किरकोळ बाजारातील विदेशी गुंतवणुकीला अण्णा हजारे यांचा विरोध
राळेगणसिद्धी, ३० नोव्हेंबर - जनता माझी तुलना मोहनदास गांधी यांच्याशी करते; मात्र मी गांधींसह छत्रपती शिवाजी महाराजांचाही भक्त आहे. याचा अर्थ मी हिंसेचे समर्थन करत नाही; मात्र इतरांना कठोरपणे बोलणे हीदेखील गांधींना हिंसा वाटत असे. मला मात्र जनतेच्या भल्यासाठी कठोरपणे बोलण्याची हिंसा वारंवार करावी लागते. त्यामुळे मी गांधी नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
अण्णांच्या विरोधात दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात ते म्हणाले, ‘‘अशा विरोधी आंदोलनांचा मला चांगलाच अनुभव आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या संदर्भात उद्या, गुरुवारी बोलीन. लोकराज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे; मात्र सत्य आणि असत्य जनतेला चांगलेच ठाऊक आहे. ते अशा आंदोलनाविषयी योग्य निर्णय घेतील.’’ जनलोकपाल हिवाळी अधिवेशनात संमत न झाल्यास ५ राज्यांतील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधी प्रचार करणार आणि २७ डिसेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार, असेही ते म्हणाले. राळेगणसिद्धी, ३० नोव्हेंबर - जनता माझी तुलना मोहनदास गांधी यांच्याशी करते; मात्र मी गांधींसह छत्रपती शिवाजी महाराजांचाही भक्त आहे. याचा अर्थ मी हिंसेचे समर्थन करत नाही; मात्र इतरांना कठोरपणे बोलणे हीदेखील गांधींना हिंसा वाटत असे. मला मात्र जनतेच्या भल्यासाठी कठोरपणे बोलण्याची हिंसा वारंवार करावी लागते. त्यामुळे मी गांधी नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
किरकोळ बाजारातील विदेशी गुंतवणुकीला अण्णांचा विरोध
किरकोळ बाजारात विदेशी गुंतवणूक केल्याने शेतकरी संकटात सापडणार आहे. त्यामुळे माझा या गुंतवणुकीला विरोध आहे. केंद्रशासनाने या गुंतवणुकीच्या संदर्भात फेरविचार करावा, असेही श्री. हजारे म्हणाले.