'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

संस्कृतीचे हनन आणि विकृतीचे पूजन !

भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या फॉर्म्युला वन कार शर्यतीत जर्मनीच्या सॅबॅस्टियन व्हेटेल याला विजेतेपद मिळाले. या शर्यतीचा आणि सामान्य भारतियांचा तसा काडीचाही संबंध नाही. ही शर्यत म्हणजे उच्चभ्रू भारतियांच्या विरंगुळ्याचे साधन आहे. त्यामुळे त्याचे भारतात आयोजन करून लोकांचे काय भले झाले, हा एक वेगळा विषय असू शकतो; मात्र ही शर्यत जिंकल्यानंतर जगज्जेत्या व्हेटेल याने जे उद्गार काढले, ते प्रत्येक भारतियाला चिंतन करायला लावणारे आहेत.
‘आमच्याकडे (पाश्चात्त्य देशांत) आयुष्यात एखादी व्यक्ती काय साध्य करते, त्यावरून ती किती सुखी आहे, याचे मोजमाप केले जाते; मात्र भारतात तसे नाही. भारतीय हे सदैव आनंदी असतात !’, असे तो म्हणाला. व्हेटेलचा हा पहिला भारतीय दौरा असून तो या शर्यतीच्या निमित्ताने गेले काही दिवस भारतात वास्तव्य करत आहे. भारतियांविषयी त्याने केलेले अचूक निरीक्षण कौतुकास्पद आहे. भारताच्या चराचरात चैतन्य असल्याने ही भूमी आनंददायी आहे. त्यामुळे स्वाभाविकच या मातीत जन्म घेणारा जीव हा पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सुखी आणि समाधानी असतो. भारतात आल्यानंतर व्हेटेल याच्यासारख्या काही पाश्चात्त्यांना हा भेद सहज लक्षात येतो; पण ‘पिकते तिथे उगवत नाही’, हेच खरे. प्रत्येक वर्षी शेकडो पाश्चात्त्य साधना जाणून घेण्यासाठी भारतात येतात आणि येथे साधना करून अत्युच्य अशा आनंदाची अनुभूती घेतात. भारतीय समाज मात्र अध्यात्म आणि साधना यांच्यापासून लांब जातांना दिसत आहे. भारतात वास्तव्य करणार्‍या सडक्या बुद्धीच्या लोकांना भारताची ‘जगाचा आध्यात्मिक गुरु’ ही ओळख पुसून टाकायची आहे. यासाठी भारतात पद्धतशीरपणे चंगळवादाचा प्रसार केला जात आहे. ‘धान्यापासून दारू तयार करा’, ‘दारूचे ‘मॉल्स’ उभारा’, ‘टोमॅटिनो फेस्टीवल’चे आयोजन करा’, असले थेर सुचणे, हा त्याचाच परिपाक आहे.
अन्न-धान्य पायाखाली तुडवणे, ही विकृतीच !
    भारतात गेली काही वर्षे ‘टोमॅटिनो फेस्टीवल’चे फॅड आले आहे. गोव्यात तो आयोजितही करण्यात आला आहे. नाव ऐकल्यावर ही काहीतरी टोमॅटो वगैरे खायची स्पर्धा असेल, असे तुम्हाला वाटेल, तर ते चुकीचे आहे. एका मोठ्या पटांगणावर लोकांनी एकत्र जमायचे, तेथे जमिनीवर पसरवण्यात आलेले टॉमेटो तुडवायचे आणि ते एकमेकांवर फेकायचे, हे या ‘फेस्टीवल’चे स्वरूप आहे. स्पेनमध्ये म्हणे हा टोमॅटो
तुडवा-तुडवीचा प्रकार चालतो. त्यातून ‘बोध’ घेऊन भारतात पर्यटन विकासाच्या नावाखाली असे उपद्व्याप करायची दुर्बुद्धी काही लोकांना झाली आहे. ‘भारतात अर्धी जनता उपाशीपोटी असतांना असे कार्यक्रम होऊ देणार नाही’, अशी चेतावणी गोव्यातील काही संघटनांनी दिली आहे. त्यावर प्रतिवाद म्हणून ‘खाण्यास लायक नसलेला टोमॅटोच या कार्यक्रमात वापरला जाईल’, असे आयोजकांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमाला
३० सहस्र लोक येणार असतांना एकाने एक टोमॅटो जरी फेकला, तरी ३० सहस्र खाण्यास लायक नसलेले टोमॅटो आयोजक कोठून उपलब्ध करणार ? भारतात अन्नाला ‘पूर्ण ब्रह्म’ मानले जाते. त्यामुळे टोमॅटो मग तो खाण्याच्या लायक असो वा नसो, तो तुडवणे, हे पाप आहे. स्पेनमधील लोकांना त्याचे काहीच वाटणार नाही; कारण तेथे विकृती, हीच संस्कृती आहे. यामुळेच अशा विकृत कार्यक्रमाला तेथे ‘फेस्टीवल’ म्हणजे उत्सव संबोधले जाते. भारतात उत्सवाच्या काळात पंचपक्वान्ने करून ती खाऊ घातली जातात, तुडवली जात नाहीत,  
हे लक्षात घ्या !
    ‘अ‍ॅपल’ या संगणकीय क्षेत्रातील नामांकित कंपनीचे संस्थापक वैâ. स्टीव्ह जॉब्स हे तरुणपणी मनःशांतीच्या शोधात भारतात आले होते; मात्र भारतात आल्यानंतर त्यांना त्याविषयी दिशादर्शन करणारे कोणी भेटले नाही. मनःशांतीच्या शोधात भारतात येणार्‍या बर्‍याच पाश्चात्त्यांची दिशाभूल होतांना दिसते. या पार्श्वभूमीवर जगाला भारताची आध्यात्मिक ओळख करून देण्याचे दायित्व हे शासनाचे आहे. हाच धागा पकडून पाश्चात्त्यांना दिशादर्शन करणारे ‘स्पिरिच्युअल फेस्टीवल’, ‘साधना फेस्टीवल’, ‘मनःशांती फेस्टीवल’ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून शासनाने त्याचे जगभर विज्ञापन केली, तर भारतात जगभरातील जिज्ञासूंची रीघ लागेल. हे काँग्रेसच्या बिनडोक राज्यकर्त्यांना उमगेल, तो सुदिन !

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi