हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी !
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांना श्रद्धांजली वहाण्याचा कार्यक्रम भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) आयोजकांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पुढे ढकलला होता. यामुळे ‘आंचिम’मध्ये सहभागी झालेले धर्मद्रोही कलाकार विक्रम गोखले, अमोल पालेकर, चित्रा पालेकर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांनी ‘आंचिम’च्या कार्यक्रमस्थळी स्वतंत्र सभा घेऊन चित्रकार हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली.
(हिंदूंनो, या धर्मद्रोह्यांना लक्षात ठेवा ! - संपादक) हे वृत्त दैनिक ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीने प्रकाशित केले आहे. पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांना श्रद्धांजली वहाण्याचा कार्यक्रम भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) आयोजकांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पुढे ढकलला होता. यामुळे ‘आंचिम’मध्ये सहभागी झालेले धर्मद्रोही कलाकार विक्रम गोखले, अमोल पालेकर, चित्रा पालेकर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांनी ‘आंचिम’च्या कार्यक्रमस्थळी स्वतंत्र सभा घेऊन चित्रकार हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली.
हिंदु जनजागृती समितीला आंदोलन करण्याची अनुमती नाकारली
१. ‘आंचिम’मध्ये चित्रकार हुसेन यांना श्रद्धांजली वहाण्यात येणार असल्याचे समजल्यावर हिंदु जनजागृती समितीने याविरोधात सदनशीर मार्गाने आंदोलन छेडले. प्रारंभी ‘आंचिम’चे आयोजक, केंद्रीयमंत्री अंबिका सोनी, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे हा चित्रपट रहित करण्याची मागणी करण्यात आली.
२. ही मागणी धुडकावण्यात आल्याने लोकराज्याने दिलेला एक नैतिक अधिकार या नात्याने ‘आंचिम’च्या ठिकाणी निदर्शने करण्याची परवानगी हिंदु जनजागृती समितीने पोलीस प्रशासनाकडे मागितली; मात्र ही मागणीही धुडकावून लावण्यात आली. (सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाकारणारे कायदाद्रोही पोलीस ! - संपादक)
३. गोव्याचे पोलीस प्रमुख असलेले पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांनी हिंदु जनजागृती समितीला ‘या क्षुल्लक कारणाकडे दुर्लक्ष करा’, असे सुनावले. (असा फुकाचा सल्ला मुसलमान अथवा खिस्ती यांना देण्याचे धाडस आर्या यांना केले असते का ? - संपादक)
४. लघुपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी आंदोलन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणीही नाकारण्यात आली. (‘खिस्त्यांची ३ डिसेंबर या दिवशी जत्रा असल्याने त्या दिवशी आंचिमचे कोणतेही कार्यक्रम नको’, यासाठी खिस्त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देणारे पोलीस हिंदुत्ववाद्यांना सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी नाकारतात. यावरून गोव्यात आजही सालाजारशाही अस्तित्वात आहे, हे दिसून येते ! - संपादक)