* आज न्यायालयाने जरी भावे आणि गडकरी यांना अतिरेकी ठरवले नसले, तरी ते अतिरेक्यांच्या भूमिकेपासून लांब नाहीत. गडकरी रंगायतनमध्ये केलेला बाँबस्फोट हा धर्मद्वेषातून केलेला अतिरेक आहे. (याचा अर्थ ‘न्यायालयापेक्षा जितेंद्र आव्हाड यांनाच अधिक कळते’, असे त्यांना म्हणायचे का ? असे वक्तव्य करून आव्हाड यांनी न्यायालयाचा अवमान करण्याचाच अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. काँग्रेसवाल्यांना लोकशाही नव्हे, तर त्यांची ठोकशाहीच हवी आहे, हेही त्यांचे हे वक्तव्य सांगत आहे ! - संकलक)
* चर्चमध्ये बाँब ठेवायला निघालेला मडगाव बाँबस्फोटात मारला गेलेला मलगोंडा पाटील याने सनातन संस्थेचे जे काही सनातन-बिनातन पाक्षिक का मासिक निघते ना, त्यातून ‘आपण अतिरेकी कसे बनायचे, मग पोलिसांपासून लांब कसे रहायचे, जे धर्मनिरपेक्ष नेते आहेत, त्यांच्यावर आक्रमण कसे करायचे’, याविषयी लेख लिहिला आहे. (असा कोणताही लेख पाटील यांनी लिहिलेला नाही. काँग्रेसवाले त्यांची समाजद्रोही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी कसे खोटारडेपणाचा कळस करत आहेत, त्याचेच हे उदाहरण आहे. हिंदूंची विचारसरणी अतिरेकी नाही; मात्र आव्हाड यांच्यासारखे नेते अशी खोटारडी आणि हिंदु धर्मियांची मानहानी करणारी वक्तव्ये करून त्यांना अतिरेकी विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत, असेच खेदाने म्हणावे लागेल ! - संकलक) अशा प्रकारचे शिक्षण तुम्ही एका धर्माचे नाव लिहून मासिकातून देता ? कशाला निष्कारण धर्माला बदनाम करता ? यांच्या माध्यमातून विद्वेष शिकवला जातो. (सनातनने धर्म, अध्यात्म, राष्ट्ररक्षण आणि आयुर्वेद यांसारख्या विषयांवर ११ भाषांत १७४ ग्रंथांच्या ३९ लाख प्रती प्रकाशित केल्या आहेत. हिंदु धर्मातील प्रत्येक अंगावर संशोधन केले आहे. धर्म आणि उत्सव यांत शिरलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींविषयी व्यापक जनजागृती केली आहे. हिंदूंनी धर्मपालन करावे, त्यांना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी अनेक ठिकाणी सत्संग चालू केले आहेत. शाळा-महाविद्यालये यांतून नैतिक मूल्ये आणि व्यक्तीमत्त्व विकास यांवर लाखो प्रवचने केली आहेत. सूक्ष्म-जगतावर व्यापक संशोधन केले आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी नियतकालिके चालू केली आहेत. या सर्वांची परिणती म्हणून आज सनातनचे आठ साधक संतपदाला पोहोचले आहेत, तर १५० हून अधिक साधक ६० टक्के पातळीच्या पुढे पोहोचले आहेत. सनातनच्या या कार्याची दखल केवळ भारतातील विचारवंतांनी, संतांनी आणि मान्यवरांनी नव्हे, तर विदेशातील मान्यवरांनीही घेतली आहे. सनातनने काँग्रेसप्रमाणे देश आणि समाज यांना तोडण्याचे नव्हे, तर समाज जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच दोन दशकांपूर्वी एक रोपटे असलेली सनातन संस्था आता विशालकाय वृक्षात परिवर्तित होत आहे. तिचे कार्य जगभरात पसरले आहे. आव्हाड यांनी सनातनवर हा आरोप करण्यापूर्वी स्वपक्षातील गुन्हेगार आणि आतंकवादी यांच्याविषयी बोलावे ! - संकलक) त्याच्यावर रोख लावण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रावर लांच्छन आणणार्या अशा संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करणारा मी पहिला आमदार होतो ! (श्री. अण्णा हजारे यांच्यासारख्यांच्या थोर समाजसेवकाच्या हत्येची सुपारी देणार्याला निवडणुकीचे तिकीट देऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्यांनी, मिरजेत भीषण दंगली घडवणार्या स्वपक्षाच्या मुसलमान दंगलखोरांना पाठीशी घालणार्यांनी, मावळ येथील निरपराध शेतकर्यांना पाठलाग करून ठार करणार्या पोलिसांना पाठीशी घालणार्यांनी, तसेच पुणे बाँबस्फोटातील आरोपीचे धागेदोरे ज्यांच्या पक्षाच्या नगरसेवकापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी अशी मागणी करावी यासारखी हास्यास्पद गोष्ट कोणती असेल ? हिंदूंनो, या ठिकाणी काही मोजकीच उदाहरणे दिली आहेत. यातून राष्ट्रकार्यासाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून साधना करणारे साधक असणारी सनातन संस्था आतंकवादी आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतंकवादी आहे, हे तुम्हीच ठरवा आणि येणार्या निवडणुकांमध्ये तुमचा निर्णय द्या ! - संकलक)* मलगोंडा पाटील मिरज येथील दंगलीच्या वेळी तलवारींसह सापडला. (या दंगलीचा आणि पाटील यांचा काडीमात्र संबंध नाही. या दंगलीत पोलिसांनीही त्यांचे नाव कधी घेतलेले नाही. असे असतांना आव्हाड असे वारंवार खोटे बोलून मिरज दंगलीचे स्वतःच्या पक्षाचे पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्नच करत आहेत ! त्यांनी असे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे हे महापाप कधीच झाकले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे - संकलक) मडगाव येथील स्फोटानंतर जेव्हा पनवेल येथील आश्रमात पोलिसांनी पडताळणी केली, तेव्हा त्यांना काही कागदपत्रे सापडली. त्यात ‘आपल्या विचारांच्या विरुद्ध वागणार्या, आपल्या विचारांमध्ये अडसर ठरणार्या अधिकार्याला कसे मारावे, त्याची हत्या कशी करावी’, याविषयी लिखाण सापडले. (हे आव्हाड यांनी सिद्ध करावे. अशी कोणतीही कागदपत्रे पोलिसांना सापडलेली नाहीत ! - संकलक)
* खिस्ताब्द २००३ मध्ये नांदेड येथील बाँबस्फोटाची चौकशी झाली असती, तर त्यानंतरचे समझौता एक्स्प्रेसपर्यंतचे स्फोट झालेच नसते. (२००३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटातील अतिरेकी पकडूनही मुंबईत अतिरेकी आक्रमण झाले, जर्मन बेकरी आणि १३ जुलै २०११ या दिवशी मुंबईत साखळी बाँबस्फोट झाले. याविषयी आव्हाड कुणाला उत्तरदायी मानतात ? कि आतंकवाद्यांमुळे नव्हे, तर आव्हाड यांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे ते झाले, असे त्यांना म्हणायचे आहे ? - संकलक)
* या स्फोट घडवणार्यांना नैराश्य वगैरे काही आलेले नाही. आम्ही हिंदु धर्माचे रक्षक आहोत, असा किती दिवस खोटा प्रचार करणार आहात ? (सनातनने कधीच खोटा प्रसार केलेले नाहीत. सनातनने स्वतःच्या लाभ आणि हानीचा विचार न करता राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी ठोस भूमिका घेऊन त्यांना विरोध केला आहे. सनातनच्या या ठोस भूमिकेमुळेच आव्हाड यांच्यासारखे राजकारणी आणि त्यांचे भ्रष्ट पक्ष यांच्याकडून सनातनाला विरोध होत आहे. भ्रष्ट आणि समाजद्रोही राजकारणी आणि पक्ष सनातनला विरोध करत आहेत, ही गोष्टच सनातच धर्मरक्षक असल्याचे सिद्ध करते; कारण धर्माला अधर्मीच विरोध करतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे ! - संकलक)
आव्हाड यांची मुक्ताफळे !
सर्वज्ञ असल्याच्या आणि त्रिकालाबाधित सत्य मांडत असल्याचा आव आणत जीतेंद्र आव्हाड म्हणाले,
* मलाही माझ्या धर्माचा अभिमान आहे; मात्र तो धर्म विद्वेष पसरवणारा नाही, तर प्रेम वाढवणारा आहे. (याच कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्ववाद्यांचा ‘नथुरामाची पिलावळ’ असा उल्लेख केला आहे. ही आव्हाड यांची ‘प्रेमाची भाषा’ आहे का ? सनातन संस्थेविषयीही ते गेली अनेक महिने खोटारडेपणाचा कळस करत अनेक अश्लाघ्य आरोप करत आहेत. यातून काँग्रेसवाल्यांची प्रेम वाढवण्याची परिभाषा म्हणजे सनातनसारख्या राष्ट्रभक्तांना पायदळी तुडवायचे आणि ईशरत जहाँसारख्या हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठी कार्यरत असणार्या आतंकवाद्यांचे समर्थन करायचे, अशी आहे का ? - संकलक)
* नथुराम गोडसे यांनी मोहनदास गांधी यांची हत्या करणे, याला मी पहिले अतिरेकी कृत्य मानतो. (स्वामी श्रद्धानंद यांची अब्दुल रशीद याने भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली. बंगालचा तत्कालिन मुख्यमंत्री सुर्हावर्दीने सहस्रावधी हिंदूंना ठार केले, लाखो हिंदु महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार केले. फाळणीच्या वेळी दहा लाख हिंदूंची जिहाद्यांनी हत्या केली, लक्षावधी हिंदू महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार केले. त्यांची ही कृत्ये धर्मकृत्ये होती, असे आव्हाड यांना म्हणायचे आहे का ? या कृत्यांचा साधा निषेधही आजवर एकाही काँग्रेसवाल्याने केला नाही ! उलट त्या रशीदची शिक्षा क्षम्य व्हावी, यासाठी गांधींनी अग्रलेख लिहिला आणि इंग्रजांना पत्रही लिहिले. सुर्हावर्दीचेही गांधींनी कौतुकच केले आहे. तोच वारसा आज आव्हाड यांच्यासारखे हिंदुद्वेष्टे चालवत आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे. - संकलक)
* बाबरी मशीद पाडण्याचे कृत्यही अतिरेकी म्हणूनच गणले गेले पाहिजे. (त्या आधी याच बाबरी मशिदीच्या ठिकाणी असणारे श्रीराममंदिर बाबराने पाडले, ते कृत्य आव्हाडांना ‘धर्मकृत्य’ वाटते असाच याचा अर्थ झाला ! आजवर एकाही काँग्रेसवाल्याने बाबराच्या कृत्याचा निषेध केलेला नाही. यातून या काँग्रेसी विचारसरणीच्या नेत्यांची वैचारिक सुंथा झाली आहे, हेच स्पष्ट होते आहे ! - संकलक )
* मोगल या देशात बाहेरून आले. या देशातील मुसलमान त्या मोगलांचे वंशज नाहीत. (असे असले तरी या क्रूर मोगलांनीच त्यांना येथील हिंदूंना बाटवून मुसलमान केले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. हे बाटलेले आज मोगलांपेक्षाही क्रूर झाले आहेत, हे ते हिंदू समाजावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत, हेही आव्हाड यांनी विसरू नये ! - संकलक)
* कुणीही मुसलमान हिंदूंचा विरोधक नाही (असे आहे तर देशभरात मुसलमानांकडून हिंदूंच्या मिरवणुकांवर, मंदिरांवर आणि निवासी वस्त्यांवर आक्रमणे का होत आहेत ? हिंदूंच्या मुली आणि महिला यांच्यावर अत्याचार का केले जात आहेत ? आव्हाड असे वक्तव्य करून हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम करत आहेत. - संकलक )
* हिंदु धर्मावर प्रेम करणे म्हणजे इस्लामविरोध नव्हे. (हे तत्त्वज्ञान (?) आव्हाड यांनी संपूर्ण विश्व इस्लाममय करायला निघालेल्यांसमोर करण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! - संकलक)
* हिंदु धर्मावर प्रेम करणे म्हणजे इस्लामविरोध नव्हे. (हे तत्त्वज्ञान (?) आव्हाड यांनी संपूर्ण विश्व इस्लाममय करायला निघालेल्यांसमोर करण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! - संकलक)