'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

कापसाला ६ सहस्र रुपये भाव द्या - एकनाथ खडसे

जळगाव, ३१ ऑक्टोबर - कापसाचा हंगाम चालू होण्याची वेळ येऊनही राज्य आणि केंद्र शासन यांनी कापसाचा आधारभूत भाव घोषित केलेला नाही. शासनाने हा भाव त्वरित घोषित करावा आणि उत्पादन खर्च पहात कापसाला ६ सहस्र रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काल येथे एका पत्रकार परिषदेत केली.
    खडसे पुढे म्हणाले की, ज्वारीला ९८० रुपये भाव घोषित करण्यात आला आहे; मात्र खताच्या वाढत्या किमती पहाता ज्वारीला १ सहस्र २०० ते १ सहस्र ४०० रुपये भाव मिळणे आवश्यक आहे. राज्यात विजेअभावी पाणी नाही. त्यामुळे रब्बीचे पीक घेता येणार नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकर्‍यांचा संताप वाढत आहे. शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास शासन प्रवृत्त करत आहे, असा आरोपी त्यांनी केला.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi