'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

पाक भारताशी युद्ध करण्याच्या सिद्धतेत !


नेभळट काँगे्रसी राज्यकर्त्यांमुळे भारत नेहमीच दहशतीच्या छायेखाली !
सीमेवर छोटी अण्वस्त्रे तैनात करण्याची योजना

नवी दिल्ली, ३१ जुलै - पाकने छोट्या क्षमतेची अण्वस्त्रे भारतपाक सीमेवर तैनात करण्याची योजना आखली आहे. ही अण्वस्त्रे पाक भारताच्या विरोधात वापरू शकतो. पारंपरिक युद्धामध्ये पाकची क्षमता भारतापेक्षा खूपच न्यून आहे. त्यामुळेच तो अण्वस्त्रांच्या वापराचा विचार करू शकतो. पाककडे आजमितीला ९० ते ११० अण्वस्त्रे आहेत, तर भारताकडे ती ६० ते १०० आहेत, अशी माहिती संरक्षण क्षेत्राचा अभ्यास करणारी एक अमेरिकी संस्था ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’ने म्हटले आहे.

कोटी कोटी प्रणाम !


आज धर्मसम्राट करपात्रस्वामी यांची जयंती

विनम्र अभिवादन !


लोकमान्य टिळकयांचा आज स्मृतीदिन

रा.स्व. संघावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेकडून विधेयक


मुसलमानांच्या विरोधात कारवाया करत असल्याचा संशय

मुंबई, ३१ जुलै - मुसलमानांविरुद्धच्या आतंकवादी कारवायांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक व्यक्तीनी सहभाग घेतल्याच्या संशयावरून संघांवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका विशेष दूत नेमणार आहे. या विशेष दूतांच्या

कायद्याच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारणार ! - अशोक सिंघल

प्रस्तावित हिंदुद्रोही 
‘सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक अधिनियम २०११’ कायद्याचे प्रकरण

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - काँग्रेस शासन आणि सोनिया गांधी यांना सत्ता वाचवण्यासाठी मुसलमान अन् खिस्ती यांचे तुष्टीकरण करायचे आहे. त्यासाठी ते हिंदु संतमहंत, धर्मगुरू आणि हिंदू यांना कारागृहात टाकण्यासाठी ‘सांप्रदायिक अन् लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक अधिनियम २०११’ हा काळा कायदा संसदेत संमतीसाठी आणणार आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून पुन्हा पुन्हा चौकशी !

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान
समितीने गोधन कसायाला विकल्याचे प्रकरण

गेल्या वर्षी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने गोधन कसायाला विकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविरोधात कारवाई व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनी ठिकठिकाणी निवेदने दिली होती.

प्रस्तावित (अंध)श्रद्धाविरोधी कायदा पावसाळी अधिवेशनात संमत न करण्यासाठीचा ठराव परिषदेच्या वतीने शासनाला सादर !

संभाजीनगर येथे ‘सर्व धर्मीय आणि पंथीय सामाजिक परिषद’ पार !

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - संभाजीनगर येथे २४ जुलैला ‘सर्व धर्मीय आणि पंथीय सामाजिक परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत अंधश्रद्धा रोखण्यासाठी सध्याचे कायदे सक्षम असल्याने नवीन कायद्याची आवश्यकता नाही.

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची मुसलमानांकडून धर्मांतर करून हत्या

  • दावणगेरे (कर्नाटक) येथील घटना हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन
  • भाजपच्या राज्यातील हिंदूंची दयनीय स्थिती !
दावणगेरे (कर्नाटक) - मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या येथील चंद्रशेखर या तरुणाला प्रथम धर्मांतर करण्यास लावून नंतर त्याचा छळ करून आणि विष पाजून त्याची मुसलमानांकडून हत्या केल्याची घटना नुकतीच येथे घडली. या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर याचे शव पोलीस ठाण्यावर नेऊन
संबंधितांना अटक करण्याची मागणी केली.

एस्एस्आर्एफ्च्या विदेशातील साधकांच्या कार्यशाळेचे उद्घाटन

कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना पू. राजेंद्र शिंदे

६२ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले सनातनचे फरीदाबाद येथील साधक खेदूराम किंगर यांचे देहावसान

खेदूराम किंगर
फरीदाबाद (हरियाणा) - येथील ६२ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले ६८ वर्षांचे सनातनचे साधक खेदूराम किंगर (बाबूजी) यांचे आज, श्रावण शुद्ध प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (३१.७.२०११) या दिवशी सकाळी ७.३० वाजता कर्करोगामुळे  देहावसान झाले. गेले दोन दिवस ते अतीदक्षता विभागात होते. किंगर बाबूजी गेल्या अकरा वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. 
फरीदाबाद येथे आठ-नऊ वर्षे अध्यात्मप्रसाराची सेवा केल्यानंतर दोन वर्षे त्यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून हिंदी ग्रंथांचे मुद्रितशोधन करण्याची सेवा तळमळीने केली.

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. कोणाच्याही शापापासून ब्राह्मतेजाने आणि बाणापासून (शस्त्रापासून) स्वतःच्या क्षात्रतेजाने रक्षण करण्यास परशुराम समर्थ आहे.

पुणे येथील गणेशोत्सवावर आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

पुणे, ३१ जुलै - रमजान महिना आणि गणेशोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर येथील गणेशोत्सवावर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

नॉर्वेचे हत्याकांड नको असेल, तर उदात्त हिंदू विचाराचा प्रसार करा ! - हिंदू मानवाधिकार मंचाचे आवाहन

मुंबई, ३१ जुलै - नॉर्वेचा सामूहिक संहारकर्ता आणि तथाकथित आयर्न्द्स बेहरिंग ब्रेविक (वय वर्षे ३२) याने काही दिवसांपूर्वी ओस्लो नगरीत बाँबस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार करून ७६ निरपराध लोकांना ठार मारले असले आणि त्या घटनेचा निर्विवाद निषेध करणे अवश्य असले,

चामराजनगर (कर्नाटक) येथे सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा अधिनियम २०११'च्या विरोधात निषेध मोर्चा

चामराजनगर (कर्नाटक) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ जुलै या दिवशी सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा अधिनियम २०११च्या विरोधात चामराजनगरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकार्‍यांना निषेध पत्र, तसेच नागरिकांच्या सह्यांची सूची देण्यात आली. या निषेध मोर्च्यात बजरंग दल, तसेच इतर हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. हिंदु धर्माभिमान्यांना उद्देशून बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘या कायद्यातील काही सूत्रे मला तुमच्याकडूनच समजली.’’

‘सांप्रदायिक एवं लक्ष्यित हिंसा (न्याय एवं क्षतिपूर्ती) विधेयक २०११’ या कायद्यास विरोध करण्यासाठी मुझफ्फरपूर येथे धरणे आंदोलन !

मुझफ्फरपूर (बिहार), ३१ जुलै (वार्ता.) - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समिती आणि विश्व हिंदु परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांप्रदायिक एवं लक्ष्यित हिंसा (न्याय एवं क्षतिपूर्ति) विधेयक २०११’

दिल्लीत महिलांचा ‘बेशर्मी मोर्चा’

धर्मद्रोही काँग्रेवाल्यांमुळे भारताचे वेगाने होत असलेले नैतिक अधःपतन !

नवी दिल्ली, ३१ जुलै - रविवारी सकाळी १०.३० वाजता दिल्लीत महिला आणि पुरुष यांनी महिलांवर दिल्ली शहरात होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘बेशर्मी मोर्चा’ काढला. या मोर्चात सहभागी महिलांनी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कपडे परिधान करण्याची आणि वागण्याची मुभा हवी, असे म्हटले आहे.

भाषाप्रभू पु.भा. भावे स्मृती समितीच्या वतीने साहित्य पुरुषोत्तमाचा ३२ वा स्मृतीदिन

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - भाषाप्रभू पु.भा. भावे स्मृती समितीच्या वतीने साहित्य पुरुषोत्तमाचा ३२ वा स्मृतीदिन येत्या १३ ऑगस्टला रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे समितीचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली

भिवंडी येथील शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन

ठाणे, ३१ जुलै (वार्ता.) - भिवंडीतील कशेळी आणि केवणी-दिवे येथील पूर्व प्राथमिक शाळांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुप्रिया गायकवाड यांनी `विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि गुरुशिष्य परंपरा' या विषयावर प्रवचन घेतले. या प्रवचनाचा लाभ २५८ विद्यार्थ्यांनी घेतला. या प्रसंगी शाळेतील शिक्षकांचे चांगले सहकार्य लाभले. 
क्षणचित्र - विद्यार्थ्यांनी शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करणार, तसेच प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार करणार, असे सांगितले.

आता गिरणी कामगारांच्या प्रश्नावरील राजकारणाचा रौप्य महोत्सव साजरा करा !

श्री. नित्यानंद भिसे
मुंबई, ३१ जुलै - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनावर सवालक्ष गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याच्या मागणीचे पडसाद उमटले आहेत. बहुतांश विरोधी पक्ष प्रथमच एका विषयावर एकत्र आल्यामुळे दोन्ही सभागृहांत सत्ताधार्‍यांवर दबाव पडला.

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी

लोकहो, असे घोटाळेबाज मंत्री असलेले भ्रष्ट शासन सत्ताच्यूत करा 
आणि राष्ट्रहित साधणार्‍या राज्यकर्त्यांचे शासन आणा !

मुंबई, ३१ जुलै - केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याच्या संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गुन्हे शाखेकडून (सीबीआय) चौकशी चालू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. काल रात्री केंद्रीय गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईतून दिल्ली येथे गेले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने (अंध)श्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधात प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंत्रालयातील मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, सामाजिक न्यायविभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, विधी आणि न्याय विभागाचे सचिव श्री. व्ही.एल्. अंचलिया,

फलक प्रसिद्धीकरता

टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.

हिंदूंनो, धर्मांध मुसलमानांकडून होणारी हिंदूंवरील आक्रमणे जाणा !
दावणगेरे (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या चंद्रशेखर या तरुणाला मुसलमानांनी प्रथम धर्मांतर करण्यास लावले. नंतर त्याचा छळ करून त्याला विष पाजून त्यांनी त्याची हत्या केली.

३१ ऑगस्ट २०११ पर्यंत करावयाचे सर्वांसाठीचे उपाय

१. विविध चक्रांवर लावावयाची देवतांची चित्रे
देवतेच्या चित्रातील देवतेचे मुख बाहेरच्या दिशेने (निर्गुण) ठेवायचे कि शरिराला स्पर्श करून (आतल्या दिशेने, म्हणजे सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा.


धर्मशिक्षण : देवपूजेची सर्वसाधारण माहिती

 पंचोपचार पूजनाची कृती कर्मकांडाच्या स्तरावरील देवपूजा
देवतेला गंध (चंदन) आणि हळदी-कुंकू वहाणे
    प्रथम देवतेला अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) गंध लावावे. त्यानंतर हळदी-कुंकू वहातांना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा अन् अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवतेच्या चरणांवर वहावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धर्म असे का सांगतो ?’  या ग्रंथमालिकेतील भाग ३ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र ’)

धर्मनिष्ठ टिळक !

 आज लोकमान्य टिळक यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने टिळकांच्या धर्मनिष्ठेविषयी येथे जाणून घेऊया.
    राजसत्तेची भीती न बाळगता वा लाभाच्या पदावर डोळा न ठेवता लिहिणार्‍या या श्रेष्ठ संपादकाचा आदर्श ‘संधी मिळताच हिंदुत्व, हिंदु धर्म किंवा हिंदूंना जागृत करणार्‍या संघटनांवर दुगाण्या झाडणार्‍या’, आजच्या संपादकांनी घ्यावा असा आहे. लोकमान्यांच्या मृत्यूपत्रात कोकणातील मिळकत त्यांनी कुलदैवत लक्ष्मी-केशव यास अर्पण केली. तत्पूर्वीही कोकणाकडील त्यांच्या मिळकतीतून त्यांनी त्या देवळाच्या जीर्णोद्धाराला साहाय्य केले होते.

‘लोकमान्य टिळक यांचा एक गुण जरी आजच्या पत्रकारांनी आत्मसात केला, तरी त्यांचे भले होऊ शकते !’ - श्री. अशोक नाईक तुयेकर, संपादक, रविवार पुरवणी, दैनिक गोवा दूत.


आम्ही अनुभवलेले साधनेतील ‘मार्गमुकुटमणी’रूपी अधिवक्ता केसरकरकाका !

अधिवक्ता रामदास केसरकर
१. सौ. श्रुती भट, अकोला
१ अ. काव्य वाचून त्यात रेखाटलेले शब्दचित्र डोळ्यांसमोर जसेच्या तसे प्रगट होणे :
‘आषाढ अमावास्या,  (३०.७.२०११) या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये अधिवक्ता केसरकरकाकांच्या वाढदिवसानिमित्त सौ. केसरकरकाकूंना सुचलेले काव्य मी वाचले. त्या वेळी काकांचे अकोला शहरातील ‘प्रसारसेवक’ म्हणून सौ. काकूंनी त्यांच्या काव्यात रेखाटलेले शब्दचित्र माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे प्रगट झाले.

६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या युरोपमधील साधिका सौ. द्रगानाआजी यांच्यात साधकांना जाणवलेले पालट

सौ. द्रगानाआजी
(वर्ष २०१० )
सौ. द्रगानाआजी
(वर्ष २०११)

ऑगस्ट २०१० मध्ये  झालेल्या कार्यशाळेनंतर सौ. द्रगानाआजींमध्ये अंतर्मनातून पालट होत गेले. ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. द्रगानाआजींमध्ये झालेल्या या पालटांविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे येथे पाहू या.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑगस्ट २०११ च्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या साधकांची वैशिष्ट्ये

जगभरात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या (स्पिरियुअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या) आजपासून चालू होणार्‍या कार्यशाळेसाठी प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी विदेशातून १२ साधक गोवा राज्यातील  रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. हे साधक मागील काही महिने ते फारतर १ ते २ वर्षेच साधनेत आहेत. ते साधनेत नवीन असतांनाही चांगले प्रयत्न करत आहेत. या साधकांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहे.

प.पू. दास महाराजांचे विचार आणि त्यांनी सांगितलेले उपायांचे महत्त्व !

प.पू. दास महाराज
१. ‘भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या रूपात ब्रह्मविद्या या योगशास्त्राचा अपूर्व ज्ञानबोध अर्जुनाला दिला. आज कलियुगात तोच श्रीकृष्ण प.पू. डॉक्टरांच्या रूपातून ब्रह्मविद्या या योगशास्त्राचे ज्ञान आम्हा साधकांना देत आहे.

२. माणसाचे जगणे स्वस्थ, दबावरहित असते, त्या वेळी  माणसाच्या बाह्यजीवनाला ईश्वराचे पाठबळ मिळणे आणि त्याच्या अंतःकरणात ईश्वराचे अस्तित्व प्रगट होणे : योगशास्त्राच्या माध्यमातून वासुदेव कृष्णाचे अग्नीरूप प्रज्वलित झाले. धर्माचा नवा आलेख प्रकाशित झाला.

राष्ट्रातील समस्यांविषयी आर्य समाजाचे विचारवंत सत्यव्रत सामवेदी यांनी केलेले विचारमंथन !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला...
    स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतरही भ्रष्ट  आणि सत्तालोलूप राज्यकर्त्यांमुळे देश आज अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. भ्रष्टाचार आणि जिहादी आतंकवाद यांमुळे जनता विशेषतः हिंदू भरडले जात आहेत. देशातील या भीषण स्थितीविषयी जागृत करणारी आणि आत्मचिंतन करण्यास लावणारी लेखमाला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त आजपासून प्रसिद्ध करत आहोत. आज आपण आर्य समाजाचे विचारवंत सत्यव्रत सामवेदी यांनी केलेले विचारमंथन पाहूया.

अमेरिकेच्या रडारवर रा.स्व. संघ !

आपल्या स्वयंसेवकांना सदैव दक्ष रहाण्याचा आदेश देणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आता अमेरिका सदैव लक्ष ठेवणार आहे. अमेरिकेने यासाठी अमेरिकेच्या संसदेत विधेयकच मांडले आहे. संघावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका विशेष दूत नेमणार असून दूतांच्या कामकाजासाठी प्रतिवर्षी ४ कोटी रुपये खर्च करणार आहे. वाचकांना प्रश्न पडला असेल, आतापर्यंत काँग्रेस शासन संघावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत होते आणि काँग्रेसने संघावर स्वातंत्र्यानंतर तीन वेळा बंदीही घातली आहे; मात्र आता अमेरिकेला संघावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता का भासली ? तर याचे उत्तर मोठे विनोदी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi
 
Copyright © 2012 Dainik Sanatan Prabhat Contact Us : dainikonline@gmail.com