![]() |
| रुग्णांची वैद्यकीय तपासणी करतांना आधुनिक वैद्य (डॉ.) सौ. वत्सला काशी |
बेंगळुरू - बेंगळुरू राजाजीनगर येथे ‘धर्म जागृती प्रबोधिनी’च्या वतीने विनामूल्य वैद्यकीय तपासणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बेंगळुरू येथील आधुनिक वैद्य (डॉ.) सौ. वत्सला काशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यशाळेत ३० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचा रक्तदाब आणि इतर सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. काही जणांना त्यांना जे काही आजार आहेत त्याप्रमाणे औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला.
