'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘देऊळ’ चित्रपटातील श्री दत्ताच्या गाण्याच्या विडंबनाच्या विरोधात समितीच्या वतीने श्री दत्त मंदिरांमधून प्रबोधन

जळगाव, ७ नोव्हेंबर (वार्ता.) - ‘देऊळ’ या चित्रपटातील श्री गुरुदेव दत्ताच्या विडंबनाच्या विरोधात ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताच्या छायांकित प्रती काढून त्या ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये लावण्यात येऊन भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. या मंदिरांमध्ये प्रशासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षरी घेण्याची विनंती मंदिराच्या पुजार्‍यांना करण्यात आली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
    समितीचे श्री. गजानन तांबट आणि गौरव तांबट यांनी येथील बळीरामपेठ, कालीकामाता चौक, जुने बी.जे. मार्केट, दाणा बाजार चौक, गणेश वसाहत, जोशीपेठ, गणेशवाडी, नवजीवन वसाहत, ईश्वरनगर या भागांतील दत्त मंदिरांमध्ये वृत्तांच्या प्रती लावल्यानंतर उपस्थित भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘आम्ही भ्रमणध्वनी करून निषेध नोंदवू आणि हा चित्रपट पहाणार नाही’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. समितीच्या वतीने मंगळवारी चित्रपटगृहाच्या मालकांना आणि पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi