'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

पंतप्रधानांचे वर्तन विदेशी आस्थापनांच्या हस्तकांप्रमाणे ! - योगऋषी रामदेवबाबा

नागपूर, ३० नोव्हेंबर - जनतेचे लक्ष काळे धन, भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्था यांच्यावरून विचलित व्हावे, यासाठीच काँग्रेसने किरकोळ बाजारातील विदेशी गुंतवणुकीचे सूत्र चर्चेस आणले आहे. भारताचे पंतप्रधान  विदेशी गुंतवणुकीतून उभारलेल्या व्यापारी संकुलाचे (‘वॉलमार्ट’) अध्यक्ष किंवा विदेशी आस्थापनांचे हस्तक असल्याप्रमाणे त्यांची बाजू मांडत फिरत आहेत, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे.
    किरकोळ बाजारात विदेशी गुंतवणूक झाल्यास शेतकरी, जनता आणि ग्राहक यांच्यावर भयावह परिणाम होईल. काँग्रेसने काळे धन, भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्था यांच्या विरोधात कठोर पावले न उचलल्यास ५ राज्यांच्या येत्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या विरोधात प्रचार करू, अशी चेतावणी योगऋषी रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
योगऋषी रामदेवबाबा यांनी केवळ योगाविषयीच बोलावे - काँग्रेस
    नवी दिल्ली - या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ता शकील अहमद म्हणाले, ‘‘योगऋषी रामदेवबाबा यांनी केवळ योगाविषयीच बोलावे, अन्य सूत्रांविषयी गप्प राहिलेलेच बरे !’’ (प्रत्येक राज्यकर्ता सर्व क्षेत्रातील ज्ञानी असल्याप्रमाणे बोलत असतांना एका राष्ट्रप्रेमी संतांची टिपणी काँग्रेसला एवढी का झोंबते ? ते सत्य असल्यामुळेच काँग्रेसवाल्यांना झोंबते का ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi