देशात इटालियन महिला भारताची सत्ताधीश होऊ शकते, बांगलादेशातील ५ कोटी घुसखोर मुसलमान विनाअनुमती या देशात सुखाने आणि शासकीय सोयीसुविधा घेऊन कृपाशिर्वादाने राहू शकतात. काश्मीर पाकला देऊन टाकावा, असे म्हणणारे तथाकथित बुद्धीवादी भारतात सन्मानाने जगतात. अटकेतील जिहादी आतंकवाद्यांना पोसले जाते; मात्र जगाच्या पाठीवरील आणि विशेषतः पाकधील हिंदूंना कायदेशीर अनुमती मागूनही या देशात रहाताही येणार नाही, अशी हिंदुद्रोही भूमिका काँग्रेस शासनाने घेतली आहे. पाकच्या निर्मितीला पाठिंबा देणार्या आणि फाळणीच्या वेळी मुसलमानांकडून लक्षावधी हिंदू पाकमध्ये ठार होत असतांना त्यांना आहे तिथेच मरण्यासाठी वार्यावर सोडणार्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षा काय ठेवणार ? मात्र या भूमिकेमुळे ‘अतिथी देवो भवः’ ही संस्कृती असणार्या भारताची प्रतिमा अशामुळे मलीन होणार आहे. शरणागताला आश्रय देणार्या भारताची सहस्रो वर्षांची परंपरा असतांना पाकमधील हिंदूंना आश्रय नाकारणार्या काँग्रेसींना आता हिंदूंवरील अत्याचारांची भयावहता अनुभवण्यास पाकमध्ये पाठवण्यास पर्याय नाही.
पाकमधील हिंदू म्हणजे गुलाम !
पाकमधून भारतात तीर्थस्थानाच्या दर्शनासाठी आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० हिंदूंची प्रवेश अनुज्ञप्ती (व्हीसा) २ महिन्यांपूर्वीच संपल्यामुळे त्यांना पाकमध्ये परतावेच लागेल, अशी धमकी हिंदुद्रोही काँग्रेसी शासनाने लोकसभेत दिली आहे. गेले दोन महिने ही हिंदु कुटुंबे विविध संस्थांच्या माध्यमातून शासनाकडे भारतात कायमस्वरूपी रहाण्याची अनुमती मागत आहेत. त्यांना भारतात रहाता येणार नाही. त्यांनी आल्या पावली पाकमध्ये चालते व्हावे, असे काल केंद्रीय गृहराज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी लोकसेभत एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात म्हटले. पाकमधील हिंदूंची स्थिती गुलामांसारखी झाली आहे. मुसलमानांकडून हिंदूंच्या मुलींना घरातून पळवून नेले जाते. त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा निकाह मुसलमानाशी लावण्यात येतो. हिंदूंकडून खंडणी वसूल केली जाते. त्यांना कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. या अत्याचारांमुळे त्रस्त झालेली २७ िंहदु कुटुंबे सर्वस्वाचा त्याग करून भारतात कायमस्वरूपी आणि सन्मानाने रहाता येईल, या आशेने आली आहेत. त्यांना पुन्हा ‘ना’पाकमध्ये (नरकात) जाण्याची इच्छा नाही. असे असतांना मुसलमानप्रेमी काँग्रेसी राज्यकर्ते त्यांना भारतातून हाकलून लावत आहेत. काँग्रेसला या देशाचे दुसरे पाकिस्तान करायचे आहे. या देशातील हिंदूंचे जितके खच्चीकरण करता येईल, तितके केले जात आहे. हाच प्रकार पाकमध्ये त्याच्या स्थापनेपासून केला जात आहे. अशा वेळी पाकमधील हिंदूंना भारतात कसे काय ठेवता येईल, याच विचाराने काँग्रेसने त्यांना भारतात रहाण्याची अनुमती दिलेली नाही. अशा वेळी मानवाधिकारांचे रक्षणकर्ते समजणारे तिस्ता सेटलवाड, शबाना आझमी, महेश भट्ट, इत्यादी तथाकथित बुद्धीवादी या हिंदूंसाठी पुढे आलेले नाहीत. घुसखोर बांगलदेशींना पकडून त्यांच्या देशात पाठवतांना त्यांच्या बाजूने उभे रहाणार्या ममता बॅनर्जीही या वेळी गप्प आहेत. भाजपच्या एकाही राष्ट्रीय नेत्याने या विषयी उघडपणे हिंदूंची बाजू घेतल्याचे ऐकिवात नाही. एकाही राजकीय पक्षाने या हिंदूंविषयी सहानुभूती व्यक्त केलेली नाही. या हिंदूंच्या ठिकाणी एखादे मुसलमान अथवा खिस्ती कुटुंब असते, तर एकजात सर्व राजकीय पक्ष आणि बुद्धीवादी त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरून त्यांना सन्मानाने भारतात राहू द्यायला पुढे आले असते.
भारतातील हिंदूंची अवस्था पाकमधील हिंदूंप्रमाणेच !
काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या या हिंदुद्वेषी कृतीच्या विरोधात देशातील हिंदूंनी एकत्रीत होऊन पाकमधून आलेल्या िंहदूंना भारतात सन्मानाने ठेवण्यासाठी काँग्रेसला भाग पाडले पाहिजे. आज भारतातील हिंदूंवरच काँग्रेसच्या लांगूलचालनामुळे उद्दाम झालेल्या मुसलमानांकडून अत्याचार केले जात आहेत. उद्या भारतातील हिंदूंना भारतातून पलायन करावेसे वाटल्याचा दिवस आल्यास नवल वाटायला नको. अशा वेळी हिंदूंना आपला म्हणून शरण जाण्यासाठी जगाच्या पाठीवर एकही देश नाही. अशा वेळी हिंदूंनी आताच जागृत होऊन पाकमधीलच नव्हे, तर भारतातीलही हिंदूंना सन्मानाने रहाता आणि जगता येण्यासाठी एकत्र येऊन काँग्रेस शासनाला पाकमध्येच हद्दपार करण्याची आवश्यकता आहे.
