवडणूक आयोगातच होणार असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चव्हाण आणखी अडचणीत आले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाण यांची आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

हिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू व सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म व राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श ठेवा !


‘साम्यवादी पक्ष सोडत नाहीत, तर विविध राजकीय पक्षांचे उमेदवार पक्षाने उमेदवारी दिली नाही की, दुसर्‍या पक्षात जातात. याचाच अर्थ पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांवर पक्षाची धोरणे बिंबवण्यात अपयशी ठरतात. अशा तत्त्वहीन पक्षांकडून राष्ट्र व धर्म यांचे हित साधले जाईल का ?’ - डॉ. आठवले


साहाय्याच्या नावाखाली आतंकवादाने पीडित नागरिकांच्या तोंडाला पुसली पाने !

समझौता एक्स्प्रेस बाँबस्फोटात ठार झालेल्या मुसलमानांना पाकमध्ये जाऊन 
दहा लाख रुपये देणार्‍या काँग्रेसी राज्यकर्त्यांकडून भारतियांची होत असलेली क्रूर चेष्टा !

मुंबई, ३० सप्टेंबर - गेल्या पाच वर्षांतील आतंकवादी आक्रमणांना हकनाक बळी पडलेले पीडित आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर नेहमीचा ‘शासकीय’ अन्याय चालूच आहे. आक्रमणांतील पीडितांना हानीभरपाई देण्यात होत असलेल्या विलंबाविषयी राज्याच्या मानवी हक्क आयोगाने महाराष्ट्र शासनाची कानउघाडणी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी सभागृह रिकामे !

ही आहे भारताच्या पंतप्रधानांची जगातील किंमत !

नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग नुकतेच अमेरिकेच्या दौर्‍यावरून भारतात परतले. या वेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भाषण दिले. हे भाषण करतांना सभागृह अक्षरशः रिकामे होते. (या परिषदेमध्ये भाषण करून डॉ. सिंग यांनी काय साध्य केले ? जनतेच्या घामाचा पैसा उधळणारे राष्ट्रघातकी पंतप्रधान ! - संपादक) सुरक्षा परिषदेमध्ये  कायमचे सदस्यत्व मिळण्यासाठीभारत प्रयत्नरत आहे; मात्र डॉ. सिंग यांच्या भाषणाच्या वेळचे चित्र पहाता संयुक्त राष्ट्रे भारताच्या मागणीकडे किती गांभीर्याने पहातात, हे दिसून आले, असे डीएन्ए या वृत्तपत्रात श्री. राजीव डोग्रा यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

‘बेस्ट’ चालकांच्या चुकीच्या वर्तनामुळे वाहतुकीची समस्या वाढते !

मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) - सध्या मुंबई शहरातील वाहतुकीची समस्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांमध्ये बेस्ट बसगाड्यांच्या चालकांचे चुकीचे वर्तन हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. बस थांब्यापासून काही अंतरावर बसगाडी थांबवणे,

मैत्री मिळवण्याची आयती संधी मिळते; म्हणून नवरात्रोत्सव साजरा करणारा सध्याचा युवावर्ग आणि स्वतःतील शक्तीचे पूजन करण्यापेक्षा प्रतिदिन निराळ्या रंगाची साडी परिधान करण्यासाठी धडपडणारा महिला वर्ग !

नवरात्रोत्सवातील गरब्याच्या दुष्परिणामाचे उदाहरण

‘रास-गरबा लोकप्रिय झाल्याने नवरात्रीला अचानक भरभराट (बरकत) आली आहे. मैत्री मिळवण्यासाठी आयती संधी मिळते; म्हणून युवावर्ग नवरात्र साजरा करू लागला आहे आणि त्यामुळे गर्भपात केंद्रावर काही मासांनंतर गर्दी वाढू लागली आहे. आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी धनिक मंडळी गुप्तहेरसुद्धा वापरू लागले आहेत.

राज्यात २ ऑक्टोबरपासून स्वच्छता उत्सव उपक्रम

मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) - केंद्रशासनाने सूचना केल्याप्रमाणे राज्यात २ ते ४ नोव्हेंबर २०११ या कालावधीत उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

सैन्याच्या जोरावर भारत काश्मीरला कह्यात ठेवू शकणार नाही ! - इम्रान खान

कुठे जगभर राज्य करणारे ब्रिटीश, तर कुठे भारताचा एक भाग
असलेला काश्मीरही कह्यात ठेवू न शकणारे काँग्रेसचे नेभळट राज्यकर्ते !
    लाहोर, ३१ ऑक्टोबर - काश्मीरमधून भारताने त्याचे सैन्य मागे घ्यायला हवे. भारताचे सैन्य अमेरिकेच्या सैन्यापेक्षा शक्तीशाली निश्चितच नाही. जर अमेरिकेचे अफगाणिस्तानमध्ये काहीच चालले नाही, तर भारताचे सात लाख सैनिक काश्मीर कह्यात ठेवू शकतील का, अशी धमकी पाकमधील लाहोर शहरात झालेल्या एका सार्वजनिक सभेत इम्रान खानने भारतीय राज्यकत्र्यांना दिली आहे. (मुसलमानप्रेमाने अंध झालेल्या नेभळट भारतीय राज्यराजकर्त्यामुळे कोणीही उठतो आणि भारताला धमकी देतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दुसरे म्हणजे पाकमधील कोणीही नेता असो, त्याचा एककलमी कार्यक्रम असतो, तो म्हणजे भारतद्वेष अर्थात हिंदुद्वेष ! पाकमधील इतर नेत्यांच्या तुलनेत इम्रान खानचे स्थान नगण्य आहे. असे असतांना तोही आता भारताला उघड उघड धमकी देत आहे. अशा या पाकशी भारतीय राज्यकर्ते चर्चेची गुर्‍हाळे चालवत आहेत. हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदुराष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! - संपादक)
    तेहरीक-ए-पाकिस्तान या पक्षाचे अध्यक्ष असलेला इम्रान खान पुढे म्हणाला, ‘‘इतिहास साक्ष आहे की, कोणतेही सैन्य देशाच्या समस्येवर तोडगा काढू शकलेले नाही. अमेरिकेचे सैनिक अफगाणिस्तानमध्ये यशस्वी झाले का ? मग भारतीय सैन्य कसे काय यशस्वी होणार ? भारताने काश्मिरी जनतेला त्यांचे अधिकार द्यायला हवेत.’’

नवी मुंबईत मीटरमध्ये फेरफार करणार्‍या रिक्शांवर कारवाई

नवी मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांना लुबाडणार्‍या रिक्शाचालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने चळवळ चालू केली आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी प्रादेशिक परिवहन आल्याने गेल्या काही दिवसांपासून ही धडक चळवळ हाती घेण्यात आल्याचे

उपनगरील रेल्वेगाड्यांमध्ये महिला पोलिसांची नियुक्ती करा ! - उच्च न्यायालय

महिलांच्या डब्यातील तरुणीच्या विनयभंगाचे प्रकरण

मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) - मुंबईतील उपनगरीय रेल्वेगाड्यांमधील महिलांच्या डब्यांसाठी एकूण ३०० पोलीस कर्मचार्‍यांची भरती करा, त्यांत दीडशे महिला ठेवा, असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपिठाने दिला.

गोपनीयता कायदा रहित करून पारदर्शी कारभाराची आवश्यकता - अण्णा हजारे

मुंबई, ३० सप्टेंबर - ब्रिटीश सत्तेवर होते तेव्हा त्यांना गोपनीयता कायद्याची आवश्यकता होती. आता आपले लोक सत्तेवर असतांना गोपनीयता कायद्याची आवश्यकता हवी कशाला ? हा कायदा रहित करून पारदर्शी पद्धतीने कारभार करण्याची आवश्यकता आहे,

अमेरिका दिवाळखोरीच्या वाटेवर

वॉशिंग्टन, ३० सप्टेंबर - जगावर दादागिरी करणार्‍या अमेरिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेच्या राज्यकर्त्यांवर शासकीय मालमत्ता विकून उभारण्याची वेळ आली आहे.

‘अग्नी-२’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालेश्वर (ओडिशा), ३० सप्टेंबर - भूमीवरून भूमीवर मारा करणार्‍या ‘अग्नी-२’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची आज सकाळी ९.३० वाजता ओडिशाच्या किनारपट्टीजवळील प्रक्षेपण स्थळावरून भारताने यशस्वी चाचणी केली.

नवी मुंबईत आधारकार्ड प्रक्रियेत गोंधळ

नवी मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – देशात चालू असलेल्या आधारकार्ड ओळखपत्र देण्याच्या संदर्भात अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. या यंत्रणेची अवस्था मतदान ओळखपत्राप्रमाणेच होणार का, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये येत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाची सिडकोस भेट

नवी मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – सिडकोने नवी मुंबईत उभारलेल्या गृहप्रकल्पांना नुकतीच दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीत त्यांनी सदर गृहप्रकल्पांसह अन्य प्रकल्पांचेही कौतुक केले आहे.

नेरूळ येथे भरदिवसा सवालाखांची घरफोडी

असुरक्षित नवी मुंबई !

नवी मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – नेरूळ येथील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आतील सवालाख रुपयांचा ऐवज भरदिवसा चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी नेरूळ सेक्टर ६ येथे रहाणारे घरमालक अमोद नानाजी खांडेकर यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी त्यांच्या घरावर पाळत ठेवून ही चोरी केली.

‘मनोराज्यात रमण्यापेक्षा ईश्वराच्या राज्यात रमावे.’ - कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


मदिरा आणि महिला यांच्या नादी लागलेले व्यसनाधीन पोलीस !

अशी दुष्कृत्ये करणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
‘पोलीस अधिकारी आपल्या पदाचा उपयोग भ्रष्टाचार किंवा अवैध संपत्ती विकत घेण्यासमवेत आपल्या निजी जीवनासाठीही करतात. अनेक पोलीस मदिरा आणि मदिराक्षीच्या आहारी जातात. अनेक पोलीस अधिकार्‍यांनी आपल्या वरच्या कमाईतून ‘बारगर्ल’ किंवा आपल्या सख्यांना (गर्ल फ्रेंडना) घरेसुद्धा (फ्लॅटही) घेऊन दिली आहेत.’ - प्रकाश बांभरोलिया. (साप्ताहिक चित्रलेखा, १४.३.२०११)
ही परिस्थिती पालटण्यासाठी निरर्थक लोकशाही नको, हिंदुराष्ट्रच हवे !

नवरात्र विशेष !


नवरात्रात पंचमीला ललितापूजन का करतात ?

* शक्तीतत्त्वरूपी गंधमयतेला ‘ललिता’ म्हणतात.
* आपल्या गंधमय लीलांनी सर्वांचेच मन मोहून टाकणार्‍या शक्तीरूपाला ‘ललिता’ अशी संज्ञा आहे.
* नवरात्रीतील पंचमीच्या दिवशी ब्रह्मांडात विराजमान असणार्‍या गंधलहरींच्या कार्यामुळे पूजा  करणार्‍याच्या मनोमय कोषाची शुद्धी होते.
देवीशी संबंधित गंधाचे धर्मशास्त्र !
* देवीला दोन उदबत्त्यांनी ओवाळावे़
* देवीला मोगर्‍याच्या गंधाचे अत्तर अर्पण करावे.

नवरात्रीत मधल्या तीन दिवशी काढावयाची महालक्ष्मीशी संबंधित रांगोळी

अप्रकट-प्रकट शक्ती - १४ ठिपके १४ ओळी


मुंबईत नवरात्रोत्सवानिमित्त सनातन-निर्मित ग्रंथांची प्रदर्शने

 नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी सनातन-निर्मित ग्रंथ, तसेच उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा.


ज्यादा शुल्क आकारणार्‍या महाविद्यालयांना भाविसेनेची चेतावणी

ठाणे, ३० सप्टेंबर (वार्ता.) - येथील के.सी. इंजिनियरिंग या महाविद्यालयाकडून शासनाने ठरवलेल्या शुल्काच्या व्यतिरिक्त ६ सहस्त्र रुपये अधिक घेण्यात येत होते. याचा निषेध करत भारतीय विद्यार्थी सेना आणि सिनेटचे पदाधिकारी यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांचे अधिकचे शुल्क परत करावे, अशा मागणीचे निवेदन काल दिले. येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत, तर ‘शिवसेना पद्धतीने’ उत्तर देण्याची चेतावणी या संघटनांनी दिली आहे.

विविध देशांतील महिलांचे अधिकार आणि जीवनमान यांविषयी केलेल्या सर्वेक्षणात भारताचा क्रमांक खूप खाली !

काँग्रेसच्या कूचकामी राज्यकर्त्यांमुळे भारताची प्रत्येक क्षेत्रात घसरण चालूच !
    न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) - येथील ‘न्यूजविक मॅगझिन’ने विविध देशांमध्ये महिलांना देण्यात येणारे अधिकार आणि त्यांचे जीवनमान यांचा अभ्यास करण्यासाठी १६५ देशांमधील महिलांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात भारताचा क्रमांक १४१ वा लागला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या लांगूलचालनामुळे उद्दाम झालेले मुसलमान ओळखा !
संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळगाव आणि बिडकीन या गावांमध्ये क्षुल्लक कारणांवरून मुसलमानांनी हिंदूंना मारहाण करण्याच्या घटना नुकत्याच घडल्या. बिडकीन येथील घटनेत पोलीस हिंदूंवरच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोमालीयात कुराण पठण स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात एके-४७ रायफल आणि बाँब !

मुलांना लहानपणापासून आतंकवादाचे बाळकडू पाजणार्‍या इस्लामी राष्ट्रातील आतंकवादी संघटना
    मोगादिशू, ३० सप्टेंबर (वृत्तसंस्था) - येथील अल् शबाब या जिहादी संघटनेनी आयोजित केलेल्या कुराण पठण स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून एके-४७ रायफल व बाँब देण्यात आले.

आतंकवादी भुल्लर याच्या फाशीच्या शिक्षेवरील दयेची याचिका याचिकेवर निर्णय घेण्यास ९ वर्षे का लागली, याचे कारण द्या ! - सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश

 नवी दिल्ली, ३० सप्टेंबर (वृत्तसंस्था) - खलिस्तानी आतंकवादी देंवेंद्र सिंह भुल्लर याच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात राष्ट्रपतींकडे २००३ मध्ये करण्यात आलेली याचिका राष्ट्रपतींनी २०११ मध्ये फेटाळली. या याचिकेवर निर्णय घेण्यास ९ वर्षे का लागली, याचे कारण द्या, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाला दिला आहे.

साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे मुलीने गळ्यातील क्रॉस काढला !

  डोंबिवली, ३० सप्टेंबर (वार्ता.) – येथील एका सनातनच्या साधिकेने एका ‘क्रॉस’ घालणार्‍या आणि चर्चमध्ये जाणार्‍या हिंदु मुलीचे प्रबोधन केल्यावर तिने ‘क्रॉस’ काढला.

शिक्षण घेतांना ध्येय निश्चित करून त्याला प्रयत्नांची जोड दिल्यास यशाचा टप्पा गाठणे शक्य - विजय नाहटा

 मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) - अलीकडील काळात विद्यार्थ्यांच्यी आकलनक्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे शिक्षकांनीही अद्ययावत आणि अभ्यासपूर्ण रहाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी जीवनाच्या आनंदाबरोबरच शिक्षणासह वक्तृत्वदेखील आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे.

महागाई भत्ता आणि जकात थकबाकीपोटी १०० कोटी रुपये - उपमुख्यमंत्री

 मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) - राज्यातील नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता आणि जकात अनुदान थकबाकीपोटी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या एका बैठकीत घेतला. ते पुढे म्हणाले की, नगरपालिकांना भरीव निधी देत असतांनाच निधीचा योग्य विनियोग होत आहे का, देण्यात आलेला निधी त्याच कारणांसाठी खर्च होत आहे का, हे पहाण्याबरोबरच प्रशासनात आर्थिक शिस्त आणावी. नगरपालिकांनी नियोजित करवसुली योग्यप्रकारे करण्याबरोबरच कारभारात सुधारणा करणे आवश्यक आहे.

आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांची नावे काँग्रेसने उघड करू नयेत; म्हणून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’, अशी राजकीय पक्षांची स्थिती दिसते !

 ‘काँग्रेसचे केंद्रातील शासन पाडण्याची विरोधी पक्षांना आवश्यकता नाही. ते त्यांच्या अंतर्गत कलहातूनच पडेल.’ - अरुण जेटली, वरिष्ठ नेते, भाजप.

‘काश्मिरी असल्याने वेदना भोगल्या’, असे म्हणणार्‍या राहुल गांधी यांनी वेदना भोगल्याचे एकही चिन्ह दिसत कसे नाही ? वेदना भोगल्या, तर त्याला कारणीभूत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात इतकी वर्षे कृती का केली नाही ?

‘माझे आणि भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मूळ काश्मीरमध्ये आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये होत असलेली हिंसा आणि त्याच्या वेदना मीही भोगल्या आहेत.’ - राहुल गांधी, सरचिटणीस, काँग्रेस.

खासदार असलेले डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या जिवाला धोका आहे, हे ओळखून त्यांना आधीच संरक्षण पुरवले असते, तर काँग्रेस शासनाची थोडीतरी लाज राखली गेली असती !

  ‘२-जी स्पेक्ट्रम प्रकरणी शासनाला न्यायालयात खेचल्याने काँग्रेसवाले आणि जिहादी आतंकवादी यांच्यापासून माझ्या जिवाला धोका वाढलेला आहे. मला अल्-कायदाकडून धमकीपत्र मिळाले आहे. त्यामुळे मध्य दिल्लीत सुरक्षित ठिकाणी माझ्या निवासाची सोय उपलब्ध करून द्यावीr.’ - डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, अध्यक्ष, जनता पक्ष

‘स्टार माझा’ या मराठी वृत्तवाहिनीला श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या झिजेविषयी काळजी आहे, म्हणून नव्हे, तर ती हिंदुद्वेष्टी आहे, म्हणून तिने त्याविषयी चर्चासत्र आयोजित केले, हे लक्षात घ्या !

‘स्टार माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने ‘विठ्ठलाच्या मूळ मूर्तीवर अभिषेक करावा का ?’ या विषयावर चर्चेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रधार मिलिंद भागवत म्हणाले, ‘मंदिरात दीड वर्षापूर्वी सिद्ध केलेली एक पंचधातूची मूर्ती आहे. मध्यंतरीच्या काळात त्या मूर्तीची पूजा चालू होती. त्याविषयी कुणाचाही आक्षेप नव्हता. अशा वेळी मूळ मूर्तीवर अभिषेकाचा निर्णय कशासाठी ?’ त्या वेळी चर्चेत सहभागी झालेले भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी ‘स्टार माझा’चा खोटारडेपणा उघड केला. ते म्हणाले, ‘ही माहिती चुकीची आहे. पंचधातूची मूर्ती नुकतीच सिद्ध झालेली आहे. ती अद्याप प्रतिष्ठापित केलेली नाही. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अभिषेक होत नाही.’

पालकांनो, इंग्रजी ही आसुरी भाषा आहे, हे सत्य जाणून मराठीचाच स्वीकार करा !

 आमच्या शेजारच्यांना त्यांच्या मुलीला छोट्या गटात घालायचे होते. तेव्हा ‘तिला मराठी माध्यमाच्या शाळेत घाला’, असा मी समुपदेश केला. त्यांनी तसे न करता तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छोट्या गटात घातले. मात्र १५ दिवसांनी त्यांना त्यांच्या मुलीत बरेच नकारात्मक पालट जाणवू लागले. दिवसभर न कंटाळता गप्पा मारणारी त्यांची मुलगी एकदम गप्प गप्प राहू लागली. एरव्ही कुणालाही न घाबरता बिनधास्त बोलणारी त्यांची मुलगी शाळेत गेल्यावर वर्गात एकाच ठिकाणी कुणाशीही न बोलता घाबरून बसू लागली.

साधकांना सूचना

६० प्रतिशतपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असणार्‍या साधकांनी उपायांसाठी गेल्यानंतर साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावाही घ्यावा
    सध्या भारतामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ६० प्रतिशत पातळीचे साधक वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर उपाय करण्यासाठी जातात. तसेच संतही आध्यात्मिक उपाय करण्यासाठी जात आहेत. या वेळी साधकांवर आध्यात्मिक उपाय करण्याबरोबरच त्यांच्या व्यष्टी साधनेचाही आढावाही घ्यावा. यामध्ये साधक स्वतःच्या साधनेतील प्रगती जलद गतीने व्हावी, यासाठी सत्सेवेसाठी वेळेचा त्याग करणे, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे, तसेच भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, असे प्रयत्न परिणामकारकपणे करतात का, याचा आढावा घ्यावा.

प्रथम अंतर्मुखता (व्यष्टी साधना) आणि अंतर्मुखता साध्य झाल्यावर बहिर्मुखता (समष्टी साधना) हे साधनेसाठी जास्त लाभदायक असणे

१. अंतर्मुखता : ‘बर्‍याच साधकांची तक्रार असते की, त्यांचे मन अंतर्मुख होत नाही. यासाठी त्यांनी प्रार्थना, नामजप, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच भावजागृती यांवर भर दिला पाहिजे. त्यामुळे या गोष्टींचे अंतर्मनात संस्कार होतात आणि त्यामुळे या गोष्टी अंतर्मनात अखंड चालू रहातात. याला ‘अनुसंधान’ म्हणतात. हे झाले म्हणजे अंतर्मुखतेचा पाया पक्का होतो. तेव्हा वाणीला चैतन्य येते.

आतंकवाद्यांनी पोखरलेल्या भारताची सद्यस्थिती पालटण्यासाठी काँग्रेसींना सत्तेवरून हाकलणे, हाच एकमेव उपाय !

 सध्या भारताची ‘आतंकवाद्यांचे नंदनवन असलेला आणि सातत्याने बॉम्बस्फोट होणारा जगातील एकमेव देश आहे!’ अशीच ओळख आहे. याचे कारण निष्क्रीय भारतीय राज्यकर्ते असेच म्हणावे लागेल. सध्या भारतात सतत बॉम्बस्फोटांची मालिकाच चालू आहे. अलीकडेच आतंकवाद्यांनी राजधानी दिल्लीमध्ये, तेही दिवसा-ढवळ्या अत्यंत गजबजलेल्या न्यायालयात बॉम्बस्फोट केला. यावरून देशातील इतर ठिकाणी ते किती सहज बॉम्बस्फोट घडवू शकतात, हेच लक्षात येते.

मांसाहाराच्या हव्यासापोटी घेतले जाणारे पर्यावरणविरोधी ‘प्राण्यांचे पीक’ !

 जागतिक शाकाहारदिनानिमित्त ...
    ‘खाण्यासाठी म्हणून जे ‘प्राण्यांचे पीक’ (खाण्यासाठी जे प्राणी वाढवले जातात, त्यांचे उत्पादन) घेतले जाते, त्याचे गणित नुसते स्तंभित करणारेच नाही, तर अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारेही आहे. याविषयी केलेला उहापोह जागतिक शाकाहारदिनानिमित्त येथे देत आहोत.

सनातन संस्थेला होणारा पाताळातील मांत्रिकांचा विरोध आणि मिळणारा देवतांचा कृपावर्षाव

प्रश्न ४. सप्तदेवतांच्या असंख्य अनुभूती, ईश्वरी ज्ञान, श्रीकृष्णाशी वार्तालाप आणि अनेक संतांचे आशीर्वाद सनातनच्या साधकांना या घोर कलियुगात लाभण्याचे कारण काय ?
उत्तर : अवतारी कार्य करण्याची क्षमता नसतांनाही साधक असुरांनी केलेले असंख्य त्रास आणि समाजाकडून प्रचंड विरोध सोसूनही चिकाटीने त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत असल्याने श्रीकृष्ण भगवंताची इतरांच्या तुलनेत सनातनच्या साधकांवर विशेष कृपा असणे : साधकांची समष्टी साधना, म्हणजे अवतारी कार्य करण्याची क्षमता नसतांनाही त्यांनी असुरांनी केलेले असंख्य त्रास आणि समाजाकडून प्रचंड विरोध सोसूनही अवतारी कार्यात चिकाटीने सहभागी रहाण्याचा प्रयत्न केल्याने श्रीकृष्ण भगवंताची इतरांच्या तुलनेत सनातनच्या साधकांवर विशेष कृपा आहे.

कालीमातेचे नृत्य

तारे सर्व नभी विझोनी गेले। मेघेच मेघाप्रती झांकीयेले ।
सारीकडे मृत्यू कठोर काळा । दुःखाप्रती तो करी नृत्यलीला ।।
    तू कालिके सर्व विनाशकर्ती । ये आई ये, ज्याची असेच छाती ।
    दैत्यावरी प्रेम करावयाची । मृत्यूस आलिंगन द्यावयासी ।।
नाशार्थ जे भीषण नृत्य चाले । त्यामाजी ज्याने सहनृत्य केले ।
त्या अशा दुर्लभ भाग्यवंता । भेटेल ही भीषण कालीमाता ।।
(काश्मीर भ्रमणात स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या इंग्रजी कवितेचे भाषांतर)
- श्री. प्रकाश शर्मा (‘युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद’, पृ. क्र. ३४३)

एका राज्यातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची आणि सनातनच्या साधकाची गुप्तचर विभागाच्या पोलिसांकडून चौकशी

एका राज्यातील हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याची  आणि सनातन संस्थेच्या एका साधकाची गुप्तचर विभागाच्या वेगवेगळ्या पोलिसांनी दूरध्वनीद्वारे आणि त्यांच्या कार्यालयात बोलावून चौकशी केली. पहिल्यांदा केलेल्या या दोघांच्या चौकशीत काही जणांची नावे विचारण्याचे राहून गेल्याने पोलिसांनी पुन्हा चौकशी करून काही जणांची नावे विचारली. या चौकशांच्या वेळी त्यांच्यात झालेले संभाषण पुढे देत आहोत.

भावामुळे प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाणारा आणि महालोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेला ६ वर्षांचा कु. नीरज कर्वे !

कु. नीरज कर्वे
महालोकातून पृथ्वीवर जन्मलेला बालसाधक कु. नीरज कर्वे याचा आज आश्विन शु. पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (१.१०.२०११) सहावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
येथे देत आहोत.

कु. नीरज कर्वे याला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

दलवाइंच्या विधानांमागील रहस्य !

‘अण्णा हजारे यांची अटक ही केंद्रशासनाची घोडचूक होती’,    अशी उपरती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आणि खासदार हुसेन दलवाई यांना दीड मासानंतर झाली आहे. चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दलवाई यांनी अशी स्वीकृती देऊन एक प्रकारे काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे, असे काही जणांना वाटेल. प्रत्यक्षात मात्र हे विधान त्यांनी विचारपूर्वक केलेले आहे. ‘अण्णांचा रामदेवबाबा करू’, अशा वल्गना करणार्‍या काँग्रेसने ज्येष्ठ समाजसेवक श्री. हजारे यांना आंदोलनापूर्वीच अन्याय्य अटक करून हुकूमशाहीचे दर्शन घडवले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi
 
Copyright © 2012 Dainik Sanatan Prabhat Contact Us : dainikonline@gmail.com