हिंदूंच्या पाठीत काँग्रेस शासनाने अखेर खंजीर खुपसला !
* ‘थ्रू द आईज ऑफ पेंटर’ लघुपट प्रदर्शित * प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - गोवा शासनाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आंचिम) हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न, अश्लील आणि बीभत्स चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांचा ‘थ्रू द आईज ऑफ पेंटर’ हा लघुपट प्रदर्शित करून श्रद्धांजली वाहिली.
(काँग्रेसच्या दरबारात हिंदुद्वेष्ट्यांचा मान-सन्मान केला जातो, तर हिंदुत्ववाद्यांचा अपमान केला जातो, याचे हे ताजे उदाहरण ! - संपादक) हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटना यांनी या लघुपटाला विरोध केल्यानंतर ‘या लघुपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे’, असे आयोजकांकडून सांगण्यात आले; मात्र हा लघुपट आज प्रदर्शित करून गोव्यातील काँग्रेस शासनाने हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसून आज श्रद्धांजली वाहिली. (निवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी हिंदूंचा विश्वासघात करणारे औरंगजेबी वृत्तीचे काँग्रेस शासन ! - संपादक) * ‘थ्रू द आईज ऑफ पेंटर’ लघुपट प्रदर्शित * प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - गोवा शासनाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आंचिम) हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न, अश्लील आणि बीभत्स चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांचा ‘थ्रू द आईज ऑफ पेंटर’ हा लघुपट प्रदर्शित करून श्रद्धांजली वाहिली.
धर्मद्रोह्यांच्या दबावाला बळी पडून कडेकोट पोलीस बंदोबस्तात कला अकादमीच्या पे्रक्षागृहात आज सायंकाळी ५.३० वाजता हा लघुपट प्रदर्शित केला गेला. विशेष म्हणजे लघुपट पहायला प्रेक्षकांची अल्प उपस्थिती होती, तसेच हुसेन यांचे पाठीराखे म्हणवणारेही लघुपट पहायला फिरकलेच नाहीत. या वेळी पोलिसांची संख्या प्रेक्षकांपेक्षा जास्त असल्याने प्रेक्षागृहाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (मंदिरांना संरक्षण पुरवण्याची मागणी केल्यावर ‘अपुर्या पोलीसबळाचे कारण पुढे करणारे; मात्र प्रेक्षकांना नको असलेला लघुपट दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उपलब्ध करणारे रझाकारी गोवा पोलीस ! - संपादक)