वसई (जिल्हा ठाणे), ३१ ऑगस्ट (वार्ता.) - सार्वजनिक गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासह हा उत्सव अध्यात्मशास्त्रानुसार आणि आदर्शरित्या साजरा करावा,
असे आवाहन अन् त्याविषयीचे प्रबोधन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सदानंद पांचाळ यांनी केले. ते वसई- माणिकपूर पोलीस ठाण्याच्या वतीने येथील विश्वकर्मा सभागृहात २४ ऑगस्टला झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी समितीच्या वतीने ‘सार्वजनिक गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श’ या विषयीची ध्वनीचित्रतबकडी उपस्थितांना दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचा गणेशोत्सव मंडळांच्या २५० सदस्यांनी लाभ घेतला. या वेळी माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत जाधव, वसई-विरार महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. दीपक देवरा आणि सभापती श्री. नारायण मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बैठकीच्या उद्घाटनाप्रसंगी रज-तमात्मक मेणबत्तीने दीपप्रज्वलन न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले. त्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेचे सभापती श्री. नारायण मानकर यांनी त्यात पालट करून निरांजनाने दीपप्रज्वलन केले.