सध्या भारताची ‘आतंकवाद्यांचे नंदनवन असलेला आणि सातत्याने बॉम्बस्फोट होणारा जगातील एकमेव देश आहे!’ अशीच ओळख आहे. याचे कारण निष्क्रीय भारतीय राज्यकर्ते असेच म्हणावे लागेल. सध्या भारतात सतत बॉम्बस्फोटांची मालिकाच चालू आहे. अलीकडेच आतंकवाद्यांनी राजधानी दिल्लीमध्ये, तेही दिवसा-ढवळ्या अत्यंत गजबजलेल्या न्यायालयात बॉम्बस्फोट केला. यावरून देशातील इतर ठिकाणी ते किती सहज बॉम्बस्फोट घडवू शकतात, हेच लक्षात येते.
आतापर्यंतच्या अनुभवावरून काँगे्रसचे राज्यकर्ते आतंकवाद्यांना पकडणार नाहीत आणि पकडलेच, तरी पुन्हा त्यांचे अफजल अन् कसाब होतील आणि त्यांना पोसण्यासाठी, तसेच न्यायालयीन कामकाजासाठी जनतेचाच वारेमाप पैसा व्यय होईल. हा सगळा ‘फार्स’ बघण्याचा जनतेला आता खरेच कंटाळा आला आहे. यासाठी काँग्रेसींना सत्तेवरून हाकलणे, हाच एकमेव उपाय आहे.’ - सौ. राजश्री खोल्लम (भाद्रपद शु. चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११३ (११.९.२०११))हिंदूंनो, काँगे्रसच्या राज्यकर्त्यांची सत्तेवरून कायमची हकालपट्टी करा, नाहीतर ... !
जनतेचा प्रश्न : ‘काँगे्रसचे राज्यकर्ते आतंकवाद्यांच्या विरोधात काहीच कारवाई करतांना दिसत नाहीत. ते पकडलेल्या आतंकवाद्यांना फाशीही देत नाहीत. आता त्यांची पुढची खेळी काय असेल ?
उत्तर : आता काँगे्रसचे राज्यकर्ते ‘राष्ट्रपती भवन’सारखे ‘सन्माननीय आतंकवादी भवन’ दिल्लीत बांधतील.’ - सौ. राजश्री खोल्लम (भाद्रपद शु. चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११३ (११.९.२०११))